बाजींद भाग ४६

खंडोजी हसला आणि बोलू लागला.

काका…..ही सारी कहाणी घडवली गेली ती बहिर्जी नाईकांनी…..!

मोठा श्वास घेऊन खंडेराय त्याचा भूतकाळ सांगू लागला.

त्या दिवशी तुम्ही मला यशवंतमाचीत भेटायला आलात आणि बहिर्जी नाईक माझ्यावर नाराज आहेत असे सांगून मला त्वरित त्यांची भेट घ्यायला सांगून निघून गेलात…तोवर जे घडले ते माझ्या बुद्धीने घडले.

पण,बार्जिंद ची गूढ ज्ञानाची वही घेऊन मी नाईकांच्या गुप्त ठिकाणी असलेल्या एका गुहेत सुरक्षित ठेवायला गेलो आणि वही ठेवून मी परत यशवंतमाचीत जाणार इतक्यात त्या गुहेत खुद्द नाईक मला भेटले.

जो वृत्तात मी तुम्हाला सांगितला,तोच वृत्तांत मी नाईकांना सांगितला.
बराच विचार करून नाईकांनी मला नियोजन बदलण्यास सांगितले.

आणि त्यानुसार मी चालू लागलो.

मराठ्यांची चिवट फोज जिंकणे साक्षात यमालाही अजिंक्य आहे,मात्र मी भीमाचा वापर करून तुमचा हल्ला परतवल्रा.
भीमाने यशवंतमाचीच्या गुप्त खबरा बाहेर देणे सुरु केले होते,आणि त्यायोगे सावित्रीसोबत लग्नाची स्वप्ने रंगवणे सुरु केले होते हे मना आधीच समजले होते,म्हणून त्याला संपवणे हे गरजेचे होते.

दरम्यान,

बाजिंद चे ते गूढ ज्ञान बहिर्जी नाईकांनी त्याच गुहेत ४-५ दिवस सतत
अभ्यासून आत्मसात केले आणि जेव्हा तुम्ही बाजिंद च्या हल्ल्यात अडकून मरणाच्या दाढेत होता,तेव्हा बहिर्जी नाईकांनी गूळ आवाजात ती जनावरे परत घालवली…आणि गूढ आवाजात बाजिंद ला तू परत तुझ्या जंगलात निघून जा..मी तुझी या जंगलात येऊन भेट घेईन असे सांगितले.

ठरल्या प्रमाणे भीमा बंड करून उठणार हे मला माहित होते,तेव्हा त्याला हाकलून लावून मुद्दाम तुमच्या वाटेला पाठवले आणि त्यानेही तुम्हाला यशवंतमाचीची गुप्त वात दाखवली.

युद्ध पेटणार याची मला कल्पना होतीच..पण राजे येसाजी व सावित्री सोबत त्यांची नेकजात फौज हि स्वराज्याच्या कामी यावी यासाठी आमचा जीव तुटत होता..आणि तुमच्या निकराच्या हल्ल्याने ते शक्‍य झाले.

राजे येसाजीनी शिवरायांच्या पवित्र कार्यात योगदान देण्याचे कबुल केले आणि त्या सर्वाना गुप्त वाटेने मी बाजिंद च्या जंगलात पोहचवले,तिथे ते सुरक्षित होते.

भीमा सारखा हरामखोर स्वताच्या हाताने ठार करण्यापेक्षा बहिर्जी नाईकांच्या आज्ञेनुसार त्याला बेशुद्ध करून काळ्या कपड्यात बांधून त्यांच्या स्वाधीन केला…..पण तो खंडोजी आहे असे सांगून बहिर्जी नाईकांनी मलाच धक्का दिला.

खंडोजी म्हणून भीमाला कडेलोट करून ठार केले ,यशवंतमाची स्वराज्यात आली..पण एवढ्यावर थांबतील ते बहिर्जी नाईक कसले.

रायगड परिसरातील किमान १०० च्या छोटी छोटी राज्ये जे शिवरायांचे नेतृत्व अमान्य करून वैर मिरवत होती ती सारी आज भग्व्या झेंड्याखाली आहेत याचे श्रेय जाते केवळ बहिर्जी नाईकांना.

बाजिंद च्या गूढ विद्येचा वापर स्वराज्यकामी व्हावा ही बाजिंद ची इच्छा
होती..पण खुद्द बाजिंदलाच स्वराज्याच्या कामात आणून बहिर्जी नाईकांनी इतिहास घडवला.

राजे येसाजी शिर्के यांना केवळ यशवंतमाची चे नेतृत्व न देता जिंकलेल्या १०० राज्यांचे अधिपती करून त्यांची ताकत शंभरपट केली.

सावित्री सारखी रणरागिणी स्वता हातात तलवार घेऊन इतके दिवस या गुप्त मोहिमेत आमच्यासोबत लढली….!

खंडेराया बोलत होता,ते ऐकून वस्ताद काकांच्या डोक्यात झिनझिन्या येत होत्या…

डोळ्यात पाणी आणून ते बोलू लागले..

खंड्या,अरे सुरतेची लुट,अग्राहून सुटका यारख्या जीवघेण्या कामगिरीत तू आणि मी सोबत काम केले पण मी तुला समजू शकलो नाही.

बाजींदचा पुढील भाग ४७ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!