shivaji maharaj aarti

Shivaji Maharaj Aarti Lyrics by Savarkar छत्रपती शिवाजी महाराज आरती

छत्रपती शिवाजी महाराज आरती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहलेली आहे. या आरतीचे बोल आपण खाली टाकलेले आहेत.

या आरती व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आनंद शिंदे यांनी गायलेली अजून एक आरती आहे. ती जर तुम्हाला हवी असेल तर येथे क्लिक करा. आपणा सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आरती खाली वाचा.

Below is the shivaji maharaj aarti lyrics which is written by Freedom fighter Vinayak Damodar Savarkar. there is another shivaji maharaj aarti lyrics version which is sung by Aadarsh Shinde. You can read here. Chhatrapati shivaji maharaj is our god. so as per my view everyone has responsibility to read shivaji maharaj aarti.

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला.!

सद्गगदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ह्रदय न का गेला…..१

जय देव जय देव जय जय शिवराय

श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?…….२

जय देव जय देव जय जय शिवराया ||

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या……….३

जय देव जय देव जय जय शिवराया ||

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरलादेशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला……….४

जय देव जय देव जय जय शिवराया ||

1 thought on “Shivaji Maharaj Aarti Lyrics by Savarkar छत्रपती शिवाजी महाराज आरती”

  1. Pingback: शिवाजी महाराज आरती Lyrics shivaji maharaj aarti Lyrics

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!