राजमुद्रा वापरण्याचे नियम

प्रश्नोत्तरे चर्चाCategory: Questionsराजमुद्रा वापरण्याचे नियम
Mangesh asked 4 years ago

राजमुद्रा कोणी वापरावी याची नियमावली आहे का?
असेल तर कोठे आहे?
राज ठाकरे नी योग्य केलं आहे का?
अर्थात नसेल…तर मग त्यांनी कुणाला विचारून राजमुद्रा च राजकारण सुरू केलं, पक्षचा झेंडा वर लाऊन.
 

1 Answers
राजमुद्रा answered 4 years ago

राजमुद्रा ही राज्याची ओळख असते. राज्यकारभार चालवण्यासाठी राजमुद्रेचा उपयोग होतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही त्याकाळी स्वराज्याचे कारभार चालवण्यासाठी होती.
एखाद्या आदेशावर किंव्हा पत्रावर, जर राजमुद्रा उमटवली तर त्याचा अर्थ असा व्हायचा की, त्या कागदावर जो मजकूर लिहलेला आहे. तो त्या राज्याच्या राजाच्या संमतीने लिहलेला आहे. आणि तो कागद लिहण्याच्या वेळी तो राजा त्या ठिकाणी उपस्थित होता.
आता आजच्या काळ आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्याया काळात राजमुद्रा वापरण्याचे नियम होते. ते आजच्या लोकशाही मध्ये पण असायला हवे होते पण नाहीये. स्वराज्यामध्ये फक्त नेमून दिलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच ( उदाहरणार्थ. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी येसूबाई, राजमाता) यांनाच स्वराज्याची राजमुद्रा वापरता यायची. बाकी अष्ठप्रधान मंडळासाठी त्यांचे त्यांचे वेगळे शिक्के होते.
 

Your Answer

16 + 11 =

error: Content is protected !!