छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे प्रत्येक लढाईत’ हर हर महादेव’ ही घोषणा देत असायचे.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की ‘ हर हर महादेव मधील हर हर या शब्दाचा अर्थ नेमके काय होतो.
आंघोळ करताना सुद्धा आपण ‘हर हर गंगे’ असा शब्द प्रयोग आपण करतो.चला तरर माहिती करून घेऊयात हर हर शब्दाचा अर्थ..
आपल्या प्राचीन वेदामधे म्हणजे ऋग्वेदात याचा सार सांगितला आहे.
आपल्या पुराण कथेमध्ये हर हर महादेव चा असा अर्थ सांगितला आहे की ‘हर’ म्हणजे ‘प्रत्येका’त महादेव आहे. म्हणजे लढाई साठी जाणारा प्रत्येक मावळा हा शम्भो महादेव यांचा सेवक आहे.
संस्कृत मध्ये ‘हर’ चा अर्थ नष्ट करणे होतो.त्यामुळे याचा एक अर्थ असा देखील निघतो की, शंभो महादेव आपले सगळे दुःख हरतात अर्थात नष्ट करतात.
त्यामुळे अर्थात भीती कमी होउन उत्साह वाढला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराज हे शंभो महादेवाचे भक्त होते.त्यांनी स्वराज्यस्थापनेची शपथ ही रायरेश्वराच्या महादेव मंदिरात घेतली होती.
स्वराज्यातील प्रत्येक मावळा कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी हर हर महादेव चा जप करत यामागे हेच कारण होते की ते महादेवाला त्यांची पीडा नष्ट करून त्यांना विजय प्राप्त व्हावा म्हणून साकडे घालत असावे.
आम्ही आमच्या आकलनानुसार या गोष्ठीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.काही चुकले असल्यास टिप्पणी मध्ये नक्की सांगा.