धना भाग १० Dhana bhag 10

एकवेळ श्वास घेणे विसरू शकते पण एक क्षणही गेला नसेल कि मला तुमची आठवण आली नसेल.मला आता कुठेही सोडून जाऊ नका असे म्हणत राजलक्ष्मी ने हुंदका देत धनाच्या छातीवर डोके ठेवले….!
धनालाही हा विरह जणू काही युगानयुगाचा वाटत होता..!


सकाळच्या गार वारा अश्रुना झोंबून गालावर थंड हवेचा स्पर्श आणखीनच जाणवू लागला होता,खूप वेळ एकमेकांच्या मिठीत विसावल्या नंतर दोघानाही जाणवले आपण तळ्यावर आहोत…!


राजलक्ष्मी म्हणाली..खूप काही घडत आहे गावात ,तुम्ही इस्पितळातून कुठे गेलात ,मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे,आज रात्री काही करून आपण भेटायचो त्या ठिकाणी वाड्यावर या ..!
धानालाही जाणवले आपण राजांच्या परवानगी शिवाय केवळ अंगरक्षक सोबत घेऊन आलो आहे..!


राजलक्ष्मी ने मोठ्या मुश्किलीने मिठी सोडवत आणि डोळे पुसत म्हणाली.
सोबत एक पाहुणे आहेत मंदिरात ,त्यांची भेट घ्याल का ?
तुमच्या गैरहजेरीत गावासाठी आणि तुमच्या नावासाठी ते कुस्ती खेळायला तयार झालेत दिल्लीच्या मल्लासोबत ….!
काय ?


माझ्या ऐवजी लढणार ? धना उद्गारला..!
कोण आहे असा वीर,जो दिल्लीच्या मल्लाशी माझ्या जागेवर टक्कर देईल ?
”सूर्याजीराव”
राजलक्ष्मी म्हणाली..सूर्याजीराव त्यांचे नाव ,वन खात्यातील मोठे साहेब आहेत.
तुम्ही मारलेला वाघ पहायला आले ,तेव्हा आबांनी घडलेली हकीकत सांगितली आणि वाड्यावर ठेवून घेतले..!
धना क्षणभर शांत झाला ..!


सूर्याजी ?
कोण हा असा अवलिया जो केवळ गावासाठी,माझ्यासाठी सरकारी नोकर असून हा त्याग करायला तयार झाला ..!
पंजाबी मल्लाचे आव्हान स्वीकारतोय म्हणजे नक्कीच वीर असला पाहिजे..!
राजलक्ष्मी म्हणाली …त्याना भेटायचे ?
नको…राहुदे..मी पुन्हा भेटेन ..!


आज रात्री वाड्यावर येतो,तिथे बोलवू हवेतर …पण एक कर मी भेटलो म्हणून गावात कोणालाही सांगू नको..!
माझी शपथ आहे तुला..असे म्हणताच राज लक्ष्मी ने धना च्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली…जीव गेला तरी सांगणार नाही…!
पण आज रात्री नक्की या …असे म्हणत ते दोन देह पुन्हा मिठीत विसावले..!
राजलक्ष्मी मिठी सोडवत मंदिराकडे निघाली ….धनाही मागे हटला.!


राजलक्ष्मी काही अंतर चालली आणि मागे पाहू लागली ..तर कोणीही नव्हते..!
धना जंगलजाळीत गडप झाला होता …!
मंदिरात सूर्याजी व नोकर राजलक्ष्मी ची वाटच पाहत होते ,एव्हाना पूजा पार पडली होती ,धनाने आणलेले पाणी पिंडीवर ओतले आणि पुजार्यांनी प्रसाद दिला..!
राजलक्ष्मी ,सूर्याजी आणि नोकर बाहेर आले…..


सूर्याजीने नोकरांना सांगितले…तालमीत जावून पेटीत माझा लंगोट आहे..तो घेऊन वाड्यावर या …मी आणि राजलक्ष्मी वाड्यावर जातो ..!
ते दोन नोकर गेले …!
राजलक्ष्मी आणि सूर्याजी वाट चालू लागले…!


राजलक्ष्मी खाली मान घालून धनाच्या विचारात होती ..सूर्याजी मात्र मनातील भावना राजलक्ष्मीला सांगायला आतुर होता ..वाटेवर कोणी नव्हते हे पाहून सूर्याजी बोलला …
नदीवरून यायला उशीर का झाला ?
सुर्याजीच्या या बोलण्याने राज लक्ष्मी भानावर आली …!


”अ…काही नाही ..घागर घासून पाणी आणायला वेळ झाला”
अच्छा…पण पूजा चुकली ना तुमची ….?
”हो…पण तुम्ही केली कि ना ?…कोणीतरी केलीच ना ?


हो….तेही बरोबर म्हणा ..!
सूर्याजी ने एक क्षण उसंत घेतली आणि बोलू लागला..!
”राजलक्ष्मी ….मला काहीतरी तुला बोलायचे आहे..!
राज लक्ष्मी खाली मान घालून चालत होती …बोला ना..!
ती म्हणाली.


तुला वाटत असेल मी गावासाठी आणि धनाच्या इज्जतीसाठी कुस्ती साठी तयार झालो …सर्व गावाला हेच वाटते ..!
पण माझे एक दुसरे पण कारण आहे …!
दुसरे कारण ?
कोणते ?
राज लक्ष्मी बोलली…!
”मी कुस्ती ५ वर्षे झाली सोडली होती,मला कुस्तीशिवाय जगणे असह्य होते राज लक्ष्मी.!


पण या वाघाच्या प्रकारनापायी नशिबाणे या या गावात आणले आणि मला माझी कुस्ती आणि प्रेम पुन्हा मिळेल अशी अशा वाटली …!
प्रेम …?
राजलक्ष्मी कुतुहलाने विचारू लागली ..तुम्ही प्रेम केलंय ?


सूर्याजी पटकन उत्तरला …होय ..!
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो राजलक्ष्मी ..इतके कि मला शब्द नाहीत ते सांगायला …!
मला तुज्ख्या रूपाने माझा हरवलेला भूतकाळ पुन्हा बघायला मिळाला ..!


या सुर्याजीरावांच्या अकस्मात बोलण्याने राजलक्ष्मी च्या काळजाचा ठाव घेतला..!
ती सूर्याजीची खूप इज्जत आणि मान ठेवत होती.
या गावाचा आणि त्यांचा काहीच संबध नसताना ते एवढ्या मोठ्या कुस्तीसाठी तयार झाले होते ….पण या बोलण्याने राजलक्ष्मी अनुत्तरीत राहिली ..!


सूर्याजीने पुन्हा विचारले….राजलक्ष्मी सांग…मला उत्तर हवे …तुलाही मी आवडत असेल तर फक्त हो म्हण…मी लगेच आबांच्या कानावर हि गोष्ट घालेन.
राजलक्ष्मी पटकन उत्तरली ..


”नाही …मला माफ करा.
जेव्हापासून बालपण संपून मी प्रेम म्हणजे काय असते ते समजू लागले तेव्हापासून माझ्या मनात फक्त आणि फक्त एकाच पुरुष आहे…त्याच्याशिवाय जगणे दूरच ..मी जगायचा विचारही करू शकणार नाही…!


राज लक्ष्मी च्या या बोलण्याने सूर्याजी स्तब्धच झाला …उसन्या अवसानाने तो म्हणाला ….कोण आहे तो ?
मला कळू शकेल….!
धनाजीराव……राजलक्ष्मी क्षणात बोलून गेली….!
सुर्याजीच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि सारे सारे स्पष्ट झाले.
गाव धना ला एवढी इज्जत का देते ?


पाटील धनाचा विषय काढला कि का टाळतात ?
गावात धना विषयी बोलले तरी सारे गप्प का होतात …सारे सारे उमगले..!
बोलण्याच्या वेळेत वाडा कधी आला समजले नाही…!


राजलक्ष्मीच्या जीवनातील हा प्रसंग खूप जीवघेणा होता ….प्राणापेक्षा प्रिय असलेला प्रियकर भेटला म्हणून समाधान व्यक्त करावे कि सूर्याजीरावसाराख्या निस्वार्थी व्यक्तीला दुखावले म्हणून दुख करावे ?


तिला काही सुचेना ती वाड्याच्या वरच्या माज्लायावर तिच्या खोली एकटीला डांबून रडू लागली …!
इकडे सूर्याजीराव वाड्यामागील खोलीत येऊन दार लावून शांत बसला होता.


त्याचे डोके विचारांनी त्रस्थ झाले होते…!
त्याने खूप विचार केला ..राजलक्ष्मी जरी धनावर जीवापाड प्रेम करत होती ,तरी धना आकस्मित कुठे गायब झाला आहे ?
त्याच्या या जाण्याने मला नशिबाने पुन्हा कुस्तीकडे वळवले आणि आता त्याच्यामुळेच राजलक्ष्मी दुरावत होती..!


त्याने विचारांती निर्णय घेतला कि धनाला शोधून राजलक्ष्मी च्या सुपूर्द करावे.
आणि आपण पुन्हा नोकरीवर रुजू व्हावे…!

धना फौजेत हेरगिरी बेमालून शिकला होता..!
वडाच्या गर्द झाडावर ते आणि सोबतचे अंगरक्षक विसावले होते.धना त्याना म्हणाला ,गड्यांनो या गावात माझे सारे जीवन गेले ,मला गावातून फिरून यावे वाटत आहे..!
माझ्यासोबत कोणीही नको,मी एकटा जाऊन येतो आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो ,असे म्हणत धना ने साधू बैराग्यांचा वेश घेतला…!
झोळीत छोटी पिस्तुल,बॉम्ब,चाकू आणि काही पेहरावे घेऊन धना पक्का साधू झाला…!
हातात मोरपिसाचे गुच्छ घेतले,एका हातात धूप पेटवलेले पात्र घेतले ,झोळी अडकवली

फाकीराची पहिली आरोळी पडली ती महादेवाच्या मंदिरासमोर …!

”अवधूत चिंतन श्री गुरुराज गुरुदेव दत्त ….”

बैरागी गावात प्रवेशला,आणि पहिला गेला तो धनाच्या घरात …!
दारात उभा राहून त्याने आरोळी ठोकली….

”” दत्तगुरू…दत्तगुरू

धनाची आई लगबगीने बाहेर आली ….हातात भाकरी घेऊन…!
भाकरी देत फकिराच्या नजरेत टचकन पाणी आले ,पण भावनेला आवर घालत तो बोलला ..आई देव तुम्हाला खूप मोठे आयुष्य देवो ..!
धनाच्या आईला अश्रू अनावर झाले ती म्हणाली …साधूमहाराज मला आत्ता मरण येउदे पण माझ्या पोराला माझेही आयुष्य लागुदे …..माझ्या पोराला सुखरूप ठेवा …माय लेकरांची भेट लवकर घडवा !

धनाला हे दुख खूप झोंबले ,त्याने मोठ्या मुश्किलीने आवाज बदलून बोलू लागला ….आई नको काळजी करू,देव त्याला सुखरूप ठेवेल,तो जिथे असेल तुझे आणि तुझ्या घराण्याचे नाव मोठे करत असेल …आणि तो तिथून जाऊ लागला ….जाताना त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते..!

धनाने साधू बैराग्याच्या वेशात सर्व माहिती काढली..!
पंजाबी मल्ल सातारा ला आले होते असे समजले ..एक दोन दिवसात कराड हुन कोल्हापुरात येणार होते…धनाच्या मनात काहीतरी आले ….सूर्याजी कोण कुठला ?
त्याचा इतिहास काय ?
सर्व सर्व त्याने माहिती काढली …एव्हाना संध्याकाळ होत आली होती.
मोठ्या विचाराने त्याच्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली..!

धना पुन्हा जंगलात वडाच्या झाडावर आला ,आणलेली अन्न साथीदाराना दिले आणि धना राजलक्ष्मीला भेटायला पुन्हा गुप्त वाटेने पाटलांच्या वाड्याकडे निघाला..!

वाड्यात त्याची नेहमीची वाट त्याला माहिती होती,पुन्हा सांधीसपाटीत बोटे घालून धना वाड्याच्या वरच्या मजल्यावर आला ….राजलक्ष्मी तिथे त्याची वाट पाहतच होती..!

ते दोन देह पुन्हा मिठीत विसावले…राजलक्ष्मी ने सर्व हृद्य रिकामे केले.
घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या ….आज घडलेला सूर्याजीचा प्रकारही सांगितला….धनाने सर्व ऐकून घेतले आणि तिने मोठा यक्षप्रश्न धनाला केला ?
”तुम्ही अचानक इस्पितळातून कुठे गायब झाला ?
धनाला खरोखर काय उत्तर द्यावे कळेना …आणि खरे सांगून देखील तिला नव्हे तर कोणालाच हे पटणारे नव्हते ……
धना ला मात्र हि गुप्त बातमी राजलक्ष्मी च्या कानावर घालावीशी वाटली ,कारण परत धना राजलक्ष्मी ला कधीच दिसणार नव्हता..!

आणि धनाने खाकीकात सांगायला सुरवात केली …..संघटना म्हणजे काय ..फौज म्हणजे काय आणि धना कोण होता ….सर्वकाही …!
राजलक्ष्मी सर्व ऐकत होती..!

आणि शेवटी धना बोलला …मी भावी राजा या नात्याने माझा सर्व भूतकाळ विसरून देशाच्या कामाला जात आहे राजलक्ष्मी…!
आपली या जन्मी तर भेट होणे अशक्य आहे…मला माफ कर …!
राजलक्ष्मी गुदमरून गेली ..तिला हुंदका आवरेना ..तिने केवळ धनाला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली…!


धना म्हणाला …तू सुर्याजीरावाना होकार दे ..!
माझ्याच तोलामोलाचे वाटत आहेत सूर्याजीराव …मला तुला त्यांच्या हाती देताना मोठी सुरक्षितता वाटत आहे…!
राजलक्ष्मी केवळ रडत होती ….मध्यरात्र उलटली तरी तिचे हुंदके संपेनात….!


मोठ्या मुश्किलीने धनाने तिचे मोहपाश सोडवले आणि धना जायला निघाला.
राजलक्षमी केवळ रडत होती ….पण धनाने मनाला आवर घातला आणि भरलेल्या डोळ्यांनी वाड्याखाली उतरून जंगलमार्गे किल्ल्याकडे पसार झाला….!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!