शिवमित्रांनो, आपले दैवत छत्रपती संभाजी महाराज हे फक्त ३२ वर्ष जगले. जगातील हाच प्रसंग असा आहे की, जो घडायला नको होता आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असेल. माझ्या धाकल्या धान्याचं कर्तृत्वच असे होते.
असो छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याकाळील ऐतिहासीक वारसा गोष्टी आज पण पाहिल्या की, मनाला खूप खूप छान वाटते, मन आनंदी होते. आज छत्रपती संभाजी महाराजांची अशीच एक आठवण या लेखाद्वारे आपण पाहणार आहोत.
शिवमित्रांनो, आपल्या देवाचे छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांची ही जणू सहीच आहे. खालील फोटोमध्ये आपण संभाजी महाराजांचे सही आणि हस्ताक्षर पाहू शकतो.

मित्रांनो, नक्कीच खूप आनंद भेटला असेल आपल्याला. आता आपण याबाबतीतील ऐतिहासिक संदर्भ जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजी महाराज हे जेव्हा स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले तेव्हा त्यांनी कुडाळ गावातील मंत्रशास्त्री श्री बाकरे शास्री यांना एक दानपत्र दिले होते.ते तुम्ही खालील फोटोमध्ये पाहू शकता.

या दानपत्राच्या सुरुवातीस छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे व त्यांची वरील सही आहे. त्या सहीचा अर्थ असा होतो की,
‘मी शिवपुत्र संभाजी, या दानपत्रावर जे लिहलेले आहे त्यास आदेशपूर्ण संमती देतो’
मराठा ऐतिहासिक मंडळाकडे हा अमूल्य ठेवा आहे.
मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचे अस्सल दोन चित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
बहिर्जी नाईक यांची कादंबरी वाचा येथे क्लिक करा.
जय शिवराय
जय शंभुराजे
खूप छान माहिती दिली आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जेवढी माहिती मिळवता ती कमीच आहे. जिवनाला नवीन ऊभारी आहे।।.⛳ जय जिजाऊ.।। जय शिवाजी।।🚩.
good