छत्रपती संभाजी महाराज पोवाडा lytics sambhaji maharaj powada

मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा आपण सर्वांनीच खूपवेळा ऐकला असेल. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा आजच्या लेखात टाकलेला आहे.ज्याला पण हा पोवाडा म्हणायचा असेल, त्यांनी हा पोवाडा म्हणावा, लोकांना ऐकवावा व आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहचवावा.

तुळापुरी कैद झाला वीर, धर्मभास्कर, खरा झुंजार,खरा झुंजार,
संभाजी हो छावा शिवाजीचा, तिलक देशाच्या सौभाग्याचा
शिपाई भगव्या झेंडयाचा जी जी जी जी

बालपनी भुकेल्या वाघाला उभा फाडला,

ठार ज्यान केला वीर तो तुरुंगात बसला

औरंगजेब खद्खदुन हसला

आणा म्हणे सामने काफरालाजी जी जी

जखडडनी बेड्या पायाला, खेचून डोर दंडाला

महाराणा तिथे आणिला, ताठायात पुढे येउन वीर ठाकला
बेफिकिर चेहरा पाहून शाहा गांगरला जी जी जी

तबियत हाय का ठीक आपकी बोले कपटाने

होकाराची मान हलवली शूर मराठ्याने

बच्चे जैसा तू है मुझको समझ बात मेरी

जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी

भुवया चढवून संभाजीने कथिले मग त्याला

काय सांगता बोला आलमगीर स्पष्टपने बोला

पथर पूजा करनेवाला धर्म छोड तेरा

आणि प्यारा खुदाका धर्म इस्लामी लेले तू मेरा

भडकला संभाजी मानी जीभ चावुनि

बोले गर्जुनी प्यारा तुझा धर्म असेल तुजला
माझा ही धर्म प्यारा मजला

धर्मासाठी मरीन प्रसंगाला जी जी जी

रागाने जाहला लाल, डोळे इंगळ ,दुनावले बळ
फुगविता दंड दुबळे ठरले बंद सारे तटातट तुटले
शिपाई सारे गडबडले जी जी जी

चटपटे बादशहा मनी, तेज पाहुनी, आवाज चढवुनि

बोले परी उसन्या अवसानान,अरे संभाजी कुत्त्याच्या मरशील मौतिन

बोलू नको मान उंचावुन जी जी जी

संभाजी वीर चेतला, चावून ओठ बोलला

थेरडया आवर जिव्हेला, संभाजी कोण वाटला ?

तुझ्यासारख्या दिन दुबळ्याला, मराठ्याच्या पुजलय पाचवीला

आणि मरणाचा आम्हावर लळा, ये जरा सामने हिरवा खातोतुलाजीजी जी

काफरा म्हणे शंभूला, ह्या क्षणी मारिन तुला
शेवटच्या ऐक वचनाला, हो मुसलमान समयाला
जीवदान देवूनी करीन सरदारतुलाजी जी जी

संभाजी हसून बोलला,

सरदारी ठेव शिलकेला नाहीतर वाट कोल्ह्या कुत्र्याला
तुझी बेटी देवून मला जावाई जरी त्वा केला
लाथेच्या ठोकरीन उडविन त्या मोहालाजी जी जी

काटा याची जीभ उमटले शब्द बादशहाचे
हाती भाले धरून धावले गुलाम तुकडयाचे
जीभ कापन्यापूर्वी छावा सिंहाचा वदला
” हिन्दू धर्म की जय ” तयाचा नाद नभी भरला
जिव्हा तुटली, वाचा मिटली तरी नयन त्याचे
पेटपेटुनी सांगत होते बीज मराठ्याचे
डोळे ही काढा याचा, जाहला हुकुम शहाचा जीर हाजीरर जी जीजी
अंगात खुपसले भाले धरणीवरराजा लोळेजीरहाजीररजीजीजी
जिवाची विझली ज्योत, राहिले तेज दुनियेत, तेज दुनियेत हा जी जी जी

धर्मासाठी पाचप्राण ते पणास लावावे
संभाजिचे नाव अमर ते नंतर मग घ्यावे
तुलापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती
अमर पिराजी हीच लावितो मिनमिनती पणती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!