बाजिंद

बाजिंद ही कादंबरी बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची खूप गाजलेली कादंबरी आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर कसे होते ते आपल्याला बाजींद पाहून कळेल.

बाजींद भाग ११

सडसडीत देहाचे,अंगावर,शरीरावर चित्रविचित्र पांढरे पट्टे ओढलेले,केवळ लज्जारक्षणाएवढे कपडे घातलेले ते भिल्ल जमातीचे लोक कमालीचे क्रूर असावेत हे त्यांच्या चेहऱ्यावरुनच दिसत होते…! एकाने पुढे होऊन सावित्रीच्या दंडाला पकडायचा प्रयत्न केला,पण सावित्रीने त्याचा हात वरच्यावर पकडून हिसडा मारला,त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.आपल्या साथीदाराला खाली पडलेले पाहताक्षणी ते भिल्ल बेताल किंचाळत सावित्रीच्या रोखाने धावत सुटले आणि ते …

बाजींद भाग ११ Read More »

बाजींद भाग १२

भिल्ल जाग्यावर गतप्राण झाला.त्याच्या छातीत घुसलेला खंजीर उपसून तो कमरेला लावत खंडोजी ने त्याला खाली ठेवले.सावधपणे चौफेर नजर फिरवत खंडोजी विचार करु लागला……”बाजींद”…काय असेल हे बाजींद…? एव्हाना सुर्य मावळतीकडे झुकला होता,संध्याकाळच्या संधीप्रकाशाने जंगलातील झाडे झुडपे सुवर्णाची झळाळी मारत होती..!एक दीर्घ श्वास घेऊन खंडोजी ने पायात घुसलेल्या बाणामुळे झालेल्या जखमेची वेदना सहन करत त्याला जंगलातील पाला …

बाजींद भाग १२ Read More »

बाजींद भाग १३

“चंद्रगड” एक हजार दोन हजार लोकवस्तीचे गाव.महाबळेश्वर महादेवाच्या घनदाट अरण्यातील शेवटचे टोक.सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बिकट अडचणीत वसलेले हे गाव.अशा घनदाट अरण्यात राहण्याचे धाडस केवळ वाघातच असते.चंद्रगड ची माणसे पण काही वाघापेक्षा कमी नव्हती.अश्या हजार दोन हजार वाघांचा म्होरक्या होता चंद्रभान सरदेसाई..! बाराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त झाल्या आणि सर्व महाराष्ट्रावर जणू अवकळा पसरली.राजे रामदेवराय …

बाजींद भाग १३ Read More »

बाजींद भाग १४

समोर काय आक्रीत घडत आहे हे खुद्द बाजी ला सुद्धा समजत नव्हते.केवळ कुतूहल,करमणूक म्हणून वन्य प्राण्यांशी आजवर त्याने संवाद साधला होता,ते वन्य प्राणी आज त्याच्यासाठी धावून आलेच पण चंद्रगड वर आलेल्या अस्मानी संकटाला त्याच्या पायाशी लोळण घ्यायला लावत होते हे पाहून तो मनोमन थक्क झाला होता…! एक श्वास घेत त्याने समोर गुडघे टेकून तलवार दोन्ही …

बाजींद भाग १४ Read More »

बाजींद भाग १५

वर्षानुवर्षे पावसाच्या केवळ एका थेंबाची तहान घेऊन आसुसलेल्या जमिनीवर एकाकी धुव्वाधार पावसाने सुरवात करावी,जमीनीच्या धुंद सुवासाने आसमंत दरवळून जावा आणि सारी सृष्टी तृप्त व्हावी…अगदी असेच काहीसे नुराजहाँ आणि बाजी च्या अंतर्मनात घडत होते.एक आनंदाची अनामिक लकेर त्यांच्या सर्वांगात उठली होती.एकमेकांच्या मिठीत स्वर्गीय सुखे अपुरी पडावीत अशी अवस्था….! असेच काही क्षण गेले अन बाजी भानावर आला,त्याने …

बाजींद भाग १५ Read More »

बाजींद भाग १६

चंद्रगड ची खरी दौलत म्हणजे ही जनावरे आहेत…या सर्वांची भाषा मला समजते.यांचे सुख दुःख सर्वकाही हे मला सांगतात व मी त्यांची माझ्या माझ्या परीने मदत करतो..!खूप मजा येते यांच्यासोबत जीवन जगण्यात…! यावर आश्चर्य व्यक्त करत नुराजहाँ बोलली…पण राजसाहब…या हिंस्त्र पशूंची भाषा तुम्हास कशी काय अवगत आहे ?खरोखर हा केवळ चमत्कार आहे.एखाद्या देवदूतालाच ही भाषा समजु …

बाजींद भाग १६ Read More »

बाजींद भाग १७

भाग १७ वा हुंदका देत रडत असणाऱ्या सावित्रीच्या खांद्याला धरत खंडोजी निर्धारी शब्दात बोलला…. सावीत्री….रडू नको.हा खंडोजी तुझ्या सोबत असताना बाजींद काय..साक्षात यम जरी आला तरी त्याला चार हात करावी लागतील या खंडोजी बरोबर…! शिवछत्रपतींचा धारकरी आहे मी,आम्हाला भुते लागत नाहीत…उलट भुतानाच आम्ही लागतो.या खुळचट मनाच्या कल्पना असतात साऊ… असे म्हणत खंडोजी ने तलवार उपसली …

बाजींद भाग १७ Read More »

बाजींद भाग १८

खंडोजी ने एक दीर्घ श्वास सोडला आणि त्या चौघांकडे एक दृष्टिक्षेप टाकला.सर्जा,सखाराम,नारायण आणि मल्हारी गंभीर पणे खंडोजी भूतकाळ त्याच्याच तोंडून ऐकत होते..! एव्हाना खूप दूर आपण चालत आलो आहोत याची जाणीव त्या पाचही जणांना झाली. सखाराम बोलला….खंडोजीराव,तुमची कथा लईच भारी वळणावर गेली हाय गड्या.जित्रापांच आवाज बी वळकता येत्यात हि मातूर नवालच हाय…! नवाल ?नवाल नव्हे…महाआश्चर्य …

बाजींद भाग १८ Read More »

बाजींद भाग १९

सुर्यकांत ने जाणले की बाजींद जिवंत आहे.त्याने धावत जाऊन पाणी आणले आणि बाजींद ला पाजले….बाजींद ने डोळे किंचित उघडले…एक क्षण त्याने सुर्यकांत कडे पाहिले…बाजूला गतप्राण होऊन पडलेल्या नुराजहाँ कडे पाहिले…त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या…..त्यांने क्षणात गळ्यात बांधलेला ताईत काढला व तो सुर्यकांत च्या हातात ठेवला….एका विलक्षण अपेक्षित नजरेने तो त्याच्याकडे पाहत होता आणि डोळे उघडे …

बाजींद भाग १९ Read More »

बाजींद भाग २०

मोठ्या कुतूहलाने त्याने पहिले पान उघडले…तो वाचू लागला…वाचू लागला….आणि वाचतच राहिला…! निमिषें,पळे, घटिका भूतकाळात विलीन होऊ लागल्या..तहान भूक विसरुन तो सर्वांगाने जणू डोळे करुन ती वही वाचू लागला…!पहिला दिवस संपला… दुसरा…तिसरा…चौथा….पाचवा…! तब्बल पाच दिवस तो आणि ती वही जणू एकरूप,एकजीव झाले होते…! जेव्हा तो भानावर आला…तेव्हा त्याच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या…अंगावरील रोमरोम पुलकीत झाले होते..! …

बाजींद भाग २० Read More »

error: Content is protected !!