धना भाग १२

“धना”

भाग १२ वा

धनाने बिल्लाच्या सर्व कागदपत्राची तपासणी करून ओळखपत्र पाहिले.
उर्वरीत ४ साथीदार आणि धना सकाळीच कोल्हापुरात पोहचली.
कुस्ती उद्या होणार होती.
धनाने दाढी ठेवली होती.कलेक्टर कचेरीत जावून धनाने आपण बिल्ला पंजाबी आहे असे सांगितले.
त्वरित त्याच्या विश्रांतीची व राहण्याची स्वतंत्र यंत्रणा करण्यात आली आणि पाहता पाहता सर्व कोल्हापुरात समजले कि पंजाबी मल्ल कोलाह्पुरात दाखल..!
धनाने विश्रांतीगृहात जावून ४ साथीदारासोबत गुप्त बैठक घेतेली..!
धना बोलला ..गड्यांनो..मला उद्याची कुस्ती बिल्ला म्हणून जिंकायची आहे.
मी सर्वाना फसवू शकतो,पण स्वताला नाही.
माझे वस्ताद म्हणजे माझे वडीलच आहेत ,ते समोर आले कि आपण सारे त्यांच्याशी बोलण्यात गुंतवा त्याना ..बाकी मी सारे पाहून घेतो..!
धनाने हुबेहूब पंजाबी मुंडासे डोक्याले बांधले,पांढरीशुभ्र पंजाबी पैरण घातली ,धनाने आधीच दाट दाढी व मिश्या राखल्या होत्या ,त्याला माहिती होते कि मागच्या वेळी बिल्ला ला दाढी व मिश्या नव्हत्या ,हा प्रश्न विचारताच काय उत्तर द्यावे हेही त्याने ठरवले होते..!
सायंकाळ झाली …कुस्तीचे मुख्य भोसले ठेकेदार व सोबत ३-४ पैलवान आणि कोल्हापूरचे प्रतिष्ठीत मान्यवर हातात पुष्पगुच्छ घेऊन बिल्लाचे स्वागत करायला आले..!
धनाने मोठ्या पंजाबी ढंगात सर्वांचे चरणस्पर्श करत बैठक घेतली..!
ठेकेदार म्हणाले …पेहेलवान जी आप तो एक बहुत जल्दी आ गये ,हमे लगा था शाम तक आप पहुचें.?
यावर धना बोलला..जी हा लेकीन कराड से यहा तक हमे ट्रेन मिल गयी ,सोचा कुश्ती से पहले थोडा आराम हो जायेगा ..!
यावर ठेकेदार बोलले ..अच्छी बात है ,कल सुबह मै खुद कलेक्टर साहब को लेकर आपको लेने आऊंगा …तब तक आराम किजीये ..!
धना हसला आणि सारे मान्यवर निघून गेले..!
सर्व खुश झाले ,बिल्लाचे सोंग व्यवस्थित वठले होते …!

इकडे धनाच्या गावात सूर्याजीने सुध्दा आधल्या दिवशी वस्ताद काकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता..!
बिल्लाच्या सार्या खुबी वस्ताद काकानी सूर्याजीला सांगून त्याच्या तोड हि शिकवल्या..!
वस्ताद बोलले…पोरा….हात पाय राखून लढ..बिल्ला घातकि आहे.
रात्री उशिरा वस्ताद काका पाटलांच्या वाड्यावर सूर्याजीला भेटायला आले.
जेवण उरकले आणि गावातील प्रतिष्ठीत मान्यवर,पाटील,सूर्याजी आणि वस्ताद अशी पानसुपारीची बैठक पाटलांच्या वाड्यावर रंगली …!
पाटील बोलु लागले …
साहेब,तुमचे उपकार आम्ही सारे गावकरी कसे फेडू समजेना ….कुस्तीचे हारजीत काहीही होवो पण तुम्ही आम्हाला विकत घेतले तुमच्या उपकाराने …’
स्मितहास्य करत सूर्याजी उत्तरला ..नाही पाटील ,उलट तुमच्यामुळे मला माझी गेलेली ५ वर्षे पुन्हा जगायला मिळाली …..थोडासा उसंत घेत सूर्याजी बोलला…पाटील आणखी एक सांगायचे होते ..!
पाटील बोलले…संकोच न करता बोला साहेब,आपले बोलणे आमच्यासाठी आज्ञा असेल…”
सूर्याजी बोलला ..असे नका म्हणू पाटील…!
तुमच्यामुळे मी पुन्हा कुस्ती खेळू लागलो,पण आणखी एक गोष्ट अशी होती कि….कि मला राजलक्ष्मी चा हात हवा आहे …!
पाटील धना आणि राजलक्ष्मी चे सारे कथानक मला ठावूक आहे,पण आज २ महिने होत आले धना सापडत नाही …मला माहित आहे राजलक्ष्मी ने रडून रडून आपली अवस्था वाईट केली आहे.
आपली परवानगी असेल तर तिला मला जगातील सर्व सुख द्यायचे आहे …!
यावर वस्ताद काका,गावातील मान्यवर आणि पाटीलसुध्दा मनोमन आनंदले …!
पाटलानी तर हातच जोडले ….आणि गावकार्यांच्या कडे पाहू लागले ..!
पण राजलक्ष्मी ला कसे समजवायचे ?
वास्तदानी सुध्दा आम्हाला हे मंजूर आहे असे काबुल केले …!
वरच्या मजल्यावरून राजलक्ष्मी हे सर्व ऐकत होती …तिची अवस्था चहुबाजूनी पुरात फसलेल्या झाडासारखी झाली होती …धड बाहेर पडता येत नव्हते आणि धड पुरासोबत वाहू शकत नव्हती..!
रात्री पाटलानी तिची भेट घेतली..तिने पाटलांना मिठी मारली आणि केवळ रडू लागली.
पाटील म्हणाले…पोरी…धना असता तर तुझा हात मी स्वताहून त्याच्या हातात दिला असता ,पण तो कुठे गेला देव जाणे …पोरी सूर्याजीराव चांगला माणूस आहे….मला तुला अजून दुखात नाही पाहायचे..!
राजलक्ष्मी केवळ आणि केवळ अश्रू ढाळन्याशिवाय काहीच करू शकत नव्हती.
आबांना धना कुठे आहे सांगावे तर वाचन आड येत होते ,आणि न सांगावे तरी धना असूनही मिळणार नव्हताच …केवळ निशब्द अश्रू….!!!!

दिवस उगवला,सहस्त्रोसुर्यनारायण अजस्त्र प्रकाशकिरण वृष्टी पृथ्वीवर करू लागले ..!
सोनकिरणांनी दाही दिशा झ्रुकृत करत उठल्या.
मात्र सूर्यादेवाच्या आधीच धना उठून ध्यान-धारणा करत बसला होता..!
धना मनात एक एक गोष्ट नियोजन करत होता..!
सूर्याजी केवळ कुस्ती खेळत होता,मात्र धनाने कुस्तीतील गूढ ज्ञान म्हणजे जाम्बुवंती,जरासंधी,भीमसेनी,हनुमंती हे चारी कुस्तीप्रकार आत्मसात केले होते.
याबरोबर श्वासाविना कित्येक मिनिटे जगू शकत होता,विना अन्न-पाणी कित्येक दिवस राहणे,कोणत्या ठिकाणी आघात केला असता कोणता अवयव निकामी होतो..हे शरीरशास्त्रातील गूढ ज्ञान आत्मसात केलेले तो पुन्हा ध्यानात उजळणी करत होता..!
त्याचे सर्वांग तापून घामाच्या धरा वाहत होत्या..!
त्याला केवळ हि कुस्ती जिंकायची नव्हती तर सूर्याजी ला दाखवून द्यायचे होते धनाजी ची जागा कोणीच घेऊ शकत नाही,धना हा धना आहे …!
पण धना बिल्ला म्हणून लढणार होता आणि हे फक्त त्यालाच ठावूक होते…त्यासाठीच धना काहीतरी विचार करण्यात गढून गेला होता…!

इकडे सारा गाव पाटलांच्या वाड्यासमोर उभा राहिला होता.
सजवलेली बैलगाडी आणली होती.बैलाना फुलांच्या हारांनी सजवले होते ,झुल घातली होती.
गुलालाचे शुभलक्षणी पट्टे त्यावर ओढले होते.
सूर्याजीने भरजरी फेटा नेसला होता.
पांढरी पैरण आणि पांढरे शुभ्र धोतर घातले होते.पैरणीवर सुगंधित अत्तर शिंपून सुगंधीत केले.
स्वच्छ दाढी करून मिशांना मर्दानी ताव दिला होता.
सूर्याजीचा गोरापान चेहरा ,आजच्या तेजाने आणखीन सुंदर दिसत होती.
सूर्याजीची कुस्ती पहायला त्याच्या गावाकडची वडील आणि रामचंद्र दादा सुध्दा कोल्हापुरात दाखल झाले होते.
त्याच्या वनखात्याचे सर्व अधिकारी आले होते..!
सूर्याजीने हनुमंताचे स्मरण केले ,आई वडिलांची आठवण केली आणि क्षणात त्याच्या डोळ्यासमोर सुवर्णाचे किंचाळणे दिसू लागले,वाघाची डरकाळी आठवली आणि ह्र्युद्याचा थरकाप उडाला ,सर्वांग तापले ,मुठी वळल्या गेल्या …!
क्षणभरात स्वताला आवरत सूर्याजीने शपथ घेतली कि आजची कुस्ती जिंकून राजलक्ष्मी ला अर्धांगिनी बनवून गावाकडे घेऊन जाऊन सुवर्णाची सर्व स्वप्ने तिच्या रूपाने पूर्ण करणार ..!
सूर्याजी वाड्याच्या बाहेर आला ,पायात कोल्हापुरी चप्पल चढवले आणि उपस्थित पाटील,वस्ताद यांचा चरणस्पर्श केला आणि सार्या गावाकडे पाहत हात जोडले..!
सार्या गावाने एकच जल्लोष केला..!
कालपरवा पर्यंत केवळ वन अधिकारी असलेला सूर्याजी आता गावच्या गळ्यातील ताईत बनला होता.
राजलक्ष्मी ने भरजरी लाल रंगाचा शालू नेसून पांच सुवासिनी समवेत ओवाळायला ताट अक्षता,कुंकू घेऊन आली होती..!
राजलक्ष्मी जणू मूर्तिमंत लक्ष्मी दिसत होती ..तिचे सौदर्य अतिशय दिपवणारे होते.
सुर्याजीच्या भव्य कपाळावर तिने कुंकवात पाणी घालून ओले केलेला गंध नाम ओढला आणि त्यावर अक्षता चीटकवल्या आणि थोड्या अक्षता डोक्यावर टाकल्या आणि ताटातील निरांजनाने ती त्याला ओवाळू लागली ..ओवाळताना तिच्या डोळ्यातील धानाविषयी असणारे प्रेम फक्त सूर्याजी ओळखू शकत होता …!
सूर्याजी बोलला….राजलक्ष्मी आम्ही कुस्ती जरूर जिंकून येऊ ….केवळ ..धनासाठी .. गावासाठी.आणि तुमच्यासाठी !
असे बोल ऐकताच राजलक्ष्मी ने नजर झुकवली आणि थोडी मागे सरकली,तितक्यात उर्वरीत पाच सुवासिनी ओवाळायला पुढे आल्या आणि ओवाळू लागल्या …!
निरांजनाच्या प्रकाशात आधीच गोरा असलेला सूर्याजी सुवर्णकांती तेज चढल्यासारखा दिसू लागला.
पैलवानी सौदर्य हे जगात फक्त पैल्वानंच्यात दिसते ..त्याला इतर कृत्रिम सौदर्यप्रसाधनांची गरज नसते..!
मूर्तिमंत मर्दुमकी आणि पुरुषार्थ हेच त्यांचे सौंदर्य…!
पाटील,सूर्याजी,वस्ताद आणि गावातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी बैलगाडीत बसून कोल्हापूर रस्त्याला लागली ,बैलगाडीपुढे हलगी घुम्क्यानी ठेका धरला होता ….ते वेशीपर्यंत सोडायला आले होते…!

कोल्हापूरच्या रस्त्यावर हत्ती झुलावे असे सारे पैलवानाच डुलत होते.
वसतीगृहे,आरमगृहे,आश्रमशाळा,सराया,हॉटेल सारे सारे कुस्ती शौकीन प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.
उपहारगृहात खायला काही शिल्लक नव्हते ,सारे पैलवानांनी फस्त केले होते.
सकाळपासूनच कोल्हापूरच्या खासबाग मैदानाकडे प्रेक्षकांची रीघ लागली.
ठेकेदार खुश होते ,सर्व तिकिटी संपल्या होत्या …आता उत्सुकता होती कुस्त्यांची..!
खासबागेत सकाळपासून माती उकरून मऊ करायचे काम सुरु होते ,त्यावर फुले टाकून सजवले होते.
खासबाग खचाखच भरले होते…!

सूर्याजीची बैलगाडी आली होती.
मैदानाच्या उजव्या अंगाला खास मोठ्या कुस्त्या होणार होत्या त्या पैलवानांची सोय केली होती.
सूर्याजी तिथे उतरला आणि गावाकडील मंडळीना भेटून आशीर्वाद घेतेले..!

बिल्ला बनून आलेल्या धनाने मोरपंखी रंगाचा मखमली पंजाबी कुडता घातला होता ,गळ्यात पंजाबी खंडा ताईत घातल;होता ,इतर साथीदारांनी सुध्दा तसेच रूप घेतले होते. सोबत हातघाईच्या लढाईसाठी असणारी हत्यारे लपवली होतीच.
सेनापातीनी नी खास या मोहिमेसाठी जवळपास १०० एक जवान गडी प्रेक्षक म्हणून मैदानात आणून ठेवले होते आणि सेनापती स्वता वेषांतर करून कुस्ती पहायला आले होते..!


धना ला जिल्ह्याचे कलेक्टर आणि भोसले ठेकेदार घेऊन मैदानात आले.
पंजाबी पगडी लांबून ओळखली जाऊ लागली आणि प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला..!
धना आणि वस्ताद काका समोरासमोर आले.
वास्तदाना चरणस्पर्श करायला धना वाकला आणि वस्ताद म्हणाले..राहूदे राहुदे पैलवान ..!
धना केवळ हसला आणि बाजूला झाला तितक्यात धनाच्या साथीदारांनी वास्तदांशी विषय बदलण्यासाठी चर्चा सुरु केले आणि धना बाजूच्या खोलीत गेला…!

धना ला पाहून वस्ताद थोडेस गोंधळले होते,त्याना आठवू लागले ते डोळे ..पण गर्दी आणि प्रेक्षकांच्या गोंगाटात ते विस्मरण झाले..!
एव्हाना मैदानात लहान कुस्त्याना प्रारंभ झाला होता..!
एक मोठ्या आणि भारदस्त आवाजातील जुना वस्ताद चांगल्या कुस्त्या नाव घेऊन लावत होता ,त्याचा आवाज इतका भारदस्त होता कि सार्या मैदानाला ऐकू जात होता..!


सूर्याजी आणि बिल्ला यांच्या एकमेकाना जवळच खोल्या होत्या पण काहीच दिसत नव्हते..!
सूर्य डोक्यावर आला आणि एक पैलवान सूर्याजी जवळ धावत आला म्हणाला पैलवान तयारीला लागा …आता तासाभरात तुमची कुस्ती लागणार आहे असा आदेश ठेकेदारांनी दिला आहे …!
बिल्लाच्या खोलीत पण एकजण धावत गेला आणि बोलला…पेहेलवानजी तैय्यारीमे लग जाव..आपकी कुष्टी एक घंटे मी शुरू होगी….!!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “धना भाग १२”

  1. Pingback: धना भाग ११ Dhana bhag 11 —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!