धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर त्यांना बहादूरगड येथे आणण्यात आले.पण वाटेत त्यांना शिराळा आणि बागणी मार्गे मिरजेला नेण्यात आले होते..तर त्यांचा बागणीत ते मुक्कामी होते याचा इतिहासात कोणताही संदर्भ का सापडत नाही…??? हाच माझा प्रश्न आहे… आणखीन एक जेव्हा संभाजी महाराज किल्ले पन्हाळा येथे राहून राज्यकारभार सांभाळत होते तेव्हा त्यांनी खोची मार्गे बागणीच्या भुईकोट किल्ल्यावर हल्ला करून येथील अडकित्ते व इतर साहित्य लुटून नेले होते..याचा देखील संदर्भ इतिहासात का सापडत नाही…???
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा कालावधी दुर्देवाने इतिहासाला अज्ञात आहे. मुकर्रबखान संगमेश्वर ते बहादूरगड हे अंतर १३ दिवसात पार करून संभाजी महाराज व कवी कलश यांना घेऊन पोहचला होता, एव्हढीच एक नोंद मोघलांच्या इतिहासात साफी खान सांगतो. दीक्षित घराण्याने या मार्गात शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता अशी इतिहासात नोंद आहे. तरी मुकर्रबखान याचे दोन संभाव्य मार्ग आपण तर्क लावू शकतो.
१. संगमेश्वर- तिवरा घाटामार्गे बहादूरगड व
२. संगमेश्वर- आंबेघाट मार्गे बहादूरगड
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे लवकरच उत्तर दिले जाईल.