कन्नड चित्रपट सृष्टीने गेल्या काही महिन्यात जे स्वतःला सिद्ध केले आहे ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. ‘विक्रांत रोना’ ‘केजीएफ’ ‘७७७ चार्ली’ यासारख्या कन्नड चित्रपटांनी आपला एक प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. त्यात आता भर पडली आहे ऋषभ शेट्टी ( Rishabh shetty ) च्या कन्नड चित्रपटाची ‘कांतारा-अ लेजंड’. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केला आहे.
पौराणिक कथावर आधारित कांतारा (कांतारा) हा चित्रपट कन्नड मध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. 30 सप्टेंबरला केवळ मूळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची लोकप्रियता केजीएफ सारख्या चित्रपटालाही मागे टाकणारी आहे.दाक्षिणात्य चित्रपट हा अजूनही आपल्या मुळांना घट्ट धरून आहे हे सिद्ध करणारा ‘कांतारा’ बघताना बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांची कीव येते. आपल्याकडेही अशा कित्येक गोष्टी आहेत, पण आपल्या लोकांना रिमेक चित्रपटातून उसंत मिळेल तेव्हा कुठे ते विचार करू शकतील.
कर्नाटकातील लोककलेला अत्यंत अभिमानाने सादर करणारा ‘कांतारा’ एक धाडसी चित्रपट आहे,यात काहीच दुमत नाही. या कांतार चित्रपटाला खूप जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कांतर चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी तमिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळम मध्ये प्रदर्शित केला आहे. कांतार चित्रपट रिलीज नंतर बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये २३ दिवसातच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. कांतारा चित्रपट प्रदर्शित होऊन खूप दिवस झाले आहे. तरीपण या चित्रपटाचा कमाईचा वेग काय थांबत नाहीये.
बॉक्स ऑफिस कलेक्शन Box office collection
या चित्रपटाने चौथ्या आठवड्यातही खूप मोठी कमी केली आहे. चौथ्या शनिवारी ४ कोटी १५ लाखाचा आकडा सेट केला आहे. त्यानुसार चित्रपटाने 57 कोटी 90 लाखांची कमाई केली आहे. असे ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांचे मत आहे. ऋषभ शेट्टी हे कांतारा चित्रपट चे केवळ मुख्य अभिनेता नाही तर त्यांनी हा चित्रपटाची कथा लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. आपल्याला कर्नाटकातील त्या लोककलेविषयी किंवा त्यांच्या परंपरेविषयी काही माहिती नसूनही आपण त्या कथेत कधी गुंततो तेच आपल्याला समजत नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं ते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी (Rishabh shetty) यांना. या चित्रपटाची कथा जंगल, मानव आणि कर्नाटक मधील एका गावावर आधारित आहे.
रिषभ यांनी कथा आणि लोकांच्या श्रद्धास्थानाचं गांभीर्य बाळगून ही कथा सादर केली आहे. रोमान्स, नाट्य, विनोद, थरार या सगळ्या गोष्टी त्यांनी योग्य प्रमाणात आणि योग्य त्याच ठिकाणी पेरल्याने कथा पटकथा तुम्हाला कुठेच भरकटल्यासारखी वाटत नाही.दिग्दर्शन आणि चित्रीकरणात तर या चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत.याशिवाय चित्रपटात वृषभ शेट्टीशिवाय सप्तमी गौडा मुख्य भूमिकेत आहे.तसेच किशोर आणि अच्युत कुमार ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रिषभच्या पात्राचा म्हणजेच ‘शिवा’चा भूतकाळ आणि त्यादिशेने होणारा त्याचा प्रवास अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.
पूर्ण बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा