सरदेशमुखी म्हणजे काय..?

मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात अनेक वेळा सरदेशमुखी हा शब्द ऐकलेलाच असेल. नेमके सरदेशमुखी म्हणजे काय ते आपण आज जाणून घेऊयात.

चौथाई अणि सरदेशमुखी या सरकारी उत्पन्नाच्या खास बाबी, परंतु दोहोंच्या वसुलीच्या स्वरूपात फरक होता. कारण
शिवकाळात मराठा राज्याचा प्रदेश दोन भागात विभागला होता.
1) स्वराज्य: प्रत्यक्ष छत्रपतीच्या अमलाखालील प्रदेश.
2) मोगलाई: मोगलांच्या ताब्यातील मात्र छत्रपतींचे वर्चस्व मान्य केलेला प्रदेश होय.

यापैकी चौथाई ही परमुलखातून म्हणजे मोगलाईतून वसूल केल्या जात असे, तर सरदेशमुखी राजाचा खास हक्क म्हणून
स्वामी या नात्याने स्वराज्याच्या मुलखातून अथवा अंकीत मुलखातून वसूल केल्या जात होती.

महाराष्ट्रात वसाहती झाल्यावर त्यात शेतीवाडी सुरू झाली. सरकारी सारा वसूल होऊ लागला व तो वसूल करण्याकरिता महालो-महाली देशमुख नेमण्यात आले.

ह्या देशमुखांनी सरकारने ठरविलेला दस्त वसूल करावयाचा आणि आपली मेहनत म्हणून त्या एकंदर वसुलाचा दहावा हिस्सा स्वतःस राखून ठेवावयाचा व बाकीचा सरकारात जमा करावयाचा असा पायंडा सुरू झाला.

शिवपूर्वकालात घाटगे, निंबाळकर, डफळे, सावंतवाडीकर भोसले आदि मराठे सरदेशमुख महाराष्ट्रात होते. देशमुख या नात्याने देशाची स्वस्थता व शांतता राखण्याची व त्याच्याकडून अपेक्षिलेल्या सारा वसुलीची अशी दोन कामांची जबाबदारी त्यांच्यावर असे.

सरदेशमुखी

त्या वसुलाचा एकदझांश भाग जो देशमुखास मिळावयाचा त्यापैकी शेकडा पाच टक्के धान्याच्या किंवा रोकडीच्या रूपाने आणि पाच टक्के पीक जमिनीच्या रूपाने अशी त्यांच्या प्राप्तीची विभागणी होती.

छत्रपती शिवाजी महाराजास या देशमुखांवरील सरदेशमुखी वतन आपल्याला बादशहाकडून मिळावे असे वाटे. त्याप्रमाणे त्यांनी मोगल बादशहाकडे आपल्या हयातीत तीनदा मागणी केली होती. शिवाजी महाराजांची ही मागणी मोगल बादशहाने शाहू महाराजास सनदा देऊन एक प्रकारे पुरी केली.

शिवप्रेमींनो, सरदेशमुखी म्हणजे नक्की आहे तरी काय ते आपल्याला आत्ता कळालेच असेल अशी आशा आहे.


मित्रांनो, १९३३ पूर्वी आपण एका मोगल सरदाराच्या फोटोलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो म्हणत होतो..तो फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!