बाजींद भाग ०९

हातात पांढरे निशाण घेऊन एक हशम क्षणात झेपा टाकत निघून गेला.
हातात पांढरे निशाण पाहताच मावळ्यांच्या तुकडीचा बाणांचा वर्षाव कमी झाला..!


सूर्यराव च्या भोवती अंगरक्षकांचे कडे पडले.
बाजूच्या दाट झाडीतून निथळती तलवार घेतलेला,आश्वावर स्वार असलेला एक शिलेदार घोड्याचा लगाम खेचत खेचत सूर्यराव च्या पुढे आला..!
त्यांच्या मागे केस पांढरे झालेला वयोवृद्ध मावळाही घोड्यावर स्वार होऊन आला होता.


त्या वृद्ध माणसाची नजर काहीतरी शोधत होती,आणि त्याने एका व्यक्तीला हेरले आणि घोडे त्याच्या जवळ नेत बोलला…..”खंडोजी…..बरा हायसं नव्ह “
मांडीवरची जखम धरत,वेदना सहन करत तो बोलला…”होय वस्ताद काका…! ठीक आहे मी “
असे बोलत त्याने एक कटाक्ष समोर अर्धमूर्च्छित असलेल्या सवित्रीकडे पहिले

मागे उभे असलेला स्वार एकदम पुढे आला आणी सूर्यराव ला बोलला…..!
“सूर्यराव तुम्हीच ना ?”

त्या स्वाराच्या आकस्मित बोलण्याने सूर्यराव आश्चर्य व्यक्त करत बोलला….”होय जी,मीच सूर्यराव “

पण,आम्ही महाराजांच्या कोणत्याच गुन्ह्यात नसताना आमच्या तुकडीवर महाराजांच्या जरीपटक्याच्या तुकडीचा न सांगता छापा का शिलेदार ?
महाराजांच्या कोणत्याही वाटेला आम्ही नसतो,तर आज कसे का ?

Bajune bhag 09

सूर्यराव बोलला…!

यावर तो स्वार उत्तरला…!

“सूर्यराव…. आपण ज्यावर शस्त्र रोखले होते,तो मराठेशाहीचा अधिकारी आहे,महाराजांच्या हेरखात्यातील एक प्रमुख हेर…बहिर्जींचा खास हेर…खंडोजी “

हे ऐकून सूर्यराव बाजूला उभा राहिला

त्या स्वाराच्या या बोलण्याने समोर अर्धमूर्च्छित असलेली सावित्री अवाक झाली,ज्या खंडेराय ला तलवार भाला चालवता येत नाही,जो केवळ नोकरीसाठी आमच्या वाड्यात आला,हे केवळ नाटक होते तर….तिला त्याच्या पराक्रमावर खुश व्हावे हे समजेना की त्याच्या खोटे बोलून वाड्यात येण्यावर राग व्यक्त करावा हे समजेना”

तो स्वार घोड्यावरून पायउतार झाला आणि समोर उभ्या खंडेराय उर्फ खंडोजी ला मुजरा करत बाजूला नेले आणि बोलू लागला…”

“नाईक…..हे काय करुन बसला आपण?
तुम्ही स्वराज्याच्या कामगिरीवर असलेले सैनिक आहात,असा जीव धोक्यात घालणे आपणास शोभत नाही….बहिर्जी नाईकांनी आपणास घेऊन येण्यास पाठवले आहे “

काय ?
मला घेऊन यायला मी कोणती चूक केली आहे ?

असे बोलताच तीन चार शिलेदारांनी खंडोजी च्या दंडाला धरले….

नाईक…आम्हाला माफ करा,आम्ही हुकमांचे गुलाम आहोत….!

खंडोजीने पुन्हा सवित्रीकडे पहिले….त्याच्या मनाची घालमेल सुरु झाली….एक कर्तव्यदक्ष सैनिक असून असा आततायीपना खरच त्याला शोभत नव्हता,पण सावित्रीला सूर्यराव च्या फौजेने पकडून नेले तेव्हापासून त्याचा मनावरचा ताबाच सुटला होता….!

खंडोजी ला पकडून ते शिलेदार नेऊ लागले इतक्यात बाजूच्या जंगलातून शिंगे-कर्णे गर्जू लागली…..हजारो हशमांच्या किंचाळण्याचा आवाज आणि घोड्यांच्या टापांचे आवाज घुमू लागले…..”

कोणाचा हल्ला असेल हा ?
सूर्यराव,खंडोजी आणि वस्ताद काकासह तो स्वर विचारात पडला,पण सावित्रीने ओळखले……”

ही फौज राजे शिरक्याची नेकजात फौज…”

आपल्या एकुलत्या एक लेकीला चार दोनशे लोकांनी पळवून न्यावे,हे त्यांच्या मनाला अतिशय झोम्बले होते,त्यांच्या डोळ्यात केवळ आग होती,त्यांच्या हातातील तलवार आणि मनगटे केवळ शत्रूच्या रक्तासाठी आसुसली होती……

खंडोजीलाही समजले की नक्कीच राजे येसाजीची घाटमाथ्यावर टेहळणी ला गेलेली फौज सावित्री साठी येत आहे…त्याने पटकन त्या स्वराला ही गोष्ट सांगितली….माझं ऐका,ही शिरक्याची लेक सावित्री या सूर्यराव च्या पळवून आणली आहे.
आपण जर तिला परत शिरक्यांच्या हाती सुपूर्द केले तर शिरक्यांचा जास्तच विश्वास आपल्यावर बसेल…”

यावर तो स्वार उत्तरला…सूर्यराव व शिरक्यांच्या वादात पडणे हे आपले काम नव्हे…तुम्हाला बहिर्जी नाईकांच्या पुढे उभे करणे हे माझे काम आहे…”

त्या स्वरांच्या त्या बोलण्याने खंडोजी पुरता चवताळला,त्याने क्षणात आपल्या दंडाला हिसडा मारला आणि दंड धरुन नेणारे मावळे धरणीवर पडले,दुसऱ्याच क्षणी त्या स्वरांच्या कमरेला लावलेली तलवार उपसली आणि त्याच्याच नरड्यावर धरत तो बोलला……मला माझ्या हिशोबाने काम करु दे ….नाईकांना सांगा,काम जोवर होत नाही,खंडोजी परत येणार नाही…”

बाजूला उभे असलेल्या वस्ताद काकांनी पुढे येत खंडोजीला बोलले….खंडोजी,तुझे डोके आहे का ठिकाण्यावर ?
आपण कोणत्या कामगिरीवर आहोत,आणि तू करत काय आहेस…?

काका…माझ्यावर विश्वास ठेवा मी करतो ते ठीकच करतो..तुम्ही निघा इथून…शिरक्यांच्या पदरी कडवे धारकरी आहेत….निभाव लागणे कठीण आहे…”

इतक्यात शिरक्यांच्या पहिल्या तुकडीने हल्ला चढवला….सूर्यराव आणि मावळ्यांची तुकडी दुहेरी लढत सुरु झाली.
खंडोजी ने त्वरित त्या स्वराला बाजूला केले आणि प्रसंगावधान राखत तो सवित्रीजवळ आला,आणि तिच्या हाताला धरुन उठवू लागला,तितक्यात तिने तो हात झिडकरला आणि त्याच्यावर हाताने प्रहार करु लागताच त्याने तिचा हात पकडून मुरगळला आणि तिला उचलून पलीकडच्या जंगलातून निघून गेला….

शिरक्यांच्या कडव्या फौजेपुढे सूर्यराव आणि मावळे तोकडे पडू लागले….क्षणात त्यांनी काढता पाय घेत माघार घेतली आणि वाटा चोरवाटेने निघून गेले….”

इकडे खंडोजीने सावित्रीला उचलून जंगलातून बरेच बाहेर आणले होते…पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खाली नदीचे विशाल पात्र……खंडोजीने एकदा मागे पाहिले आणि ताडले की शिरक्याची फौज पाठलाग करत आहे….त्याने कशाचाही विचार न करता सवित्रिसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकून दिले….”

ही गूढ कथा ऐकता ऐकता सखाराम ला कधी झोप लागली त्यालाच समजले नाही, सकाळी कोमल सूर्यकिरणांनी त्याची झोप मोड केली….सखाराम सह त्याच्या साथीदारांना जाग आली आणि समोरच खंडोजी ते कधी उठतात याची वाट पाहत होता…”

खंडोजीला पाहताच त्यांची झोप उडाली….”

उठा…किती वेळ झाला वाट पाहतोय तुमची…”

खंडोजी बोलला…!

सखाराम ने आजूबाजूला पाहिले तर केवळ गर्द दाट झाडी……त्याच्या मनात प्रश्नाचा काहूर माजला..!

कुठे गेले ते महादेवाचे मन्दिर ?
कुठे गेली ती सुंदर सावित्री ?
कुठे गेला तो मेलेला वाघ ?
हा खंडोजी रात्रभर गायब होता,आता कुठून आला ?

त्यां तिघांच्या डोक्यात प्रश्नांनी थैमान घातले होते,खंडोजी मात्र धीरगंभीर मुद्रेने त्या चौघांकडे पाहत होता..!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!