छत्रपती संभाजी महाराजांना त्या पापी औरंगजेबाने अमानुष छळ करून मारले.परंतु छत्रपती संभाजी महाराज अमर झाले.
‘मारणारा मेला आणि मेलेला अमर झाला’.
औरंगजेबाने त्या अगोदर देखील हिंदुस्थानातील व्यक्तींचा अमानुषपणे छळ करून मारले.ह्या शूर वीरांनी स्वाभिमानाने आपले मरण झेलले आणि अमर झाले.त्या घटनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
शिखांचे नववे गुरू तेगबहादुर (१६६४ ते १६७५) शिवशाहीत हा कालखंड. १६७५
साली तेगबहादुर यांना ते शीख धर्माचा प्रसार करतात, मंदिरे उभी करतात म्हणून, त्या मंदिरांचा व शिखांचा
नाश करण्याचा औरंगजेबाचा आदेश होता. तेगबहादुर यांचे तेज औरंगजेबाने डोळ्यात सलत होते.
औरंगजेबाने तेगबहादुर व त्यांचे दिवाण भाई मतिदास, भाई सतिदास अणि दयालदास व गुरू दिता यांच्यासह अनेक शिष्यांना १६७५ मध्ये पकडले. दिल्लीच्या चांदणी चौकातील कोतवालीत त्यांना बंदी करण्यात आले. त्यांना जमीन वैगेरे देण्याची आमिषे दाखविली व मुसलमान होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी ते धुडकावून लावले.
औरंगजेबाने शिक्षा सुनावली आणि शिक्षेचा अंमल सुरू झाला. शिक्षा इतकी भयंकर होती की वाचून अंगावर काटा येईल.
१ नोव्हेंबर, १९७५ रोड चांदणी चौकात फळ्यांचे व्यासपीठ बनविण्यात आले. त्याची रचना शिक्षेयोग्य अशी बनविण्यात आली, भाई मतिदासाला उताणे त्याच्यावर झोपवले गेले आणि लाकूड कापतात तसे कवटीपासून पायापर्यंत त्यांचे शरीर करवतीने चराचरा कापण्यात आले. हे भयानक दृश्य लोक चांदणी चौकात पाहात होते.
दुसऱ्या दिवशी दयालदास यांना कढईमध्ये उकळत्या पाण्यात बुडवून हाल हाल करून त्याचे पंचप्राण शरिरातून घालविले आणि त्यांचे प्रेत चांदणी चौकात लटकावून ठेवले. पंजाबमधील जुन्या ग्रंथात यासंबंधी एक ओळ आहे. .
मतिराम चिराया काव्यपाल देगविध मान्या ।।
अर्थ – मतिदासाला चिरून फाडले आणि दयालदासाला कढईत बुडवले.
तिसऱ्या दिवशी सतिदासाला तुळईस हात बांधून उभे ठेवले. पाय खाली घट्ट बांधले. मागे एक वाघनखे घातलेला मारेकरी व पुढे एक वाघनखे घातलेला मारेकरी यांनी मागून व पुढून डोक्यापासून पायापर्यंत ओरबाडून, ओरबाडून कातडे, मांसाचे गोळे खाली गळावयास लागले. रक्ताची तर कारंजी उडू लागली. अनंत यातन सहन करीत त्यात प्राण अनंतात विलीन झाले.
तेगबहादुर यांना ११ नोव्हेंबर रोजी चांदनी चौकात आणले. हिंदकी चादर ‘ असे संभोधले
जाणारे तेगबहादुर औरंगजेबास म्हणाले, ‘मति मलीन मूरखमति जोई। इसको त्यागोही पामर से सोई।’
(हिंदूधर्माचा त्याग करणारा माणूस हा सामान्य व मूर्ख आहे. गुरुप्रताप सूरज) पाच दिवस अमानुषपणे
विविध प्रकारे त्यांचा छळ चालू होता. शेवटी त्यांचा शिरच्छेद केला गेला.
शिखांचे पाचवे धर्मगुरू अर्जुनदेव यांची शिक्षा सुद्धा अशीच भयानक होती. मोगल बादशहाने
त्यांना २ लाख रुपये दंड केला. तो देण्याचे त्यांनी नाकारले. त्यांना त्या पापी औरंगजेबाने तापत्या तव्यावर ठेवले. तरीसुद्धा त्यांनी आपला स्थितप्रत्य भाव सोडला नाही.संभाजी महाराज जसे हसत हसत मृत्यूला सामोरे गेले त्याचप्रमाने यांनी केले आणि यामुळेच बादशहा फारच चिडला.
त्याने त्यांना गाईच्या कातड्यात शिवण्याचा आदेश दिला. त्यांना त्यांची शेवटची इच्छा काय विचारले असता, त्यांनी नदीत स्नान करण्याबद्दल सांगितले. नदीत त्यांनी बुडी मारली पण त्यांचे प्रेत मोगलांना सांपडले नाही. हीच परंपरा तेगबहादुरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी सांभाळली.
छत्रपती संभाजीराजे सुद्धा अर्जुनदेव व तेगबहादुर यांच्या सारखेच स्थितप्रज्ञ राहिले. मृत्युला सामोरे गेले.धर्मासाठी बलिदान देणारे दोन धर्मगुरू व एक अभिषिक्त धर्मवीर राजा!
मानाचा मुजरा!
संताजी घोरपडे यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पूर्वी आपण मोघल सरदाराच्या फोटोलाच छ. शिवाजी महाराज समजत होतो. त्याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
बाजींद चे लेखक यांनी लिहलेली धना कादंबरी फ्री मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.