धना भाग ०६

अश्रुनी डबडबलेले डोळे पुसत सुर्याजी बंदूक सावरत गाडीतून खाली पायउतार झाला.


आज बऱ्याच दिवसांनी खपली धरलेल्या जखमेचा टवका उडाला होता.


जखमा किती जरी भरुन आल्या असल्या तरी जखमांचे व्रण कधीच भरुन येत नसतात.
ज्या वाघाला आयुष्यातुन काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय तोच वाघ नशीब पुन्हा पुन्हा आयुष्यात आणत आहे.


राजलक्ष्मी ला पाहुन सूर्याजीचा विसरलेला भुतकाळ पुन्हा जागा झाला,सूर्याजीचे अश्रु थांबेनात,तो एकटाच छावनी पासून दूर चालत तलावाकडे जाऊ लागला.


एक एक दिवस वर्षासारखा त्याने काढला होता.


वन खात्यात सेवेत येऊन मन तर रमत होते पण मनात खोलवर कितीतरी जखमा दबल्या होत्या हे त्यालाच ठावुक होते.


त्या नरभक्षक वाघाला केवळ बाहुबलाने ठार मारणारा “धना” विषयी सूर्याजीला विलक्षण प्रेम वाटू लागले.


माझ्या सुवर्णाला मी सुध्दा वाचवु शकलो असतो,का नाशिबाने माझ्याच वाटेला हे दुःख दिले?

सूर्याजीला रडू आवरेना.
हुंदका देवून देवून तो रडू लागला. पाच वर्ष दबलेल्या दुःखाचा बांध फुटला होता.
सूर्य अस्ताला गेला..संधीप्रकाशाच्या छायेत,सुर्याजी भुतकाळात हूंदस्फन्दुन रडत होता…त्याला सावरायलाही कोणी नव्हते…!!

पाटलांच्या वाडयात सकाळ सकाळीच् कोल्हापुर च्या मोठ्या कुस्ती भोसले ठेकेदारांची मोटरगाडी येऊन थांबली होती.


गावातील मान्यवर,वस्ताद,पाटिल आणि ठेकेदार यांची 2 तास चर्चा सुरु होती पण कोणालाच उत्तर मिळेना..!


धनाजी आणि उत्तरेचा मोठा मल्ल बिल्लासिंग याची 6 महिन्यापूर्वीच कुस्ती ठरली होती.


मोठमोठ्या उद्योगपती,व्यावसायिक आणि ठेकेदारानी या दंगलीसाठी लाखो रूपये लावले होते.
कुत्यांच्या तिकीटि छापून तयार होत्या,दोन महिन्यावर मैदान आले होते.


मैदानाची रंगरंगोटी पूर्ण झाली होती.
पण धनाजी आणि वाघाची जी मुतभेड झाली तो सबंध पश्चिम महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला होता..!


धनाने जे केले ते बिल्ला पंजाबी ला पराभूत करण्यापेक्षा मोठे काम होते पण आता बिल्ला सोबत लढणार कोण ?
महाराष्ट्र विरुध्द पंजाब अशी इज्जत पणाला लागली होती.


ही कुस्ती रद्द होने अशक्य होते..!


चर्चा रंगाला आली आणि तितक्यात सुर्याजी वन खात्याच्या मोटारगाडीतून पाटलांच्या वाड्यावर आला.


रात्री जागून त्याने धना निर्दोष असून वाघावर डोंगराची दरड कोसळून त्याचा मृत्यु झाला असे कारण लावून पंचनामा पूर्ण केला होता.


तो कागद पाटलाना देवून सुर्याजी पण गाव सोडून जायच्या तयारीने आणि राजलक्ष्मी ची शेवट भेट घडते का हां उद्देश् ठेवून आला होता.
सुर्याजी वाड्यात आला आणि मान्यवारांची चर्चा थांबली…सर्व उठले आणि आदराने सुर्याजी चे स्वागत केले..!


सुर्याजी बसला…!
डोक्यावरील टोपी काढली,आणि हातातील फ़ाइल सावरत पाटलाना म्हणाला
“पाटिल धनासारखा शुर माणूस तुमच्या गावात आहे ही तुमच्या गावाच्या वैभवाची गोष्ट आहे,तो निर्दोष आहे असा अहवाल मी केला आहे “

सूर्याजीचे बोलने एकताच भोसले ठेकेदार आश्चर्याने उदगारले…!


“तुम्ही सातारा जाधववाड़ी चे सुर्याजी पैलवान ना?”


सुर्याजी आणि उपस्थित मंडळीना आश्चर्य वाटले की ठेकेदार वन अधिकारी साहेबाना कसे ओळखतात ?


भोसले ठेकेदार म्हणाले ,पाटिल अहो हे फार नामांकित पैलवान होते,एक काळ असा होता साऱ्या महाराष्ट्रात हे एक नंबर चे मल्ल होते.


यांची हिन्दुस्थान ची सर्वात मोठी कुस्ती पंजाबी मल्ला सोबत होती 5 वर्षापुर्वी पण मैदान मोडले होते…!


पण सुर्याजी तू अचानक कसा काय बंद केलीस कुस्ती ?


सारा महाराष्ट्र तुझी कुस्ती पहायला वेडा व्हायचा,तुझी कुस्ती घेणारा ठेकेदार रातोरात लखपती व्हायचा.
अचानक सुर्याजी नावाचे वादळ का थांबले..!


पाटिल आणि वस्ताद यानी आश्चर्यकारक मुद्रेने ते संभाषण ऐकले.


सुर्याजी किंचित हसला आणि म्हणाला “वस्ताद,तो सुर्याजी संपला 5 वर्षापुर्वी..एक वादळ आल आणि त्या वादळात माझ सगळ सगळ गेल,आता उरलाय फक्त हाड़ामासाचा गोळा”
असे बोलून सुर्याजी जायला निघाला.


पाटिल थोड़ी कामें,एक दोन ठिकाणी पिंजरे लावले की आज आमचे काम संपेल,उद्या आम्ही निघु..चुकभुल क्षमा असावी..!
सुर्याजी बाहेर पडला,वाड्याच्या वरच्या मजल्यावरून हां सर्व संवाद राजलक्ष्मी ऐकत होती..तीला खुप वाइट वाटले,परवा रागाच्या भरात ती सूर्याजीला काहीपन बोलली होती.


तीला सूर्याजीला भेटून माफ़ी मागितली पाहिजे असे वाटले..!


तिने तळ्याजवळ च्या महादेव मंदिराला जाण्यासाठी मैत्रिणीला सोबत घेऊन पाटलाना सांगून ती बाहेर पडली.
वाड्यात पाटलानी तिच्यासोबत 2-3 नोकर पाठवून दिले व मगाची कुस्तीची चर्चा पुन्हा सुरु झाली..!


भोसले ठेकेदार म्हणाले,पाटिल एक बोलू का ?
पाटिल म्हणाले हो “बोला वस्ताद”
आपल्या पंचक्रोशिचि अब्रु फक्त एक माणूस वाचवु शकतो..आणि तो आहे सुर्याजी..!

काय ?


सर्वजन आश्चर्य व्यक्त करू लागले.


होय पाटिल,सुर्याजी जाधव काय पैलवान होता हे मला ठावुक आहे,अहो भल्याभल्या सुरमा मल्लांच्या छातीवर बसून कृष्णेचे पानी पाजले आहे त्याने..!


वस्ताद 2 महीने उरलेत,सूर्याजीला काही करुन जर आपण ही कुस्ती लढ यासाठी तयार करु शकलो तर पैसा,प्रसिध्दि,गावची अब्रु सर्व वाचवु शकु नाहीतर पुढच्या 10/15 वर्षात आपली कुस्ती क्षेत्रात नाचक्की होणार आहे…!


पाटिल आणि वस्तादाना हे बोलने पटले,पण सुर्याजी ची ओळख तर केवळ 3 दिवसांची,त्यात ते सरकारी मोठे साहेब..!
कोण बोलणार त्याना,आणि तो का 5 वर्षे सोडलेला लंगोटा आपल्यासाठी पुन्हा लावेल ?


सर्वाच्या पुढे मोठा यक्षप्रश्न पडला होता..!

तलावाच्या उगवतीच्या उजव्या जंगला दाट जंगल जाळी आणि पाण्याची आयती दरी असल्याने वाघासारखे हिंस्त्र जनावर त्यामार्गे गावात प्रवेश करु शकत होते,या प्राथमिक अंदाजावरुन सुर्याजी ने त्याबाजुला फास पिंजरे लावण्याचे आदेश दिले होते.


पाटलांच्या घरातून तो थेट तिकडेच गेला होता..!
तिथून अगदी हाकेच्या अंतरावर महादेव मंदिर होते.
पाटलांची मुलगी राजलक्ष्मी आणि तिच्या मैत्रिणी सोबत 2 बंदूकधारी नोकर मंदिरात आले.


राजलक्ष्मी ने पुजार्याला बोलावून पुजेचे साहित्य देवून पूजा पार पडली आणि बाहेर येऊन नोकराना तळ्यातुंन दोन घागरी पानी आणायला धाडले..!


राजलक्ष्मी सुर्याजी कुठे दिसतो का ते पाहू लागली आणि दूरवर तीला सारा सरंजाम पिंजरा लावताना दिसला..!
तिने मनोमन विचार केला आणि पायात चप्पलही न घालता सूर्याजीला भेटून माफ़ी मागायला ती निघाली..!


सुर्याजी कामात मग्न होता,त्याला मंदिराकडून स्त्री येताना दिसू लागली..त्याने अंदाज बांधला की ही राजलक्ष्मी तर नसेल ?
हो,तीच आहे..जिला एक क्षण भेटायला आतुर होतो ती स्वता इकडे येते हे पाहुन सूर्याजीला आनंद गगनात मावेना..!


तो तड़क तिच्याकडे जाऊ लागला..!
सुर्याजी आणि राजलक्ष्मी समोरासमोर आली.


ही दूसरी भेट,पण असे वाटत नव्हते की दुसऱ्यांदा भेटत आहेत..कुठेतरी जुनी ओळख असावी असे काहीसे वाटत होते दोघांनाही..!
आपण इकडे ?..सुर्याजी बोलला..!


मान खाली घालत आणि किंचित लाजऱ्या शब्दात राजलक्ष्मी बोलली..मी माफ़ी मागायला आले आहे,परवा मी तुम्हाला नाही नाही ते बोलले,पण तुम्ही धनाजीरावाना गुन्हा बसु न देता मुक्त केले..तुमचे अनंत उपकार झाले माझ्यावर…!


सूर्याजी शांतपणे ऐकत होता,तो बोलला की उलट मला क्षमा करा,धना ला पाहिले नाही पण सारा गाव त्याचे कौतुक करतोय.
इतका धाडसी माणूस माझ्या पाहण्यात हां पहिलाच..!


मी एक गोष्ट वीचारु ?


सूर्याजीने राजलक्ष्मी ला प्रश्न केला ..!
राजलक्ष्मी ने होकारार्थी मान हालवली..!


“धना” कोण तुमचा ?
या प्रश्नाने राजलक्ष्मीच्या काळजाचा ठाव घेतला,तीचे सर्वांग शहारले…तीला काय बोलावे सूचेना…
ती गड़बडीत बोलली..मला जायला पाहिजे साहेब,खुप वेळ झाला मंदिरात येऊन..!


दोन्ही हात जोडून ती झपझप पावले टाकत निघुन गेली..!
सूर्याजीला काही समजले नव्हते..!


रात्र झाली..राजलक्ष्मी ला झोप लागेना,तीला केवळ आणि केवळ धनाची ओढ़ होती…,
सुर्याजी छावनी बाहेर पहुडला होता, त्याला राजलक्ष्मी चे ते जातिवंत सौंदर्य एकसारखे आठवत होते आणि त्यात तो सुवर्णा शोधायचा प्रयत्न करत होता…!


आणि इकडे वस्ताद आणि पाटलाना झोप नव्हती..गावची इज्जत,अब्रु जर राखायची असेल तर जमेल त्या किमतीवर सूर्याजीला पुन्हा कुस्तीसाठी तयार करावेच लागणार होते….!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

धन्यवाद
पै.गणेश मानुगड़े
कुस्ती मल्लविद्या

1 thought on “धना भाग ०६”

  1. Pingback: धना भाग ०५ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!