बाजींद भाग ५०

आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला.

त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला,की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता.

पण,बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….!

नाईक हसले आणि बोलले…..गड्या,या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे,हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही,म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली.

रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे,पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…!

आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरोबर ना ..?

बहिर्जी नाईक हसत हसत बोलत होते आणि वस्ताद काकांना अश्रू अनावर झाले.
नाईक… .तुमची निष्ठा,तुमची खेळी जगात कुणालाच समजणार नाही
बघा…..तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो हे आमचे नशीब…!

अहो,नशीब काय काका ……या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात शिवाजी नावाच्या परीसाचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले,नाहीतर गावोगावच्या यात्रे जत्रेत सोंग करत भिका मागत हिंडलो असतो….

जे काय आहे त्याचे श्रेय केवळ महाराजांच्या जीवनकार्याला आहे काका.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातून शिवाजी वजा केले तर शिल्लक काहीच उरत नाही.

तुम्हाला इथवर आणणे,

खंडोजी कडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे,

शिक्यांच्या कडून १०० राज्ये स्वराज्यात घेणे

याचा सूत्रधार जो कोणी आहे त्यांचे नाव म्हणजे ‘शिवाजी महाराज’

त्याना विचारल्याशिवाय आणि त्यांच्या आदेशानुसार हा बहिर्जीच काय
स्वराज्यातला अणुरेणु सुध्दा निर्णय घेऊ शकत नाही.

बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूंचा बांध फुटला होता….

तो मनोमन विचार करत होता….

बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूचा बांध फुटला होता….

तो मनोमन विचार करत होता….

आजवर या बाजींद ने उगाच जगाला घाबरवून फुशारकी मारली…..पण,आज कळून चुकले होते…खरे बाजींद तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आहेत.

दूरवर दौडत निघालेल्या महाराजांच्या फौजेकडे तो पाहत होता आणि सोबत मावळत्या सूर्याच्या संधीप्रकाशात भगवा झेंडा फडफड फडकत निघाला होता…..!

मित्रांनो इथेच या कथेचा प्रवास समाप्त होतोय. राजमुद्रा चॅनेल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

ही कादंबरी पैलवान गणेश माणुगडे यांनी लिहलेली आहे. यांची दुसरी कादंबरी धना पण खूप छान आहे. संपूर्ण कादंबरी ही २० भागांची आहे.

धना कादंबरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

12 thoughts on “बाजींद भाग ५०”

  1. दिलीप अनंत कदम

    अतिशय खूप छान आणि सुंदर कथा आहे, वाचताना अंगावर सर दिशी काटा उभा राहतो आणि हळू हळू सुटत जाणार प्रत्येक गोष्टीचा गुंता विचार करायला भाग पाडतो, केवढं ते बारीक प्रत्येक गोष्टीच नियोजन, कथा वाचताना रक्त सळसळून उठते, माझ्या “श्री छत्रपती शिवरायांना” आणि “स्वराजा” ला लाभलेल्या “बहिर्जी नाईक” यांच्या सारख्या सर्वच निष्ठावान मावळ्यांना मानाचा मुजरा त्याच प्रमाणे “राजमुद्रा चॅनेल” चे खूप खूप आभार.

    1. Trilok Bagmare

      अद्भुत,….
      गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा… 🌹🌹
      छत्रपती शिवाजी महाराज
      की जय..🚩🚩 🌹🌹

  2. महेश भुपतवार

    रचनेची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे.
    पुढील कार्यास शभेछा आणि धन्यवाद.

    1. सुनिल रामचंद्र पाटील

      खूपच उत्कंठावर्धकआणि जाज्वल्य इतिहासाचा अभिमान बाळगणारी कथा कथा, याचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून कथा वाचणाऱ्या सर्वांनी आत्ताचे सरहद असलेले हिंदुस्थान अर्थातच आत्ताचे स्वराज्य यासाठी या जीवनात मृत्यूपूर्वी एखादे देशहिताचे कार्य जरूर करावे व आपला खारीचा वाटा उचलावा, आणि निष्ठा बाळगावी, सावध राहावे कारण स्वराज द्रोही आजही असतीलच त्यांचा नायनाट करावा. बाजींद सर्वांनी वहावे… जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंदुस्थान (स्वराज्य )

  3. नितिन चव्हाण

    माझ्याकडे शब्दच नाहीत
    राजे आपणास त्रिवार मुजरा

    जगातील सर्व गुप्त हेरानाचा बाप
    बर्हिजी नाईक आपणास मुजरा

    1. अतिशय सुंदर. रोमहर्षक कथा. अभिमान वाटतो स्वराज्यात जन्माला आल्याचा.
      जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.

  4. Vachtana aasa kontach prasang navta ki mazya angavar kata nahi aala kharach kiti mahan hote aaple Raje shivaji, Bahirji naik aani tyanche mavle manapasun manacha mujra aahe sarvanna..aani ya kadambari chya lekhakanna kharach dhanyavad khup apratim lekhan kela aahe Mala tr vatata ki ya prasangavar chitrapat nakki ch kadhayla pahije..
    Jay bhavani Jay Shivray 🙏🙇

  5. Surendra Rameshrao Mane

    शिवाजी महाराज आणी बहिर्जी नाईक यान्चे चरित्र आपल्या अभ्यास क्रमात अवश्य घ्यायला पाहिजे,,,,,जय शिवराय

  6. Swapnil Sambhaji Dound

    हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या बद्दल एक तरी धडा शालेय पाठ्यपुस्तकात असायलाच पाहिजे यासाठी सर्व शिवभक्तांनी प्रयत्न करायला पाहिजे

  7. बहिर्जी नाईकांसारखा गुप्तहेर समजून घेणे खूप अवघड आहे, हे या कथेतून समजते. अजून असे कितीतरी प्रसंग असतील, ज्यावर अजूनही लिखाण झालेले नाही…. खरंच
    🚩त्रिवार मुजरा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांना🚩

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!