नमस्कार,
मी प्रदीप वरघुडे. मी इंजिनिअर असून खाजगी कंपनीमध्ये काम करतोय. मला लहानपणापासूनच इतिहासामध्ये खूप आवड आहे. मला इतिहास संशोधन करायला खूप आवडते. शिवाजी महाराजांचा मी एक साधा मावळा आहे. माझे युट्युब.कॉम वर राजमुद्रा नावाने ऐतिहासिक चॅनेल आहे. त्यामध्ये मी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा इतिहास मी व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य तयार केले होत.ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली होती. या वीरांचा इतिहास जगाला माहिती व्हावा यासाठी हा ब्लॉग मी बनवलेला आहे.या ब्लॉगमधून मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज, सरनौबत हंबीरराव मोहिते, स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, सरखेल कान्होजी आंग्रे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांचा इतिहास मी लिहणार आहे.
कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !
“जय जिजाऊ”, “जय शिवराय”, “जय शंभूराजे”