आई कुठे काय करते | 30 september 2020 |

Aai Kuthe Kay Karte Today’s Full Episode

आई कुठे काय करते या मालिकेच्या आजचा भागांमध्ये, अभिषेक अरुंधतीला म्हणतो की,आई!बाबा तसे नाहीत. तर अरुंधती म्हणते, तू त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि तेच प्रेम आपल्याला आंधळे करते.अभिषेक म्हणतो ती बाई संजना नालायक आहे. तर अरुंधती म्हणते, ती खरं बोलली म्हणून ती निर्लज्ज का! आणि तू माझ्यापासून सर्वकाही लपवलं तर, तू खूप शहाणा का?

तुझ्या बाबांनी सर्व खोटं सांगितले आहे. बाकी लोक मला सांगत होते.मी विश्वास ठेवला नाही. मी मूर्ख होते. त्यावर अभिषेक बोलतो की, आई मला बाबांचं म्हणणं पटतंय. तुझं मन खूप मोठा आहे ना! त्यांना पण माफ करून टाक. त्यावर अरुंधती म्हणते, ‘किती वर्षापासून चाललं होतं हे? तर अभिषेक सांगतो, बारा वर्षापासून तर अरुंधती म्हणते म्हणजे बारा वर्ष मी दुसऱ्या पुरुषासोबत राहिले, तुझ्या बाबांना कधीच माफ करणार नाही. आणि तुलाही माफ करणार नाही.

तुमचा हेतू काहीही असला तरी तुम्ही मला फसवलं आहे. तुम्हाला वाटले ते तुम्ही केलं. आता मी काय करायचं ते मी ठरवणार.ते तुम्ही सांगायचं नाही! असे म्हणून अरुंधती तिथून निघून जाते.


तिकडे बाहेर केदार सर्व ऐकतो तर त्याच्या डोळ्यातून पाणी येतं.
अरुंधती खाली आल्यानंतर आप्पा म्हणतात. तू खाली का आलीस? तू आराम कर त्यावर अरुंधती “नाही, नको” म्हणते.

तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो. तर कांचन आणि अनिरुद्धला म्हणते,” ती संजना कुठे गायब झाली, अरुंधतीला बरं नाही काही विचारपूस करण्याची पद्धत आहे की नाही?”

त्यानंतर कांचन अरुंधतीला म्हणते,’ तो देव्हाऱ्यात असलेले मंगळसूत्र घाल, मोकळा गळा बरा दिसत नाही, असे म्हणून साठी अनिरुद्ध कडे मंगळसूत्र देते. तेवढ्यात आप्पा कांचन तिथून निघून जातात.तर अरुंधती अनिरुद्धच्या हातातून मंगळसूत्र हिसकावून घेते. आणि म्हणते की, घरच्यांच्या साठी मी मंगळसूत्र घालत आहे. पण मी वाट बघत आहे. तुम्ही कधी सर्वांना खरं सांगतो. त्यानंतर अरुंधती किचन मध्ये येते. तर विमल म्हणते, ‘ वहिनी तुम्हाला काही झालं तर दोन घरं परके होतील. एक माझे आणि एक तुमचं! तुम्हाला कोणी त्रास दिला? आम्हाला सांगा! मी त्यांना जाऊन बोलते.


तेवढ्यात यश तिथे येतो. आणि अरुंधतीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अरुंधती त्याला म्हणते, यश! तू देखील यात सामील होता? का?? यश, मला तुझी तरी खात्री होती. मला आता असं वाटतंय की मी तुम्हाला ओळखतच नाही. तुम्ही सर्वांनी मिळून मला फसवलेआहे.
असे म्हणून अरुंधती रडत तिथून निघून जाते. तिकडे संजना तीच्या घरी जाण्यासाठी निघते. कारण तिला अरुंधतीची भीती वाटत असते. तिला गौरी म्हणते, एवढं सगळं करुन पळून चालली का?

तिकडे अरुंधती रूम मध्ये दार बंद करून रडत असते. तर यश बोलतो, आई माझ्यावर विश्वास ठेव! मलाही काही गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु अरुंधती दार उघडत नाही. आणि रडत असते पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की, अरुंधती या दिवशी काय झालं हे सर्व खरं सांगणार आहे. तरी यश अनिरुद्ध कडे जाऊन त्याला चोप देणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!