स्वराज्यातील सर्व छत्रपतींची नावे आणि कारकीर्द (सातारा गादी व कोल्हापूर गादी)

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील सर्व छ्त्रपतींची नावे व कारकीर्द आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

१.छत्रपती शिवाजी महाराज

छ्त्रपती शिवाजी महाराज १६७४ या वर्षी आपल्या देवाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि भोसले कुळातील छत्रपतींच्या गादीचा श्रीगणेशा झाला.

आपल्या सर्वांनाच आपल्या देवाचे उतुंग असे थोर कार्य तर माहीतच आहे.

२.छत्रपती संभाजी महाराज

१६८० मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनतर स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज छ्त्रपती झाले.व आपल्या पित्याच्या शिवविचारांनी या धाकल्या धन्याने आपले स्वराज्य चालवले ते आपण स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेमध्ये पाहीलेलेच आहे.

३.छत्रपती राजाराम महाराज

१६८९ ते १७०० पर्यंत राजाराम महाराजांनी अत्यंत हलाखीच्या काळात स्वराज्य वाचवण्याचे खूप मोठे कार्य केले.हे स्वराज्याचे तिसरे छ्त्रपती ठरले.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर राजा कर्ण नावाचा राजाराम महाराजांचा दासीपुत्र( नाटकशाळा)हे २ आठवडे छत्रपती होतें असा उल्लेख आढळतो.तसेच २ आठवड्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला होता. अशी नोंद आढळते.परंतु ही माहिती खरी आहे की खोटी त्याबद्दल इतिहास मौन आहे

४.ताराराणी पुत्र छत्रपती शिवाजी

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी आपल्या पुत्रास १७०० मध्ये आपल्या पुत्रास छत्रपतींच्या गादीवर बसवले आणि स्वराज्य नर्मदेपार पोहचवले.अल्पवयीन असलेल्या या छत्रपतीं शिवाजींचा मृत्यू १७१२ मध्ये झाला.(स्वराज्याचे दोन भाग झाले होते एक कोल्हापूर आणि दुसरे सातारा) स्वराज्यातील निर्माण झालेल्या कोल्हापूर गादीचे हे पाहिले छ्त्रपती बनले.

५.छत्रपती शाहू महाराज

याच दरम्यान मोघलांच्या कैदेतून १७०७ मध्ये छ.संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज सुटले व जानेवारी १७०८ मध्ये सातारा गादीचे छत्रपती बनले.

छ्त्रपती शाहू महाराज यांची कारकीर्द १७४९ पर्यंत चालली.१७४९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.दुर्देवाने छत्रपती शाहू महाराज यांना पुत्र झाला नाही.इथूनच दत्तक पुत्र छ्त्रपती घेण्याचे विचार सुरू झाले.

६.छत्रपती संभाजी महाराज (राजाराम महाराज व राजसबाई यांचा पुत्र)-कोल्हापूर गादी

ताराराणी यांच्या अल्पवयीन पुत्राच्या १७१२ साली झालेल्या मृत्यु मुळे संभाजी महाराज १७७४ मध्ये कोल्हापूर गादीचे छत्रपती झाले.

७. छत्रपती रामराजे (सातारा गादी)

छ.शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी यांनी त्यांचा नातू रामराजे यांना साताऱ्याच्या गादीवर बसवलेछ.रामराजे ९ डिसेंबर १७७७ रोजी मरण पावले.

८ छत्रपती धाकटे शाहू महाराज (सातारा गादी)

रामराजे यांना सुद्धा पुत्र नव्हता त्यामुळे त्यांनी रामराजांच्या अखेरच्या दिवसांत वावी येथील विठोजी भोसले यांच्या शाखेतील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी यांस १५ सप्टेंबर १७७७ रोजी विधिपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नाव धाकटे शाहूराजे ठेवले.आणि तेच पुढे सातारा गादीचे ११ डिसेंबर १७७८मध्ये छत्रपती झाले.त्यांचा पुढे ४ मे १८०८ मध्ये मृत्यू झाला.

९. छत्रपती प्रतापसिंह राजे (सातारा गादी)

धाकटे छत्रपती शाहू नंतर त्यांचा पुत्र प्रतापसिंह हे छत्रपती झाले.
छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा १८४७ मध्ये मृत्यू झाला.

१०.छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी)

यानंतर साताऱ्याच्या गादीवर त्यांचे भाऊ शहाजी राजे उर्फ आप्पासाहेब हे छत्रपती झाले.त्यांच्या मृत्यूनंतर भोसले घराण्यास औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी प्रतापसिंह व शहाजी यांच्या दत्तकाला नामंजुरी देऊन १८४९ मध्ये सातारा संस्थान खालसा केले.

११.छत्रपती शिवाजी दुुुसरे (कोल्हापूर गादी)

आता आपण कोल्हापूर गादीचे छत्रपती जाणून घेऊयात १७०० मध्ये राजाराम महाराज यांचा मृत्यू झाला त्यांनतर महाराणी ताराराणी यांचे पुत्र छत्रपती शिवाजी हे १७१२ पर्यंत छत्रपती होते.त्यांनंतर छत्रपती राजाराम महाराज यांना महाराणी राजसबाई यांच्यापासून झालेले पुत्र छत्रपती संभाजी हे गादीवर बसले.हे आपण वर वाचलेच आहे.

सात लग्ने करूनही छत्रपती संभाजी महाराजांना औरससंतती लाभली नाही. म्हणून खानवलकरांकडील एका मुलास त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या एका राणीच्या मांडीवर दत्तक दिले. ते म्हणजे दुसरे शिवाजी ते ५१ वर्षे छत्रपती राहिले (१७६२–१८१३).

१२ छत्रपती संभाजी व छत्रपती शहाजी (कोल्हापूर गादी)

दुसरे छत्रपती शिवाजी राजेंनंतर छत्रपती संभाजी (१८१३–२१) व छत्रपती शहाजी (१८२१–३८) अशा दोन भावांच्या कारकीर्दी झाल्या.

१३ छत्रपती तिसरे शिवाजी ( कोल्हापूर गादी)

त्यापैकी छत्रपती संभाजी यांचा खून झाला व दुसरे छत्रपती शहाजीनंतर त्याचा पुत्र तिसरा शिवाजी याने १८३८ ते १८६६ पर्यंत राज्य केले.

१४ छत्रपती राजाराम राजे (कोल्हापूर गादी)

छत्रपती तिसरे शिवाजी यांना औरस पुत्र नसल्यामुळे त्यांनी पाटणकर घराण्याचे एक पुत्र दत्तक घेतले ते म्हणजे छत्रपती राजाराम राजे.त्यांची युरोपयात्रा खूप गाजली.युरोपमधून परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे.

१५ छत्रपती चौथे शिवाजी (कोल्हापूर गादी)

छत्रपती राजाराम महाराजांसही पुत्र नव्हते, म्हणून सावर्डेकर घराण्यातला मुलगा दत्तक घेण्यात आला.ते चौथा शिवाजी छत्रपती (१८७१–८३). यांचा अहमदनगरच्या किल्ल्यात कारावासातील निर्घृण छळामुळे अत्यंत दुःखद अंत झाला.

१६ राजर्षि छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर गादी)

नंतर कागलकर घाटगे घराण्यातला दत्तक मुलगा गादीवर आला. त्यांचे नाव ⇨ छत्रपतीशाहू महाराज (१८८४–१९२२). यांच्या कारकीर्दीत कोल्हापूरचे महत्त्व वाढले. राज्याची प्रगती झपाट्याने झाली. ब्रिटिशांची मर्जी छत्रपतींवर अधिक बसली. त्यांची कारकीर्द तीन तपांहून थोडी अधिक काळ झाली. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘राजर्षि’ ही पदवी दिली. त्यांचे पुत्र राजाराम महाराज अठरा वर्षे छत्रपती होते (१९२२–४०).

१ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई राज्यातर्फे बा.गं. खेर यांनी कोल्हापूरचा कारभार आपल्या हाती घेतला. तेव्हापासून कोल्हापूर हा महाराष्ट्रात एक जिल्हा झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!