सकवार मातोश्रींचा मृत्यू कसा झाला?

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावर २६ मार्च १६८९ रोजी झुल्फिकारखानाने वेढा घातला.

सुमारे ४०हजार मोघली सैन्य तळ ठोकून होते.रायगडचा घेर इतका मोठा होता की, ४० हजार सैन्य देखील वेढा देण्यासाठी अपूर्ण पडत होते.परंतु फितुरीमुळे नंतर ३ एप्रिल १६८९ ला रायगडचा पाडाव झाला.

महाराणी येसूबाईंनी मोघलांशी तह केला.त्या तहानुसार महाराणी येसूबाई, शिवरायांच्या पत्नी सकवार मातोश्री, शाहू महाराज यांना औरंगजेबाच्या छावणीत राजकैदी म्हणून राहावे लागले.

स्वराज्याच्या धन्याच्या कुटुंबाला असे काही दुःखे भोगावे लागेतील याची कल्पना देखील कुणीच करू शकत नाही.

त्यावेळी शिवरायांच्या हयात असणाऱ्या पत्नी म्हणजे सकवार मातोश्री!

आपला पुत्र तसेच छत्रपती संभाजी महाराज जेव्हा मोघलांच्या जाळ्यात अडकले तेव्हाच सकवार मातोश्रींना खूप धक्का बसलेला होता.

पापी औरंग्याने क्रूरपणे आपल्या देवाला मारले.त्यानंतर जेव्हा शंभूराजांच्या बलिदानाची बातमी सकवार मातोश्रींनी ऐकली. तेव्हा, त्या फक्त शिरीरानेच जिवंत राहिलेल्या होत्या. इतके करून देखील या हलाखीच्या परिस्थितीत सकवार मातोश्रींना औरंग्याच्या छावणीत राजकैदी म्हणून दिवस काढावे लागले.

काय अवस्था झाली असेल त्या शिवरायांच्या पत्नीची!
पापी औरंग्याची छावणीं जिथे जाईल तिथे त्यांना जावे लागत असे.

परकीय लोकांच्या सानिध्यात त्या मनाने केव्हाच मृत्यू पावल्या होत्या.आणि जेव्हा औरंगेजबाची छावणी अहमदनगर मध्ये होती.तेव्हा तिथेच या माऊलीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीने प्राण सोडला. आणि आपल्या शंभूराजांना, शिवरायांना भेटण्यासाठी अनंतामध्ये विलीन झाल्या.

आपले सर्वांचे दुर्दैव म्हंणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणींची-सकवार मातोश्रींची समाधी कुठे आहे हे देखील इतिहासाला ज्ञात नाही.

1 thought on “सकवार मातोश्रींचा मृत्यू कसा झाला?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!