सरनौबत हंबीरराव मोहिते-भाग ०१

प्रकरण पहिले

मोहिते घराण्याचा इतिहास

१) प्रस्तावना

सेनापती नेताजी पालकर यांनी शिवाजी महाराजांच्या अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी या ठिकाणी येण्यास उशीर केला तसेच मिर्झाराजे जयसिंग यांच्या संघर्षाप्रसंगी पन्हाळ्यावर येण्यास उशीर केला. त्याबद्दल छत्रपती त्यांच्यावर नाराज झाले, त्यामुळे नेताजी पालकर शत्रु पक्षात सामील इ झाले.(अर्थात हा  शिवाजी महाराजांचा गनिमी कावा होता ). त्यानंतर कुडतोजी गुजर हें ‘प्रतापराव’ या पदवीने सेनापती झाले. सेनापती प्रतापरावाने बहलोलखान प्रसंगी त्याला अभय दिल्यामुळे राजांची त्यांच्यावर गैर मर्जी झाली. या इर्षेने प्रतापराव आपल्या सहा सहकाऱ्यांच्या साहाय्याने नेसरी खिंडीत बहलोलखानवर हल्ला केला. यावेळी झालेल्या संघर्षात प्रतापरावांना वीरमण आले. त्यावेळी राजांच्या समोर सेनापती पदाचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी शिवरायांनी हंबीरराव मोहीते यांना सेनापती पदावर नियुक्त केले.राजांच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराजांना देखील मागे  वळून पहावे लागले नाही. हे हंबीररावांच्या कर्तृत्वावरून लक्षात येते.

सेनापती हंबीरराव मोहीते हे मातब्बर नव्हते तर त्यांचे वडील विजापूर च्या आदिलशाही मध्ये तळबीड गावचे पाटील होते. ते शहाजी राजांच्या सैन्यात दाखल झाले. नंतर ते सुप्याचे सुभेदार इ झाले. सुपे हा प्रदेश आदिलशहाने जहाँगीर म्हणून शहाजी राजांना दिलेला होता. यावेळी राजमाता जिजाऊ व पुत्र शिवाजी राजे कारभार पाहात होते. येथील गैर-कारभारामुळे पुत्र शिवाजी राजांनी त्यांना शहाजी राजांकडे परत पाठवले. त्यावेळी त्यांचे पुत्र हंबीरराव पागेत नौकरीस लागले असावे आणि स्व-कर्तृत्वाने अनेक पदावर त्यांनी काम केले. नेसरी प्रकरणाच्या वेळी हंबीरराव चिपळूण प्रांतामध्ये सैन्याची छावनी करुन होते. नेसरीला प्रतापरावांना वीरमरण येताच हंबीररावाने सर्व मराठा सैन्य एकत्र करुन बहलोलखान व दिलेरखान यांना हुलकावण्या देत स्वराज्यापासून दूर ठेवले व नंतर हंबीरराव हे सेनापती झाले. छत्रपती शिवरायांनी हंबीररावांना सेनापती पद केसे नेमले, याबाबतची सर्व माहिती प्रस्तुत प्रबंधामध्ये सांगितली आहे.

छत्रपती शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयांच्यावेळी हंबीररावांचे कर्तृत्व खरे उजळून आले. या मोहिमेत दक्षिणेचा मार्ग मोकळा करुन महत्त्वाची त्यांनी भूमिका बजावली. बेळगांव भागात राजांची पायदळ होती. यावेळी हंबीरराव आपले घोडदळ घेऊन शिवरायांनी भानगरकडे जाणार मार्ग मोकळा करुन दिला. अशावेळी हुसेन-खान मियानासोबत झालेल्या संघर्षाची माहिती प्रस्तुत प्रबंधामध्ये सांगितलेली आहे. सप्टेंबर १६७७ मध्ये जिंजीवर शिवरायांनी वर्चस्व मिळविल्यानंतर तेथील सर्व जबाबदारी हंबीररावांवर सोपविली होती. शिवरायांचा सावत्र भाऊ संताजी तेथे होता. अशावेळी व्यंकोजीने जिंजीवर हल्ला केला. त्यावेळी तेथून व्यंकोजीस त्यांनी परतवून लावले. तेथील सर्व किल्ल्यांची व्यवस्था हंबीररावांनी लावली असावी व मोघलांपासून त्यांचे रक्षण केले असावे याबाबतची सर्व माहिती प्रस्तुत प्रबंधामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी सेनापती हंबीररावांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.सर्व मराठा सैन्याला एकत्र करुन युवराज संभाजी राजांना छत्रपती या पदावर बसवून हंबीरराव हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुघल सम्राट औरंगजेबाच्या रुपाने स्वराज्यावर चालून आलेल्या कंटाचा सामना करत बु-हाणपूरची मोहिम यशस्वी करुन दाखविली. छत्रपतींच्या स्वराज्यात मोघलांचा शिरकाव होऊन दिला नाही. सेनापती हंबीररावांनी कुठेही तुंबळ अशा लढाया केल्या नाही. पण एका मातब्बर सेनापती प्रमाणे सर्व युद्धाचे संचलन ते मोठ्या कुशलतेने करीत असत.

छत्रपती शिवरायांच्या संताजी घोरपडे कान्होजी आंग्रे सारख्या अनेक सेनापतींची चरित्रात्मक कामगिरी लिहिली गेली. मात्र एक तप सेनापती पदावर राहिलेल्या हंबीररावांचे कार्य लिहिले गेले नाही. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासातील ही उणीव प्रस्तुत प्रबंधाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.


1 thought on “सरनौबत हंबीरराव मोहिते-भाग ०१”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!