छत्रपती शिवाजी महाराज दिनचर्या Daily Routine of shivaji maharaj

शिवाजी महाराजांची दिनचर्या : lets disuss the daily routine of shivaji maharaj

शिवाजी महाराजाचे कोटुंबिकजीवन कसे होते याबद्दलची निश्‍चित तपशीलवार माहिती मिळत नाही. महाराजांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन चिटणीस बखरीत आहे ते पुढीलप्रमाणे :-

“ उषःकाली उठावे, ते समयीं गायक यांनी स्तुती पाठ करावे, वीणा, मृदंग इत्यादीमंगल वाद्ये, नगारखाना यांचे श्रवण करून उठावे. काही प्रातःस्मरण करून शोचविधियुक्‍त करावा. नंतर गोसेवन दर्शन, मंगलालंभन करून स्नानगंगादी महानदी उदके (उदके घालून) करावे. जपध्यान व देवतार्चन करावे.

ते समयी सर्व शिष्ट ब्राह्मण सभा पंडीत यांनी धर्मचर्चा करावी. पुराण श्रवण करून चार घटका दिवसास तिलक, वस्रे अलंकार भूषणे घेऊन तिरंदाजी ब निशाण एक घटका करून सभेस यावे. तेथे सर्व कार्यकर्ते, कारभारी वगैरे यांनी आपआपली कार्ये विचारून करावी. जे जे दर्शनास येतील, त्यांजकडे कृपायुक्‍्त अवलोकन करून त्यांचे मुजरे घ्यावे.

कोणाकडे अवलोकन करून किंचित हास्य करावे, कोणाशी काही भाषण करावे, कोणास कार्य सांगाबी ऐसी सर्वांची अंत:करणे वेधून घ्यावी. सर्वांस भासावे जे माझे ठायीं कृपा विशेष आहे. ऐसा सर्वत्र आले त्यांचा गौरव कराबा. दहा घटका दिवस आलियारी दोन-चार घटका विवित्त स्थानी ज्याचा करणे त्याशी मंत्र बिचार करावा.

बारा घटका दिवसास (ब्राह्मण) भोजनाचे उदक सोडून नेवेद्य करून सर्व पंक्तिभोजन करणार यासह वर्तमान भोजन करावे. आणि तांबूळ घेऊन चार घटका मंत्र सभेचे ठायी पत्रे आली ब पाठवणे ती अवलोकन करणे व कार्य योजना ब मागील दिवशी आयव्यय झाला, दुसरे दिवशी
किती करणे हे पाहून चार घटका अंतःपुरात वामकुक्ष करावी.

बारा दिवस घटका राहाता पुन: सभेस येऊन सर्व कारखाने, महाल यांची चौकशी पहाणे, आपण जाऊन करावे. सभा भरून न्याय मनसुबी जाली केली ती अवलोकन करून दाद फिर्याद मनास आणावी.”

शिवाजी महाराज दिनचर्या

“ सहा-चार घटका दिवस राहाता बाहेर स्वारी बाग, आराम देवालये अथवा कारखाने यांत जावी. घोडा फेरणे, बोथाय्या वगैरे खेळून सांयकाळ जाला असता येऊन सभेस बसून सर्वांचे मुजरे घेऊन दोन घटका रात्री जपध्यान करून काही पुराण व दासबोध

बिचार करून भोजन करावे. तांबूळ घेऊन सभेस दोन घटका बसोन कारभार एकांतीचार घटका बसावे, बातमी, नाजुक कामे, पत्रे आली ती व द्रव्याची, धान्याची निरख हे श्रवण करून अंतःपुरात जावे.”

शिव भक्तांनो ही होती शिवाजी महाराजांच्या दिनचर्या..

शिवाजी महाराजांची दुसरी पण एक राजमुद्रा होती ती पाहण्यासाठी पुढील लिंक वर जा. LINK

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!