छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवगर्जना आपण बऱ्याच वेळा ऐकलेली आहे. ती ऐकताना आपल्या अंगावर शहारे येतात व आपला उत्साह दुप्पट होतो. आजच्या या लेखात आपण त्या शिवगर्जनेचा अर्थ समजून घेऊयात. कारण ती काळाची गरज आहे. आपण जर खरे मावळे असाल तर आपल्याला तिचा अर्थ सांगता आला पाहिजे. Shivaji Maharaj Garad Meaning
तर शिवमित्रांनो , छत्रपती शिवाजी महाराज दरबारात प्रवेश करताना जी गर्जना/ललकारी दिली जायची तिला मराठीत ”गारद” असे म्हणतात. बरेच लोक शिवगर्जना असेही बोलतात. ऊर्दूमध्ये ह्या ललकारीचा अर्थ आहे ”अल्काब” तसेच आपल्या संस्कृतमध्ये ”बिरुद” किंवा ”बिरुदावली” असा उल्लेख केला जातो. हा झाला शिवाजी महाराज गारद विषयी इतिहास. आता आपण तिचा अर्थ माहित करून घेऊयात. Meaning of Shivaji maharaj Garud or Shivgarjana
1, गडपती म्हणजे गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य ( राज्य/ सत्ता ) आहे असे
2. गज-अश्वपती म्हणजे असे राजा-महाराज ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे. त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न राजा असेही म्हणू शकतो.
3. भूपती आणि प्रजापती म्हणजे प्रामुख्याने राजाने राज्याभिषेक करणे म्हणजे राजाचा भूमीबरोबर किव्हा मातीबरोबर झालेला विवाह आहे, म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो या सर्वांचे सर्वथा रक्षण करणार हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे.
4. अष्टावधानजागृत म्हणजे आठ प्रहर ( वेळ ) आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा )
5. सुवर्णरत्नश्रीपती म्हणजे अनेक हिरे, माणिक, मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य म्हणजे मालकी आहे,, शिवाजी महाराजांच्या बाबतीत ३२मन सोन्याचे सिंहासनाचे १ करोड होनांचे अधिपती.
6. न्यायालंकारमंडीत म्हणजे कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.
7. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत म्हणजे सर्वच्या सर्व शस्त्रविद्येत व शास्त्रामध्ये पारंगत/निपूण असलेले राजे.
8. राजनितीधुरंधर म्हणजे राजनितीमध्ये तरबेज असलेले राजे.
9. प्रौढप्रतापपुरंधर म्हणजे पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे महाप्रतापी राजे
10. क्षत्रियकुलावतंस म्हणजे क्षत्रियवंशात किव्हा कुळात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे.
10. सिंहासनाधिश्वर म्हणजे जसा देव्हा-यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती.
11. महाराजाधिराज म्हणजे सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सा-या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजे.
11. राजाशिवछत्रपती म्हणजे ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवराय.
I hope you like above meaning and lyrics of shivaji maaharaj Garad as well as sivgarajana