बाजींद भाग ३९

बाजींदच्या ३९ व्या भागात आपले स्वागत आहे.
काकांनी हातवारे करन खुण करत ते सारे गुहेमागे असलेल्या चोरवाटेने आत गेले…

एकावेळी एकाच माणूस आत जाईल इतकी अरुंद चोरवाट तुडवत ते
हेरखात्याच्या एका कक्षात पोहचले.
तिथून आत गले ..नेहमीप्रमाणे अनेक हेरांची अनेक कामे तिये सुरूच होती….

काकांनी तिथे उभे असलेल्या एका हेराला प्रश्न केला …पंत कुठे आहेत ?

त्या हेराने मुजरा करत समोरच्या कक्षाकडे बोट दाखवत सांगितले …त्या तिथ आहेत….!

काका त ते चौधे लगबगीने त्या कक्षात गेले. पंत काहीतरी लिहण्यात मश्गुल होते.

कक्षाचा दरवाजा उघडताना पंतांचे लक्ष काकांच्याकडे गेले आणि ते उठले….काका

रायगडी गेलेले काम झाले का?

होय….झाले काम..काका उत्तरले..!

सारेजण तिथे असलेल्या बैठक व्यवस्थेवर विसावाले आणि काका बोलले….

पंत..नाईक कुठे असावेत काही अंदाज ..?

काकांच्या या प्रश्नाने विस्मित झालेले पंत उत्तरले…

नाही काका…नाईकांचा ठावठीकाणा केवळ नाईकांनाच माहिती असतो…

पण,महाराजांच्या दक्षिणदिग्विजायची चाहूल आहे..कदाचीत त्यांचा मोर्चा दक्षिणेत असावा…..

पण,नाईकांशी काय काम होते ….?

एक दीर्घ श्वास घेऊन काका उत्तरले….काका ते परत सांगेन,पण मला नाईक भेटले पाहिजेत.

तुम्ही माझा निरोप सर्व हेराकरवी पोहोच करा…..भेटणे आहे ….!

जी…लगेच निरोप धाडतो म्हणत पंतानी निरोप लिहायला बसले…!

दरम्यान,सखाराम कडे पाहत काका बोलले…..पंत आम्ही तोवर टकमक
धनगरवाडी गावाकडे जाऊन येतो…

माझ्यासोबत पाच दहा धारकरी दया….मला सर्व व्यवस्था लाऊन परत यावे लागेल संध्याकाळ पर्यंत ..!

जी…लगेच निरोप धाडतो म्हणत पंतानी निरोप लिहायला बसले…!

धारकांनी काकाना मुजरा केला आणि उभे राहिले..!

चला…आता आम्हाला निघावे लागेल असे पंताना म्हणत काका व ते चौघेही उठले.

त्या हेर खात्याच्या केंद्रातून काका,सखाराम व त्याचे सवंगडी आणि सोबत दहा धारकरी घेऊन ते चालू लागले..!

बराच वेळ चालून झाला आणि ती चोरवाट एका जंगलात येऊन संपली…

दरम्यान पावसाचा जोर कमी आला होता.सूर्यकिरणांनी वातावरणात उब निर्माण केली होती.

पशुपक्षी अंग झाडून त्या किरणात अंग शेकत होते…..

आणि हे सारे जंगलातील वाट चालू लागले….

बराच वेळ चालून आता धनगरवाडी रस्त्याला लागणार इतक्यात….

नारायण चा घोडा खिंकाळत त्यांच्या जवळ दौडत येताना सर्वाना दिसला.

सखाराम बोलला.. आर यो तर नारायणाचा घोडा…घर सोडल्यापासून जंगलात गायब झाला होता…..

घोडा त्या चौघांच्या जवळ आला आणि नारायण,सखाराम यांच्याजवळ येऊन शेपटी हलवू लागला.

नारायण ने पुढे होऊन त्याच्या तोंडावस्न, पाठीवरून हात फिरवला.

सखाराम ने पण त्याची पाठ थोपटली.

आश्चर्याने वस्ताद काका बोलले….हा घोडा तुमचा आहे ?

सखाराम उत्तरला ..होय आमचा घोडा,पण जेव्हा आम्ही ओढा ओलांडून टकमक च्या तळाशी जायला निघालो हा कोणाला तरी वियरून गेला आणि दातं तोडून पळाला होता.

पण,आत्ता समजल तो कोणाला भीत होता.

तरी, नारायण म्हणत होता की जनावरांना ते दिसतं जे आपल्याला दिसत नाही.

त्या घोड्याला बराच वेळ कुरवाळत ते सर्वजण पुढे चालू लागले.

बराच वेळ चालून झाला आणि वस्ताद काकांना काहीतरी आठवले..

ते म्हणाले…

सखाराम एक गोष्ट सांग मला…….चांदीची पेटी आणि चंदन हा परवलीचा शब्द तुम्हाला खंडोजी ने सांगितला होता का ?

अचानक प्रश्नाने सखाराम ने काहीसे आठवल्यासारखे केले आणि म्हणाला होय…मला खंडोजीनेच ही पेटी दिली आणि परवली चा शब्द सांगितला.

मोठा श्वास घेत त्वरित काका म्हणाले …..मग उंबर फुल हा परवली चा शब्द तुम्ही आम्हाला सुरवातीला कसा सांगितला ?
तो कोणी दिला तुम्हाला ?

या प्रश्नाने सखाराम सुध्दा चिंतेत पडला आणि काहीसे आठवून तो म्हणाला…

हा शब्द सुध्दा आम्हाला खंडोजीनेच दिला होता.

काय?

कसे शक्य आहे ते?

काका बोलले….

अरे,उंबर फुल हा शब्द फक्त आणि फक्त एकच माणूस देऊ शकतो आणि ते म्हणजे खुद्द बहिर्जी नाईक …..

असे म्हणताच वस्ताद काकांच्या अंगावर काटा उभा राहिला.

बाजींदचा पुढील ४०वा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!