धना भाग १५

“धना”

भाग १५ वा

मध्यरात्र होत आली तरी धनाच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते.
प्रेम आणि कर्तव्य या दोहोंच्या कात्रीत त्याच्या मनाचा बळी जात होता.
अश्यावेळी हताश होवून रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता…!
पण केवळ रडत बसने हा काही धनाचा स्वभाव नव्हता.
तो भावनिक होता मात्र कार्यक्षम होता..!
हातपाय गाळून नशिबाला दोष देत बसनार्यापैकी धना मुळीच नव्हता..!
गेले ६ तास ढळणारे अश्रू धनाने मोठ्या निश्चयाने पुसले ..आणि तो विचार करू लागला ..!
एव्हाना सार्या किल्ल्यात रात्रभर सामानांची बांधाबांध सुरु होती.
राजानी प्रत्येक गटाला,समूहाला दिलेले आदेश तंतोतंत पाळले जात होते ,त्वरित अंमलबजावणी सुरु झाली होती..!

राजांनी आपल्या निवडक खास लोकांना बिल्ला,सूर्याजीराव आणि राजलक्ष्मी याना बिनबोभाट ठार करायची कामगिरी सोपवली होती.
या गोष्टीचा धना आणि सेनापती ला थांगपत्ता पण लागता कामा नये याची काळजी घेण्यात आली होती ,कारण भावनेच्या पोटी काही चुका घडू नयेत.
राजांच्या दृष्टीने सर्व अगदी बरोबर होते.
कोणाच्या तोंडातून चुकून जरी संघटनेची गुप्त बातमी समजली तर हजारो वीरांनी गेली ५० वर्षे हाड मांस झिझ्वून उभा केलेली हि दौलत मातीमोल होणार ,आणि हे होऊ नये म्हणून स्वता वास्तदानी स्वताची जीवन यात्रा संपवली होती.
याचे भान राजाना होते ,सेनापती हे जाणत होते,पण सेनापतींचा पोक्तपणा धनाच्या मायाजालात लुळा पडत होता आणि धनाही हे समजत होता,
मात्र धनाला सारे समजून हि उमजत नव्हते..!

दिवस उगवला.मात्र पहाटेच राजे एका महत्वाच्या कामासाठी निघून गेले होते.
आजचा आणि उद्याचा दोनच दिवस..बस्स..परवा दिवशी महाराष्ट्र २ वर्षासाठी सोडून सारा कबिला हालणार होता..!
आज बिल्ला ला संपवायचे होते म्हणून संघटनेचे २०/२५ शिलेदार दुपारी बंदुका घेऊन बिल्ला आणि त्यांच्या साथीदारांना घेऊन किल्ल्याबाहेर पडले.
बिल्लाच्या डोळ्यावर पट्टी होती..!
एका सुनसान आणि केवळ काळाकाभिन्न दगडी पाषाणाची खान असलेल्या एका गुप्त ठिकाणी बिल्ला आणि त्याच्या साथीदाराचे डोळे सोडण्यात आले.
बिल्लाचे हात सोडण्यात आले आणि घोड्यावर बसलेल्या १५/२० बंदुकधारी शिलेदारापैकी मुख्य शिलेदाराने बिल्ला आणि त्याचे चारी साथीदार यांना आज्ञा केली ….!

”चले जाव यहासे …यहासे २० मील दूर रेल्वे स्टेशन है,वहा से लौट जाना….जाव जल्दी ..तुम्हे हमेशा के लिये रिहा किया जाता है !

या बोलण्याने बिल्ला ला जगण्याची आशा दिसू लागली आणि ते ५ जण धावू लागले…!
आलेले सर्व घोडेस्वार माघारी फिरले …!
धुळीचे लोट उडवत दिसेनासे झाले..!
बिल्ला आणि त्याचे साथीदार तुफान दौडत निघाले ..जीव वाचण्याचा आनंद जगातील सर्वोत्तम आनंदापैकी एक होय..!
बिल्ला आणि साथीदार यांच्या धावण्याने त्याना खूप दम लागला,सूर्य माथ्यावर असल्याने उन्हाच्या झळा बसू लागल्या ,दूरवर नजर टाकली तर आसपास जंगल आणि मागे दगडी खाण याव्यतिरिक्त काहीच नव्हते ,वर पाहिले तर गिधाडे फिरत होते ….जणू काही ताज्या मेजवानीच्या प्रतीक्षेत आकाश्यात घिरट्या घालत होती..!
बिल्ला आणि साथीदार पुढे चालणार तितक्यात जवळच्या जंगलातून आकाशपाताळ दणाणून सोडणारी वाघांची डरकाळी ऐकू आली आणि बिल्ला व साथीदार प्रचंड घाबरले ….ते पळायला सरसावले पण तितक्यात १…२….३…४…५..६………..१० जवळपास १० च्या वर भुकेने हैराण झालेले वाघ प्रचंड किंचाळत त्या पाच जनावर तुटून पडले …गेली महिनाभर जणू त्यांनी माणसाचा तुकडाही खाल्ला नसावा …एकाच झेपेत बिल्लाच्या नरडीचा घोड घेत..त्याला जंगलात ओढत नेले …..बिल्ला आणि त्याच्या साथीदारांची जीवाच्या आकांताने टाकलेली किंचाळी दौडत जाणार्या घोडेस्वारांच्या कानी पडली ..आणि त्यातील म्होरक्या असणार्या शिलेदाराने बाजूच्या दोघा शिलेदाराकडे नजर टाकली आणि स्मितहास्य केले ….आणि जोरात लगाम खेचला …..!!!

दुपार टाळून गेली होती आणि जाताना बिल्लाला घेऊन गेलेले स्वार परत आले पण त्यांच्यात ते ४ जन व बिल्ला नव्हता …हे पाहून सेनापतीनी ओळखले कि बिल्ला प्रकरण संपले …!
स्वार पायउतार झाले आणि तोंडाला बांधलेले काळे अव्लान सोडवत एका गुहेकडे निघून गेले.

तितक्यात धना पाठीला बंदूक आणि गोळ्यांचा पट्टा गळ्यात अडकवून कुठेतरी बाहेर जायला निघाला..!
धनाला पाहताच सार्या फौजेने मुजरे घातले ,धनाने ते मुजरे स्वीकारत हातवारे केले.
सेनापती जवळ येताच धना बोलू लागला…सेनापतीजी मला बाहेर जायची परवानगी द्यावी,दिवस मावळायच्या परत येऊ…एक खासगी काम आहे..!
सेनापती खिन्न मनाने बोलले…नाही धनाजी..आता तुला परवानगी द्यायचा अधिकार माझा राहिला नाही,तुला एकदा परवानगी देवून मी फार मोठी चूक केली आणि आपल्या फौजेत एक चूक एकदाच करतात..मला क्षमा कर..!
असे म्हणत सेनापतीनी मान फिरवली….धनाने मोठा श्वास घेतला आणि स्वताच घोड्यावर बसणार तितक्यात सेनापती पुन्हा बोलले …मी तुला किल्ल्याच्या बाहेर जाऊ देऊ शकणार नाही धनाजी..राजांची तशी आज्ञा आहे मला ..तू जरी भावी राजा असलास तरी तू अजून राजेपद स्वीकारायचे आहेस ..!
यावर धना चिडून बोलला…मला बाहेर न जावून द्यायला मी काय गुन्हा केलाय ?
यावर सेनापती बोलले…उद्या एक दिवस…बस्स..परवा तू मी आणि सारेच इथे नसेन …त्यामुळे धीर धर…!
यावर धना आश्चर्याने बोलला..म्हणजे ?
सेनापती आपण परवा निघणार याचा अर्थ काय ?
सेनापती मोठ्या जड अंतकरणाने म्हणाले …धनाजी बिल्ला आणि त्याचे साथीदार सकाळीच संपले…..भुकेल्या वाघाच्या पुढे त्याना सोडण्यात आले आहे.
आणि उद्या सकाळी राजलक्ष्मी ..आणि संध्याकाळी सूर्याजी दोघेही नसतील या जगात …!
राजांचे खास पथक सकाळपासून राजांच्या आज्ञेची अंमलबजावणी करत आहेत.!
हे ऐकून धनाला दिवसा चांदण्या दिसाव्यात असे होऊ लागले ,सर्वांग थरारू लागले ……डोक्याला हात लावला आणि धन मटकन खाली बसला..!
सेनापतींनी जड अंतकरणाने धनाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला..!

धनाला काही सुचत नव्हते ….असे वाटत होते कि घ्यावी बंदूक आणि त्या राजलक्ष्मी च्या मारेकार्याना धडाधड मारून संपवावे …पण धना काही केल्या फौजेशी गद्दारी नव्हता करू शकत..!
आणि हि अशी वाईट वेळ केवळ त्याच्यामुळेच आली होती.
काय करावे सुचत नव्हते…..!
एव्हाना रात्र झाली होती …,
विचार करत करत धनाला झोप लागली..!
जवळपास 50 एक बंदूकधारी शिलेदार काळे वस्त्र परिधान करुन खांद्याला बन्दुक्या अडकवुन घोड्यावर सवार झाले,घोड्यांच्या टापा चौताड़ थडाडत धनाच्या गावाकडे निघाल्या होत्या…ही पाटलांच्या पोरीची शेवटची रात्र असणार हे जाणून भरल्या नेत्रानी सेनापती त्या जाणाऱ्या घोडेस्वाराकड़े किल्ल्यातील एका वास्तुतुन पाहत होता..!

दिवस मावळू लागला,आणि धनाच्या गावी पाटलांच्या वाड्याच्या वरच्या मजल्यावर नंदादीप तेवत होते.
राजलक्ष्मी अवस्था शब्दात वर्णन न करण्यासारखी होती.
ज्या धनासाठी ती पंचप्राण ओवाळून द्यायला तयार झाली होती ,आणि देशाचे एवढे मोठे काम करण्यासाठी किती मोठ्या त्यागाने धनाने राजलक्ष्मी ची साथ सोडायचा निर्णय घेतला होता हे केवळ तिलाच माहिती होते.
आणि अश्या धनावर दरोडेखोर असल्याचा आरोप येत असल्याचे पाहून तिचा जीव घुटमळत होता.
अश्रुचा महापूर तिच्या नयनातून येत होता,दुखा सांगायला सखी नाही,आपुलकीने खांद्यावर डोके ठेवून रडायला कोणाचा खांदा नव्हता ..आणि ज्यासाठी हे जीवघेणे दुख सोसत होती..त्याने सूर्याजी सोबत कुस्ती करून काय सिद्ध केले हे तिलाच समजत नव्हते..!
इतक्यात वाड्याच्या खिडकीतून २-३ धिप्पाड हशम तोंडाला काळे अव्लान बांधून आत आले ….हे पाहताच राजलक्ष्मी जोरात किंचाळनार इतक्यात तिचे तोंड दाबून तिच्या तोंडात बोळा घातला आणि तिला उचलून खिडकीतून खाली आणण्यात आले…खाली आणून काही अंतरावर उभ्या असलेल्या मोटारगाडीत तिला घालून ते ३-४ जन सुसाट वेगाने गावातून बिनाभोभाट निघून गेले.
आकस्मित हल्ल्याने राजलक्ष्मी बेशुध्द झाली होती..!
दिवस पूर्ण मावळला आणि अंधाराचे साम्राज्य सुरु झाले होते.

सकाळ झाली….झिलमील सूर्यप्रकाशकिरणे आसमंत भेदत राजलक्ष्मीच्या मुखावर पडली …आणि राजलक्ष्मीला दचकून जाग आली..!
एका मजबूत घरात तिला आणले गेले होते …खिडकीबाहेर खोलच दरी ..आणि आसपास जंगल…..दूरदूर केवळ डोंगर दिसत होते ..!
ज्या खोलीत तिला आणले होते त्यात भरपूर सूर्यप्रकाश होता ..विजेचे दिवे होते,भिंतीवर वाघाची,हरणाची कातडी लावली होती …!
इतक्यात खोलीच्या दरवाज्यातून ब्रिटीश पद्धतीची टोपी घालून एक धिप्पाड देखणा जवान चहा घेऊन आत आला ..आणि त्याला पाहताच राजलक्ष्मी दचकून ओरडली….स..स् साहेब तुम्ही ????

हे ऐकताच सुर्याजीरावानी आपली टोपी काढून बाजूच्या टेबलावर ठेवली आणि राजलक्ष्मीला हसून बोलला….होय आम्हीच….!!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “धना भाग १५”

  1. Pingback: धना भाग १४ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!