छ.संभाजी महाराजांनी एकूण कोणकोणत्या लढाया केल्या?

छत्रपती संभाजी राजांनी ९ वर्षात १४५पेक्षा अधिक लढाया केल्या, म्हणजे सरासरी वर्षाला १६ व महिन्याला सरासरी १ लाढाईस सामोरे जावे लागले. छत्रपती संभाजी महाराज एक पण लढाई हरले नाहीत.

१) सन १६८१-

१. जानेवारी १६८१ – छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर (म.प्र.) हल्ला
केला. हिंदुस्तानातील मोगलांच्या साम्राज्याचे दुसऱ्या
क्रमांकाचे संपन्न शहर होते.

२. फेब्रुवारी १६८१ – बागलाण (नाशिक) भागात सैन्य संचलन.
औरंगाबाद-औरंगजेबाच्या सैन्याची धुळधाण.

३. मार्च-एप्रिल १६८१ – नळदूर्ग किल्ल्यावर छत्रपतीं संभाजी महाराजांच्या सैन्याने धाराशिव (उस्मानाबाद) येथे धडक मारली.

४. मे १६८१ – दमनच्या बाजूने आपली घोडी दामटली.

५. जुले १६८१ – खांदेरी-उंदेरीवर आक्रमण.

६. ऑगस्ट १६८१ – स्वराज्याच्या सेनापतीने सिद्वीच्या
जंजिऱ्या जवळच्या उंदेरी बेटावर (किल्ला) पुन्हा हल्ला
केला.

७. ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८१ – मराठ्यांचा एक सरदार ५०००
सैन्यासह अहमदनगरवर चालून गेला. मुलहेर, सालहेर.

८. १६८१-छत्रपती संभाजी राजे यांचे सैन्य सोलापूरात
घुसले.

२) सन १६८२ – वरील वर्ष १६८१ मधील चौफेर हल्यांप्रमाणेच वर्ष
१६८२ नंतरही छत्रपती संभाजी राजे यांचे सरदार शत्रूवर तुटून
पडले. रहिमतपूर शिरवळ (सातारा), सांगोला, मंगळवेढा, इ.
मोगल प्रदेशात धुमाकुळ घातला.

३) सन १६८३ – कावेरी नदीच्या महापूरात रात्री घोडी दौडवून
म्हैसूरवर मराठी झेंडा फडकवला. कल्याण-भिवंडी, रेवदंडा
(रायगड )

४) सन १६८४ (११ नोव्हेंबर) – इंग्रजांवर वचक बसवून तह केला,
लोहगड-उमरगा (धाराशिव) येथे लढाई केली.

५) सन १६८५ – प्रचंडगड रोहिडा (सातारा) किल्ला, कारवार
(कर्नाटक) मराठ्यांनी धरणगाव लुटले. इंग्रजांची वखार जाळली.

६) सन १६८६ – विजापूर, गोवळकोंडा या दख्खनच्या मित्रांना मोठी
मदत केली (१२००० घोडदळ व ५००० पायदळ पुरविले) –
पुन्हा म्हैसुरवर आक्रमण करुन राजा चिक्कदेवराय यांना
शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

७) सन १६८६ (मार्च) – मिरज, सांगली, कोल्हापूर येथील मोठ्या
मोगळ तळावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी २०,०००
सैन्यासह आक्रमण केले. मोगलांचा बेळगावपर्यंत पाठलाग केला व
बेळगाव किल्ला जिंकला.

८) सन १६८७ – मराठ्यांनी कर्नाटकातील कावेरी पाक व चेतपेठ या
किल्ल्यांवर हल्ले चढवले आणि पुढे चेपट्टण येथे पर्यंत मजल मारली. हरजी राजे यांनी अकार्ट कांजीवरम जिकून मद्रासपर्यंत धडक मारली. इंग्रजांचा किल्ला फोर्ट जॉर्ज याला वेढा दिला.

९.सन १६८८ – हरजीराजे यांनी पॉडेचरीला धडक मारली व
पॉडेचरी जिंकली. पॉडेचरीच्या गर्व्हनरला व्यापारी सवलती दिल्या.

अशाप्रकारे सिन्नर, बागलाण (नाशिक), जालना, धारुर (बीड)
रामनगर-पेडगाव-बहादूरगड (अहमदनगर), चौल-रेवदांडा
(रायगड), भिवंडी-कल्याण (ठाणे), वऱ्हाड प्रांत (धुळे-
जळगाव), मडगाव-म्हापुसा-साष्टी-जुवे-बारदेश (गोवा),
भीमगड, विजापूर, धरणगाव, दिंडोरी किल्ला, पुन्हा अहमदनगर
इ. भागात कधी छुपे तर कधी उघडपणे आक्रमण केले. यातील
बऱ्याचशा आघाड्यांचे नेतृत्व स्वतः छत्रपती संभाजी राजे करत
होते. उदा. जंजीऱ्यावरील आक्रमण – गोवा, म्हैसुर इ. वरील
आक्रमणे.

तसेच छत्रपती संभाजी राजांनी चित्रदुर्ग, धर्मपुरी, म्हैसुर, जिजी
(कर्नाटक राज्य), त्रिचनापल्ली, मद्रासचा भाग, पॉडेचरी
(तमिळनाडू), त्रिवेंद्रम (केरळ) इत्यादी दक्षिण भागातील २२
किल्ले स्वराज्याला जोडले.

मित्रांनो, आमच्याकडून जर संभाजी महाराजांची एखादी लढाई जर चुकून राहिली असेल तरर नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!