छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची अमोल कोल्हे यांची सरकारकडे मागणी

छत्रपती संभाजी महाराज जयंती उद्या आहे.

मित्रांनो आपण का महाराष्ट्रात राहतो असा प्रश्न पाडणारा आजचा लेख आहे.कारण आपल्याला जी व्यक्ती देवासमान आहे. ज्या व्यक्तीने फक्त ३२ वर्ष वय असताना या मातीसाठी आपले प्राण दिले.त्या आपल्या देवाचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव चक्क महाराष्ट्राच्या महापुरुष यादीमध्ये नाही. हे आपल्याला आज माहीत झाले.

कारण आज डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून महाराष्ट्र शासनाकडे याबद्दल मागणी केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी या ट्विट मध्ये सरकारला लवकरात लवकर महाराष्ट्रातील महापुरुषांच्या यादीत संभाजी महाराजांचे नाव सामील करण्याचे मागणीपर ट्विट केलेले आहे.

संभाजी महाराज जयंती

डॉ.अमोल कोल्हे यांचे ट्विट वाचून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबद्दल केव्हा पाऊल उचलतील ते पाहावे लागेल.

एव्हढंच सांगावेसे वाटते की, आपल्या राजाने दिलेले योगदान मागचे ३०० वर्ष महाराष्ट्र विसरलाच होता.आणि आता पण अशा छोट्या छोट्या गोष्ठी आहेत.

तिथे बारीक लक्ष देऊन इतिहासाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय केलेला आहे. ते बदलण्याची गरज आहे.

आपल्या मनात अशा गोष्ठी असेल की, ज्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या प्रतिक्रिया देऊन कळवा.

8 thoughts on “छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत टाकण्याची अमोल कोल्हे यांची सरकारकडे मागणी”

 1. सौ.अंजली सुभाष गोरेगांवकर

  छत्रपती संभाजी महाराजांनी जे‌ बलिदान दिले आणि स्वराज्य राखण्यासाठी प्रयत्न केला त्याचा विसर कोणत्याही परिस्थितीत कोणाला होताच कामा नये.उदया १४ मे छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे.महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज नगर होणे अगत्याचे …महान व्यक्ती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना सुध्दा आदराचे स्थान मिळालेच पाहिजे.धन्यवाद

  1. Amhi hech pahnnasathi Mla,mp nevdun delet kaa yacha kadun kahi hot nasel tar rajinamma daun kirtan kara baki kahi appkcha nahi rahilayat ek divas punna apan gulam hout .

 2. Saachi Sachin jagtap

  त्यांच्या मृत्युनंतर शत्रु पण रडला अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज्यचे नाव थोर महापुरूष्याच्या यादीत यायलाच पाहीजे

  1. अमोल श्रीपती पाटील.

   हे अगदी बरोबर आहे की, संभाजी महाराजांच नाव महापुरूषांच्या यादीत नसण हि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या साठी खा. डाँ. अमोल रामसिंग कोल्हे. यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना आपण सर्वांनी पाठिंबा दर्शवायला हवा.
   जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  2. सरकारने ही चूक केलीच कशी संभाजी महाराजांचे नाव कसे नाही महापुरुषांच्या यादी मध्ये धिक्कार असो या मूर्ख सरकारचा अश्या महान
   योद्धाच बलिदान विसरावे हीच मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची

 3. Jyotsna Hande

  Sambhaji maharaj cha maan ha khup motha ahe tyacha karkardi avdha tyna tyacha maan milun jaynti tyachi dar varshi dankayt sajari hone garjeche hee vinanti sarkar la ahe

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!