बाजींद भाग ४३

साराह बोलत होती आणि बाजीराव ऐकत होता.

बाजीराव साराह चा निरोप घेऊन विमानतळावर आला.

प्रवासात डोक्यात फक्त आणि फक्‍त एकच विचार घुमत होता…बहिर्जी.

किती मूर्ख आहोत आपण आणि आपले लोक.

साऱ्या जगाला घाबरून सोडणारी मोसाद ही मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्‍ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशदवाद गेली ५० वर्षे सहन करतो आणि सतत अपयशी ठरतो…त्याच्या डोक्यात आग लागली होती.

तो दिल्लीत आला.

परिषदेतील सर्व बाबी त्यांनी अधिकार्यांना सांगून 3 महिन्यांची रजा मागून घेतली.

दिल्लीत बऱ्याच ग्रंथालयात त्याने बहिर्जी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळते का पहिल्री,पण जेमतेम माहितीशिवाय काही हाती लागले नाही.

३ महिन्यांच्या सुट्टीवर तो त्याच्या जन्मगावी पलूस येथे आला.

घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची.


घरी आल्यानंतर त्याला आतुरता होती…….बहिर्जी नाईकांच्या समाधी दर्शनाची. बानूरगड ….

जे पल्रूस पासून वीस-बावीस किलोमीटर वर आहे तो प्राचीन किल्ला.

त्याने सकाळीच बुलेट ला किक मारली आणि थेट बाणूरगड गाठला.

वासरू जसे गाईसाठी कासावीस होते,अगदी तशीच मनाची अवस्था होती बाजीरावची. त्याला कधी एकदा जातो आणि बहिर्जी नाईकांच्या समाधीवर डोके टेकवतो असे झाले होते.

गडाखाली गाडी लावून तो वर चढू लागला.
फारसा उंच नसल्याने काही वेळातच तो गडावर आला.

तिथे समोर भगव्या रंगाने रंगवत्रेला समाधीचा चबुतरा त्याने पहिले आणि धावतच तिथे जाऊन त्याने आपले डोके समाधीवर टेकवले…

असे वाटले की या दगडी चिरेत लपलेल्या अस्थिचे आणि माझे जन्मोजन्मीचे नाते असावे…

त्याने गुडघे टेकले आणि तिथली माती कपाळावर लावली आणि धाय मोकलून रडू लागला…

त्याचे अश्रू गडाच्या मातीत पडते आणि आभाळात ढगांनी गर्दी केली.

जणू त्याच्या दुखात सारा निसर्गच सामील झाला…..सरसर सरी कोसळू लागल्या आणि त्या पावसात बेभान होऊन बाजीराव रडत होता…..!

बहिर्जी नाईक यांची समाधी माझ्या इतक्या जवळची आणि मला त्यांच्याबध्द्लन
काही माहिती नसावे ….

पाऊस थांबला,मात्र बाजीराव चे हुंदके काही कमी होत नव्हते.
तो मनाशीच बोलत होता,किती कमनशिबी आहे मी.

श्रावणातील उन पावसाचा खेळ सुरु होता,क्षणात रिमझिम पाऊस आमी क्षणात ऊन पडत होते.

बाजीराव ने सारा गड पालथा घातला.काही केल्या तिथून त्याचा पाय निघत नव्हता.

सूर्य माथ्यावर आला आणि हताश मनाने बाजीराव गुडघे टेकून समाधीपुढे बसला होता…

तितक्यात पाठीमागून कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला..

दचकून तो सावध झाला आणि उठून मागे पाहू लागला…

मागे वयाची सत्तर-ऐंशी ओलांडलेले एक वयोवृध्द गृहस्थ उभे होते.

धिप्पाड देह,अंगावर मळकटलेले कपडे ,गळ्यात चांदीची पेटी लटकत
होतो,कपाळावर भंडारा लावला होता,डोक्यावर भगवा फेटा बांधला होता, काळेभोर डोळे,पायात जाड कोल्हापुरी पायताण,हातात कानाबरोबर उंचीची काठी आणि सिंहासारखे आयाळ असलेली पांढरी दाढी….

साक्षात काळभैरव भासत होता…,

बाजींदचा पुढील भाग ४४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!