छत्रपती शिवाजी महाराज इतिहास भाग ०४
शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्म लखुजीराव यांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लोकर उठ्॒ शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे …