‘धना”
भाग १८ वा
जवळपास तासभर झाडाखालून सूर्याजीसह सैन्याचा ताफा किल्ल्याच्या रस्त्याला लागला होता..!
सैन्य निघून गेले आणि धना ने अंगावरी काळ्या वस्त्र आणि झाडाच्या आत घुसलेला बाण हाताने काढला,सेनापती आणि धना सरसर झाडाखाली उतरली.
समोरच्या झाडावरून तो बाण मारलेला मात्र काळ्या कपड्याने चेहरा झाकलेला योद्धा पण उतरून समोर चालू लागला ,तिघेही समोरासमोर येताच त्या योध्याने चेहऱ्यावरील काळे वस्त्र हटवले आणि पांढर्या केसांच्या बटा बाहेर दिसू लागल्या,कपाळावर शिवगंध चमकत होता ,आणि चेहरयावरील वर्धक्याच्या सुरकुत्या मात्र अनुभवांच्या अनुभूती दाखवत होत्या ….शेलार मामा ..!
सेनापती आणि धनाच्या शरीरात वीज चमकावी तसे दोघेही चमकले आणि क्षणात दोघांचे हात शेलार मामांच्या चरणात झुकले ..!
सेनापती बोलू लागले…..मामा…तुम्ही आणि इथे ?
मामा..सर्व घात झाला आहे ,सर्व सेनासमुद्र किल्ला सोडून पसार झाला आहे ,राजेही गेले ..तुमचीच चिंता होती…!
पण तुम्ही इथे कसे ??
शांतपणे ऐकत मामा उत्तरले…,
होय ,मला यावे लागले या वेशात …!
वस्ताद काकानी रक्ताचे पाणी करून हि संघटना बनवली,ती एवढी सहजासहजी मातीमोल होताना कसे पाहू ?
धना ….सूर्याजी आता किल्ल्याकडे निघाला आहे ,पण तुम्हा सर्वांनाच माहित आहे कि या संघटनेची सर्व सूत्रे जरी यशवंता कडे असली तरी कोणताही निर्णय मी घेत असतो..!
धना तुला या संघटनेचा राजा होऊन प्रसिद्धीपासून अलिप्त देशकार्य करावे असे वस्तादांच्या मनात खूप होते,म्हणून मी तुला पुन्हा या मार्गात आणले ,पण आमचा सर्व कयास चुकला …तू खूप भावनिक निघालास ,आणि भावनेवर विजय मिळवणे तुझ्या वडिलानाही जमले नाही..!
पण त्यांच्या शेवटच्या इच्छेखातर मीच यशवंता ला सांगितले कि त्याला देऊया शेवट संधी आणि २ वर्ष गुप्त राहून पुन्हा डाव मांडूया ….पण तुम्ही दोघांनी अजून एक चूक केली आणि इकडे निघालात ????
मला ठावूक आहे तुम्ही पाटलांच्या पोरीला भेटायला निघाला आहात ,पण सूर्याजी तिलाच घेऊन आपला किल्ला बुडवायला निघाला आहे.
धना खाली मान घालून ऐकत होता …..निश्चय करून बोलला …!
मामा …माझी चूक मला मान्य आहे ,पण मला कोणी बोलण्याची संधी का देत नाही …?
माझे सारे आयुष्य ज्या गावात गेले ते गाव,माझी आई,माझे वस्ताद माझे मित्र ,राजलक्ष्मी,सर्वकाही सोडून मी केवळ तुम्हा साऱ्यांच्या सांगण्यावरून इथे आलो.
मला माहित पण नव्हते माझे वडील या सेनेचे संस्थापक होते ,केवळ त्यांच्या इच्छेखातर मी सुध्दा भावना आवरून सर्व काही ज्ञान शिकले.
तुम्ही मला सर्वकाही शिकवले ..पण मी कितीही प्रयत्न केला तर राजलक्ष्मी ला कसा विसरू ?
तुम्ही सर्वांनी तिला मारण्याचा हुकुम देऊन अंमलबजावणी सुध्दा करायला गेलात तरी मी शांत होतो ,कारण मला माझे कर्तव्य माहिती होते.
एवढी करूनही मामा मी भावनेवर संयम कसा नाही ठेवू शकत असे तुम्ही म्हणता.?
नशिबाने राजलक्ष्मी अजून जिवंत आहे …कदाचित देवाचीच इच्छा असावी कि आम्ही पुन्हा एकत्र यावे ….मामा मला संघटनेचे नियम मान्य आहेत पण या नियमामुळे माझे वडील मला काही समजायच्या आतच निघून गेले,पण हा नियम मला शिरोधारी आहे किमान मला तिला एकदा भेटून तिचा निरोप घ्यायचा होता ….हि माझी चूक आहे का ?
चूकच….मामा कडाडले ..!
तुझ्यासाठी हजारो वीरांचे प्राण धोक्यात गेले हि चूक नाही का ?
५० वर्षांची मेहनत मातीमोल होण्याची वेळ आली हि चूक नाही का ?
आणि एवढे होऊनही तू त्या मुलीला भेटायला निघालास ?
आणि सेनापती….तुम्हीही ?
सेनापती कर्तव्यात कसूर करत आहात तुम्ही….आणि याची शिक्षा संघटनेत काय असते हे माहित आहे तुम्हाला ..!
पण तुमची आजवरची इमानदारी पाहून तुम्हाला अखेरची संधी देत आहे..राजांनी सांगितलेल्या मार्गाने वाटेला लागा ..मी या सूर्याजीचा बंदोबस्त कायमचा करतो …!
सेनापती या खड्या बोलाने चांगलेच भानावर आले ..आणि जी मामा ,असे बोलत मागे सरले…..धना आणि सेनापती दोघेही मागे हटले आणि जंगलजाळीत दिसेनासे झाले …!
इकडे मामांच्या मागे किमान ५० एक चिवट वीर तोंडास काळे कापड बांधून मामांच्या पाठीमागे झाडांच्या डोल्यावर होतेच..मामाची हातवार्याची सूचना प्राप्त होताच सर्व वीर सुर्याजीच्या फौजेमागे जाऊ लागली…!!
एव्हाना गावकरी किल्ल्याच्या डाव्या अंगाच्या डोंगरावरून पुढे सरकू लागली आणि बरोबर त्याच्या विरुध्द बाजूने सूर्याजी फौजेसह चालू लागला होता आणि त्याच्या मागे शेलार मामा आपल्या निवडक वीरांसह सूर्याजीचा निपात करायच्या हेतूने मागे होता..!
धना आणि सेनापती मोठ्या विचित्र पेचात पडले होते ,धना निर्धाराने बोलला सेनापती …माझ्यावर तुमचा विश्वास आहे का ?
धनाच्या आकस्मित प्रश्नाने सेनापती धनाकडे पाहत बोलले..विश्वास नसता तर कर्तव्य बाजूला ठेवून तुला इतक्या वेळा मदत केली नसती धनाजीराव..!
मग एक अखेरचा विश्वास ठेवा …मला राजलक्ष्मीला भेटू दे …तिला भेटून मी काही वेळातच पुन्हा तुमच्या सोबत येतो आणि मग आपण दोघेही राजांनी दिलेल्या नकाशावरून पुढे मार्ग काढू…!
सेनापती आश्वासक शब्दात बोलले …ठीक आहे ..पण तू एकटा जाणे खूप धोक्याचे आहे …चल आपण दोघेई जाऊ …आणि त्या दोघांचा बदललेला मार्ग पुन्हा सुर्याजीच्या दिशेने चालू लागला..!
गावाचे पाटील,वस्ताद आणि चिवट पोर निश्चयाने किल्ल्याकडे जाऊ लागली होती.
सुर्याजीच्या फौजेतील काही नजर बहाद्दर धावत पुढे आले आणि सूर्याजीला बोलले…साहेब डोंगराच्या वरून किमान हजार एक लोक सशस्त्र हमला करतील अशा आवेशाने येत आहेत …सूर्याजीला कळून चुकले ..कि आपण समोरून चालत आहे मात्र डोंगराच्या वर कदाचित हे सारे धनाचे लोक लपून बसले असणार..!
सूर्याजीने क्षणात सार्या फौजेला सावध केले आणि दबा धरून बसायची ताकीत दिली ……डोंगराच्या वरून गावकरी आले आणि क्षणात गोळ्यांचा पाउस सुरु झाला …आकस्मित झालेल्या या हल्ल्याने गावकरी सावध झाले आणि जाग्यावर झोपून स्वताचा बचाव करू लागले ….आणि संधी साधून सोबत आणलेल्या बंदूक आणि बाणांचा त्यांनीही वर्षाव सुरु केला …उभय पक्षात जोराची लढाई जुंपली…!
सूर्याजीची प्रशिक्षित सेना गावकर्यांना भारीच होती …कित्येक गावकरी गोळ्यांच्या मार्याने जखमी होऊ लागले …गावकर्यांनी गोफण,बाण आणि बंदुकीच्या फैरी सुरु केल्याने सूर्याजीची फौज सुध्दा थोडीफार जखमी झाली.
त्यांच्या या दंग्याने सारे जंगल शहारले..!
इतक्यात सु सु सु सु करत एक जीवघेणा बाण आला सुर्याजीच्या दंडाचा भेद घेतला …आणि जवळ असलेले राजलक्ष्मी जोरात किंचाळली ..हा बाण दबा धरून बसलेल्या शेलार मामांचा होता …त्याला काही करून राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवायचे होतेच …!
एव्हाना धना आणि सेनापती या प्रकारच्या आसपास येऊन पोहचले..!
धनाच्या लक्षात आले कि गावकरी आणि सूर्याजी यांची लढाई जुंपली आहे आणि पाठीमागून मामा सूर्याजीला मारायला आसुसले आहेत ..धावण्याची गती वाढवून धना आणि सेनापती त्वेषाने राजलक्ष्मीकडे जाऊ लागले..!
सूर्याजीला त्या बाणाच्या आघाताने चक्कर येऊ लागली पण सोबत असलेल्या राजलक्ष्मी च्या अस्तित्वाने त्याला भान आले …त्याने त्वरित राजलक्ष्मी च्या हाताला धरले आणि बाजूला नेऊ लागला तितक्यात दुसरा बाण साप्दिशी येऊन सुर्याजीच्या मांडीत रुतला ….सूर्याजीची हि जखमी अवस्था पाहून राजलक्ष्मी ने त्यांच्या खांद्याला आधार दिला ….सूर्याजी जखमी अवस्थेत बोलला ..राजलक्ष्मी मी तुला इथे आणून चूक केली आहे …मला माफ कर ….तू तुझा जीव वाचव ..असे म्हणत पुढे असलेल्या जंगलात बोट केले आणि तिथे जाऊन लपायची सुचना केली तितक्यात तिसरा बाण सुर्याजीच्या दुसर्या दंडाचा वेध घेत आला साप्दिशी रुतून बसला …हे पाहताच सुर्याजीच्या फौजेतील अधिकार्याने सूर्याजीला संरक्षण द्यायला १०० जवान पाठवले आणि गोळ्याचा पाउस पाडत ते जवान सुर्याजीच्या रक्षणाला धावले …या आकस्मित संरक्षण कवचाने मामा ला बाणांचा नेम धरता येईना …पण जिकडून बाण येत आहेत तिकडे जवान गोळ्या झाडू लागले आणि मामांच्या वीर सेनेतील गडी अस्ताव्यस्त होऊ लागले ……!!
एका झाडावरू काही वीर उडी मारताच काही जवानांनी त्याना पाहिले आणि त्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला….
एव्हाना राजलक्ष्मी जंगलात सुरक्षित जागा शोधण्यासाठी जात होती ,
जखमी सूर्याजीला तोंडातून शब्द निघणे अवघड होते ….
जवान मामांच्या जवळ येऊ लागले आणि सपासप बाणांच्या फैरी झाडू लागल्या आणि झाडावरून आंबे पाडावेत तसे जवान पडू लागले आणि वेदनेने किंचाळू लागले …या संधीचा फायदा घेत मामा मागे हटले ..पण जवान त्यांचा पाठलाग करू लागले….हे पाहताच सेनापती धना ला म्हणाले ..धना तू काही करून राजलक्ष्मी ला सोबत घे ..मी मामांचा जीव वाचवतो ….धनाने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही निघाले…!
किर्र दाट झाडीत धना घुसला ..आणि इकडून राजलक्ष्मी जंगलाच्या आताच आत जाऊं लागली …!
सेनापती नी सोबत असलेला हात बॉम्ब काढू दाताने त्याचे आवरण तोडले आणि जवानाच्या दिशेने तो हात बॉम्ब टाकला….!
बॉम्बच्या धडाक्याने जवान उडून पडले …आणि इतर अस्ताव्यस्त झाले …आणि सेनापती मामांच्या जवळ गेला …!
मामांच्या दंडाला धरत बोलला मामा निघा इथून….आम्ही पाहून घेऊ….तितक्यात मामा बोलले …धना कुठे आहे ..?
धना सुरक्षित आहे मामा ..तुम्ही पुढे व्हा….हे ऐकताच मामा निघून गेले आणि सेनापती आणखी एक बोंब काढून जवानांच्या दिशेने फेकला..!
सूर्याजीची सेना डोंगरावर जाऊ लागली…आणि गावकरी तुफान हल्ले चढवू लागले ..कित्येक गावाकरू गोळ्यांच्या हल्ल्याने मारू लागले..!
हे पाहताच पाटील व वस्ताद पुढे झाले …त्यांना नेमके समजेना कि हल्ला कोण करत आहे ?
जवानांची वर्दी पाहून वास्तादना समजले कि हे दरोडेखोर नसून पोलीस आहेत.
हे पाहताच वस्ताद एका एका काठीला पांढरे निशाण लावून जवानांना शरण आहे असे संकेत देऊ लागले..!
हा संकेत पाहताच जवानांकडून होणारा गोळीबार थांबला आणि ते गावकर्यांच्या दिशेने येऊ लागले….!
सूर्याजीला जाग आली आणि त्याने ३-४ हात्यार्बंद अंगरक्षक सोबत घेतले आणि लंगडत लंगडत राजलक्ष्मी च्या दिशेने जाऊ लागला…पण तो जखमी होता ..त्याची गती खुंप कमी होती ..एव्हाना राजलक्ष्मी जंगलाच्या खूप आत गेली होती.
इकडे धनाही जंगलाच्या फार आत आला …..समोर काळे कातळ दगड पाहिले आणि मोकळे पठार दिसू लागताच त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला….त्याला कळून चुकले कि आपण भुकेने व्याकूळ असणार्या वाघांच्या इलाक्यात पाउल ठेवले आहे ….याच ठिकाणी संघटनेशी गद्दारी करणारे वाघांच्या समोर आणून टाकले जात असे …!
धनाने क्षणात आपली बंदूक काढून त्यात काडतूस आहे का तपासले …!
बंदूक बंद करू समोर धरली आणि तो चालू लागला …कानावर जवानांच्या किंचाळ्या आणि गोळ्यांचे आवाज येत होतेच …!
राजलक्ष्मी नेमक्या त्याच दिशेला येत होती ,जंगलातील दगडांना ठेचकाळत जीव वाचवत मात्र मनात एकसारखा धनाचा धावा करत ती पुढे चालत होती .जंगल विरळ झाले आणि मोठमोठे कातळ तिला दिसले ……ती सावरून त्या भागात पाउल ठेवून चालू लागली…!
काही क्षण गेले आणि तिला वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला…!
तिच्या अंगावर काटाच उभा राहिला…तिच्या हृदयाचा थरकाप उडाला आणि ती मागे फिरणार इतक्यात एक भुकेला वाघ तिच्या समोरच उभा होता …आणि गुरगुरत तो तिच्या जवळ येऊ लागला …राजलक्ष्मी भीतीने थरथरू लागली ….एक क्षण ..दोन क्षण त्या वाघाने झेपेचा पवित्रा घेतला ..त्याने झेप मारली…….वाघ हवेत …क्षण..दोन क्षण ..आता काही क्षणात राजलक्ष्मीच्या नरडीचा घोट तो वाघ घेणार आणि इतक्यात………धड्ड …धड्ड अश्या दोन बंदुकीच्या फैरी वाघाच्या छाताडावर येऊन आदळल्या आणि रक्ताचा फवारा उडून वाघ गतप्राण होऊन खाली पडला…वाघाच्या छातीला भगदड पडले,रक्तांचे शिंतोडे राजलक्ष्मी च्या चेहर्यावर पडले आणि तिने मागे वळून पाहिले …..तर दम खात असलेला धना आणि त्याच्या हातातील नुकतीच बार टाकलेली बंदूक धूर टाकत होती ..धनाला पाहून राजलक्ष्मीच्या मनात आनंदाचे काहूर निर्माण झाले …पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरील आनंद मावळला ….तिने डोळे वटारले ….भीतीने तिने आर्त किंकाळी टाकली आणि धनाकडे पाहू लागली…धनाला काही समजले नाही…तो मागे वळून पाहू लागला तर एकाच वेळी ५-६ भुकेले वाघ त्याच्या दिशेने येत होते ……धनाच्या बंदुकीतील २ बार उडाले होते ..आणि वाघ केवळ एका झेपेच्या अंतरावर आले होते ……वेळ उरलाच नव्हे !!
पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: धना भाग १७ —