स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा दुर्दैवी शेवट

सध्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट घडणार आहे. आपल्या देवाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना मुकर्रबखान अटक करणार आहे.
प्रत्येक शिवशंभू भक्ताला असेच वाटते आहे की, आपल्या शंभूराजांचा असा दुर्दैवी शेवट घडायला नको होता.

आपल्यापैकी कित्येक जणांना ही मालिका,आपल्या राजाचा दुर्दवी शेवट पाहायचे धाडस होत नसेल. मला तर असे वाटते की, भूतकाळात जावे आणि आपल्या राजाला वाचवण्यासाठी आपण प्राण द्यावे. आपल्या राजाला वाचवावे, फक्त आपल्या राजाचे ३२ वर्ष वय होते. इतक्या कमी वयात असे घडायला नको होते.

आपल्यापैकीच एका मावळ्याने आपल्या संभाजी महाराजांच्या बलिदानावर एक काव्यरूपी लेख लिहला आहे. तो वाचून नक्कीच आपले दुःख कमी होण्यास मदत होईल व आपला स्वाभिमान वाढेल हे मात्र नक्की !

व्यर्थ न हो बलिदान !

“संगमेश्वर, देसाई वाडा, मुकर्रबखान आणि दगा या चार शब्दांचा अर्थ एकच जगाशी झुंज देत असताना,
आप्त-स्वकीयांच्या गनिमी काव्याचा अंदाज पहिला घ्या.
काय माहित कोण फितूर बनून तुमचा घात करायला बसला असेल”.

“उद्याच्या स्वराज्यरक्षक संभाजी च्या भागात घडणार या जगातील सर्वात खेदजनक घटना जिने इतिहासाची पानं बदलली गेली.
ती दाखवली जाणार, ती म्हणजे आपल्या देवाची “छत्रपती शंभूराजांची अटक.”

“उद्या प्रत्येक घर आणि प्रत्येक नजर ही भरल्या आसवांनी पाहणार अटक आपल्या राजाची, आपल्या धन्याची अटक साक्षात शिवतेजाची.”
बांध तुटेल भावनांचा धरणीकंपातून फुटेल लावा, जेव्हा साखळदंडात अडकलेला दिसेल शिवबाचा “छावा”.

“जी जखम आश्वत्थामाच्या माती नियतीने सोडली कधीही भरुन न येणारी, तशीच काहीशी जखम या सह्याद्रीवर या गडकोटांवर भिमा-इंद्रायणीच्या तिरावर आणि आमच्या ऊरावर सोडली त्याच नियतीने औरंग्याच्या रुपी!”


“ज्या कार्यासाठी ज्या विचारांसाठी त्या सुर्यतेजाने आपला देह सोडला, त्यांच्या कार्याची त्यांच्या विचारांचीच पायमल्ली आज होत आहे.”

“माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा संभाजी जन्माला येईल” अशी गर्जना त्या रूद्रशंभूने मरणाच्या दारात ही अत्यंत अभिमानाने दिली होती. आज देशाला आपल्या राज्याला गरज आहे त्याच कर्मप्रधान “शंभू-भक्ताची“.

फक्त विचार करुन आणि आसव वाहून काय आपण शंभूविचार पुढे घेऊन जाणार आहोत ?

“आपल्या राजाने स्वराज्य कार्यासाठी हसत हसत मृत्यूला ही आलिंगन दिले, त्यांच्या या शौर्यगाथेला फक्त धर्मबंधनात न अडकवता, आपल्याला ते आपल्या कर्मबंधनात उतरवून घेईला हव.”

” जेव्हा कधी आयुष्यात हरल्या सारख वाटेल, वाटा आंधारलेल्या वाटतील, अपयशाच्या चकव्यात अडकल्या सारख वाटेल,

तेव्हा फक्त डोळे बंध करा,

स्मरण करा त्या भिमा-इंद्रायणीच्या काठी झालेल्या सिंहगर्जनेच!

आयुष्यातील प्रत्येक लढाई औरंग्या बनून तुमच्या समोर गुडघे टेकल .

” या घटनेकड किंवा या बलिदानाकडे फक्त भावनिक दृष्टया न बघता, आज वेळ आहे तिला आपली जगण्याची स्फुरती बनवण्याची, आज वेळ आहे त्या निस्सीम देशभक्ती ला आपलस करण्याची!”

“ज्या साठी राज चंदना प्रमाण झिजल,

आपला राजा मृत्यू समोर ही रडला नाही मग आपण का रडायच?

त्या बलिदानाची स्मृती मनात भवानीच्या पोताप्रमाणे धगधगती ठेवत,

आपण मार्गस्थ होऊया शिवशंभूंच्या खर्या विचारांकडे तिच ठरेल

महामृत्यंजयी शंभू राजांना आपली खरी मानवंदना .

जय रौद्र शंभू 🚩

 ओंकार रा गवळी

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून काय घ्यावे , ते आपण नक्कीच शिकायला पाहिजे.

3 thoughts on “स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा दुर्दैवी शेवट”

 1. Aapan sarv bhartiya bandhu bandhav,arthat shiv kalin aani shambhu kalun bhartiya bhu bhaga che nivasijan, aaj swatahchi sarv prakar chi olakh, nahi nahi sampoorn astitvach naman yachya
  margavar tvarene vaat chaal mothya besharmine karit sutalo aahe.Hya adhogatis rokhnya karita imandarine sarvani shiv vichar dhara aatmasaat karayala havi.agdi yanchya balaka paasun te mhataraayan paryant. tarach aapan tya mahan vibhuti na aaple daivat mhanayche hakk milavu shaku

  1. My previous comment is suffering from Mobile’s auto correction function badly.
   That is making me much upset.
   An effort here to correct some words is needed,
   Naman yacha = gamavnya cha
   Yanchya= tanhya

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.