धना भाग ०७ dhana bhag 07

सुर्य उगवला आणि सुर्याजीच्या सोबत आलेल्या वन खात्यातील सहकार्यानी छावनी काढून सर्व साहित्य गाडीत भरायला सुरु केले.
पाटलांच्या वाड्यावरील 2 माणसे सकाळीच् सूर्याजीला वाड्यावर बोलावले आहे असे सांगायला आले होते.
सुर्याजी तिकडे जायला निघाला.
रात्रभर त्याला झोप नव्हती.राजलक्ष्मी तिच्या चेहऱ्या समोरून जात नव्हती.


गावातून त्याचा पाय निघत नव्हता,एक विलक्षण गोडी त्याला या गावाची लागली होती.
वाङा आला.
वाड्यात पाटिल,वस्ताद व गावची मातब्बर मंडळी “कुस्ती”या विषयावर खल करत बसली होती.
सुर्याजी आला.


सर्वजन त्याला आगत्याचे बोल बोलून चहापान झाले.
सुर्याजी बोलू लागला…
पाटिल आम्ही निघतो आता,धना ला भेटायला येइन एक दिवस,या गावाने खुप लळा लावला आहे..इथून जाऊच वाटेना..पण काय करायच.सरकारी नोकरी आहे,जावे तर लागेलच..!
पाटिल धीरगंभीर आवाजात बोलू लागले.


साहेब,तुम्हाला एक विनंती करायची आहे म्हणून आज वाड्यावर बोलावून घेतले आहे.
धना च्या आकस्मित जखमी होण्याने आमच्या गावची इज्जत पणाला लागली आहे.ठेकेदार मंडळी लाखो रु.गुंतवून बसली आहेत.
सुर्याजी प्रश्नार्थक मुद्रेने सर्वांचे ऐकू लागला.


पाटिल बोलले..पंजाब चा मोठ्ठा मल्ल बिल्लासिंग यांच्याशी धनाची 6 महिन्या मागे कुस्ती ठरली आहे,पण आता तो साऱ्या गावासाठी जायबन्द होवून इस्पितळात आहे.
अशा वेळी धनाच्याच् तोलामोलाचा कोणी या कुस्ती साठी जर उभा राहिला तर गावची इज्जत वाचेल..!
साहेब ,भोसले ठेकेदार यानी तुमची कुस्ती कारकीर्द आम्हाला सांगितली.
आमच्या गावच्या अब्रुपायी तुम्ही पुन्हा लंगोट लावाल काय ?
हे ऐकताच सुर्याजीच्या हृदयाचा ठोकाच् चुकला…पुन्हा कुस्ती ???
एका क्षणात त्याला भुतकाळ आठवला..!
सुर्याजी म्हणाला…पाटिल हे काय बोलता तुम्ही ?
मी सरकारी नोकर,कुस्ती सोडून 5 वर्षे झाली,मला कुस्ती हे नावसुध्दा ऐकायला नको वाटते,मला नका या यक्षप्रश्नात पाडु पाटिल..मी जर पुन्हा लंगोट लावला तर मला कोणीच रोखु शकणार नाही,मी जगु नाही शकणार पाटिल..!
पाटिल कुस्ती माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे,तीला सोडून मी 5 वर्षे कशी काढलेत कशी सांगू तुम्हाला ?


पाटिल बोलले…साहेब या पंचक्रोशीत आम्ही कधी कुणाचे उपकार घेतले नाहीत पण गावच्या इज्ज़ती साठी मी पदर पसरतो तुम्हाला…हे ऐकून स्वयंपाक घरात उभी असलेली राजलक्ष्मी बाहेर आली आणि पाटलाना बोलू लागली..”आबा…हे काय करताय तुम्ही ?
तीला वडिलांचा तो सुटलेला स्वाभिमान नाही सहन झाला..!
सुर्याजी राजलक्ष्मी कड़े पाहत पुन्हा पाटलांच्या चेहऱ्या कड़े पाहू लागला…
तो बोलला..पाटिल 2 महिन्यात मी पुन्हा तयारी करेन असे मला वाटत नाही..पण तुमच्या मर्जी खातर मी तयार आहे कुस्ती साठी..मी 3 दिवस जिल्ह्याला जातोय..तिथून रजा काढून मी सरावाला येतो..!


हे ऐकून राजलक्ष्मी,पाटिल व् वस्ताद तिघेही आनंदाने बेभान झाले..!
राजलक्ष्मी ने साखर आणून सर्वाना वाटली..!
मोठ्या आनंदात सुर्याजी शहराकडे निघाला.
5 वर्षानंतर सुर्याजी हसत होता..मनातील दुःखाचे ढ़ग वीरु लागले होते…!!!

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या इस्पितळात धना उपचार घेत होता.
धनाला 4 दिवसांनी मध्यरात्री जाग आली.
त्याला जाणवले की त्याच्या सर्वांगावर पट्टया बांधल्या आहेत.
हातात सलाइन लावली आहे..!
धनाच्या जखमा भरायला सुरवात झाली होती त्यामुळे कळा कमी होत्या मात्र अंगातून प्रचंड रक्त गेल्याने तो अशक्त झाला होता..!
धना 4 दिवस शुध्द नव्हती.अचानक त्याला ती काळरात्र आठवली..!
सरसर सरसर साऱ्या गोष्टी स्मृतीपटलावर उमटु लागल्या.


तो नरभक्षक वाघ.राजलक्ष्मी ची आठवण,तोंडावर आलेली कुस्ती सारे आठवले…वाघाला हाताने मारलेला प्रसंग आठवला आणि पुढचे काहीच आठवत नव्हते..!
धनाने पटदिशी डोळे उघडले..आसपास पाहिले कोणीही नव्हती.
धना धड़पडून उठला.
हातातील सलाइन उपसल्या..!
मांड्या आणि पाठीवर असलेल्या जखमा अजूनही ताज्याच् होत्या…!
धना दोन्ही पायावर उभा राहिला आणि धड़पड़त भिंतीवर लावलेल्या कलेंडर वर आज किती तारीख असावी पाहू लागला.
घडयाळात रात्रीचे 2 वाजून गेले होते..!


बाजूच्या खिडकितुन बाहेर पाहिले तर धनाला समजले आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आहोत.!
तो सावध झाला,आता सकाळी गावी जायचे,राजलक्ष्मी ला भेटायचे,कुस्तीही जिंकायचीचअसा विचार करुन तो करत पुन्हा अंथरुणाकड़े यायला निघाला.
पण तितक्यात खिड़कितुन 2-3 धिप्पाड देह आत आले,याची जाणीव धना झाली म्हणून तो मागे वळणार इतक्यात त्या दोघांनी धना बेशुध्द करायच्या द्रव्याचा बोळा तोंडाला लावला अन धना बेशुध्द झाला.
सोबत आलेल्या काळ्या वस्त्रात धना ला गुंडाळले आणि एकाने धनाला खांदयावरते घेतले…!
ते 3 जण खिड़की वाटे बाहेर पडली…अर्धा फर्लांग अंतरावर 20/25 असेच धिप्पाड देहाची माणसे मोटरगाड़ी घेऊन उभी होती.
धना त्या गाडीत घालून ती घेऊन गेली..!
धना जेव्हापासून इस्पितळात आला तेव्हापासून काही माणसे तिथे पाळतीवर होती…!
कोण होती ती धिप्पाड माणसे ?
धना ला का उचलून नेले त्यानी ?
नेमके काय हवे होते त्याना धना कडून ?

हे सर्व फक्त त्या लोकानाच् माहिती होते..!
त्या लोकांचा म्होरक्या धिप्पाड देहाचा,कल्लेदार मीशांचा आणि गरुडासारख्या धारधार करारी नजरेचा होता..!!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “धना भाग ०७ dhana bhag 07”

  1. Pingback: धना भाग ०६ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!