मुगल साम्राज्य नष्ट होउन संपूर्ण भारतावर मराठी सत्तेचे एकछत्री साम्राज्य स्थापन होउन सुराज्य नांदले असते. तसेच डच, पोर्तुगीज आणि इंग्रज ह्यांचा बंदोबस्त झाला असता व ह्यामुळे भारतावर इंग्रजी सत्ता कदाचित स्थापन झाली नसती.
… तर मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड वर राज्य केले असते.
शिवरयांसरख्या अद्वितीय माणसाचे आयुष्य परकीयांशी लढण्यातच गेला हे दुर्भाग्यच वाटते, शिवराय केवळ 10 वर्ष जरी अधिक जगले असते तर इंग्रजांना संपूर्ण भारत पाहता सुद्धा आला नसता राज्य करण्याची गोष्ट सोडाच असे मत इंग्रज अधिकारीच व्यक्त करतात. यापुढे जर शिवराय 100 वर्ष जगले असते तर जगाला व मूळ हिंदू लोकांनाच माहीत नसलेला खरा हिंदू धर्म शिवरायांनी सांगितला असता. सर्वोत्तम आरमार उभे करून परकीय तंत्रज्ञान व हिंदुस्थानचे अध्यात्म यांचा अनोखा संगम महाराजांनी साधला असता. अतिशयोक्ती होणार नाही परंतु खरेच महाराजांनी पृथ्वीचे नंदनवन केले असते आणि आज शिवरायांची देवप्रमाणे आरास झाली असती त्यांचे पुतळे नाही तर मंदिरे उभारलेली आपणास दिसली असती. हो हे झाले असते जर खरेच शिवराय 100 वर्ष अधिक जगले असते.