छत्रपती शाहू महाराज नाही तर हे होते स्वराज्याचे चौथे छत्रपती !

शिवमित्रांनो, स्वराज्याचे चौथे छत्रपती कोण होते असा प्रश्न आम्ही बऱ्याच लोकांना विचारला होता. त्यावेळी बहुतेक लोकांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्याचे चौथे छत्रपती होते असे सांगितले होते. परंतु हे उत्तर बरोबर नाही.

स्वराज्याचे छत्रपती शिवाजी

आजच्या लेखातून आपण खरे उत्तर जाणून घेऊयात.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे १६८९ मध्ये स्वराज्याचे तिसरे छत्रपती बनले. राजाराम महाराज यांचा मृत्यू १७०० मध्ये झाला.त्यावेळी देखील महाराणी येसूबाई व शाहू महाराज हे मोगली कैदेत होते. अशा हलाखीच्या परिस्थिती मध्ये स्वराज्य चालवले ते रणरागिणी हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराराणी यांनी!

ताराराणीनी त्त्याचा अल्पवयीन पुत्र शिवाजी यांना राज गादीवर बसवले. ०२ मार्च १७०० मध्ये राजाराम महाराज मृत्यू पावले व त्यानंतर लगेच १० मार्च १७०० मध्ये हेच शिवाजी महाराज स्वराज्याचे चौथे छत्रपती झाले.

काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये राजाराम महाराज यांचा दासीपुत्र राजा कर्ण हा ३ आठवडे राजगादीवर बसल्याची नोंद आहे. राजाराम महाराज गेल्यानंतर देवी रोगाने हा दासीपुत्र मरण पावला असे इतिहास सांगतो.परंतु त्यास ठोस पुरावा नाही. त्यामुळे महाराणी ताराराणी पुत्र शिवाजी महाराज हे स्वराज्याचे चौथे छत्रपती बनले.

2 thoughts on “छत्रपती शाहू महाराज नाही तर हे होते स्वराज्याचे चौथे छत्रपती !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!