शिवाजी महाराज चरित्र भाग ५

शिवाजी महाराज बालपण

जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभ वर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता.

देवधर्म, पूजाअर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. पाचव्या दिवशी बाळंतघरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पुजला गेला. पाचव्या, सहाव्या आणि आठव्या दिवशी अशाच पूजा झाल्या.

लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी जरीबुट्टी शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या,

“राणीसाहेब, हा रंग चांगला आहे, नाही ?’
ह हो अ
‘बारशाला हाच ठसवू.’

“लक्ष्मीबाई!’ जिजाबाईंचा कंठ दाटला. “किती करताय तुम्ही!’
“पण आम्ही परके, ते परकेच!’ लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या.
“मी केव्हा म्हटलं परकं?

“तुम्ही विसरला असाल; पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले, तर चारचौघांत म्हणालात… ना माहेरी… ना सासरी…

“ते मनावर घेऊ नका, बाई! सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं; पण अजूनही वाटतं…

“काय?

“बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणी तरी हवं होतं.

“सांगा ना सरळ की, राजेसाहेब यायला हवेत, म्हणून.’

जिजाबाई लाजल्या.

दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले : शहाजीराजांच्या मातोश्री, जिजाबाईंच्या सासूबाई

उमाबाईसाहेब गडावर येत आहेत.

वाड्याच्या दरवाज्याशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला.
बाळंतघराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या,

“बेटा, बाज सोडून कशाला आलीस? मी नसते का आले?!
बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत, त्यावरून सतका

करीत उमाबाई म्हणाल्या,

“तुझ्याच वळणावर गेलाय्‌, हो! बारसं केव्हा ?’

लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘उद्याच! कालच राणीसाहेब म्हणत होत्या, की बाळाच्या घरचं कुणी तरी हवं, म्हणून.’

“वाटणारच पोरीला!… जिऊ, चांगला आहे, हो, मुलगा. मनात आणशील, ते पुरं करणार, असं दिसतंय्‌…’ आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, “आणि याच्या बापाला कळवलं का?

ह हो

“कुठला येतोय्‌ तो. घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो! जळ्लं ते राजेपण!

दोघी हसून उमाबाईंचे ऐकत होत्या.

थोडा वेळ गेला, आणि उमाबाईंनी विचारले,

“केव्हा उठणार, ग, हा?!

जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या,

“सासूबाई! घ्या ना. उठला, म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल.’

“नको, ग. मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठं आहे, ग?’
“स्वारीबरोबरच…’

“तो एक गाढव; आणि लहान पोराला पाठवणारी तू सात गाढव! अशी पोराची

वणवण करतात का? मी असते, तर सांगितलं असतं…” नि:श्वास सोडून त्या म्हणाल्या,
“पण माझं तरी कुठं ऐकतोय्‌ तो?’
उमाबाई बारीकसारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानांवर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या; आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले.

पहाटे गड जागा झाला, तो सनई-चोघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा-जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले.

बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलविली. शास्त्रयांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूयोदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरांतील स्त्रिया डोलीमेण्यांनी गड चढत होत्या.

गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कोतुकाने पाहत होत्या.साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्याजणी पाळणा सजवू लागल्या; बाळाला सजवू लागल्या.

गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले,

“बाळाचं नाव काय ठेवायचं ?’

“तू काय ठरवलंस ?’

“शिवाईला नवस बोलले होते. “शिवाजी ठेवू या.’
“ठेव! चांगलं आहे.

सुवासिनींनी बाळाला, जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतला.
“गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या,

“शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या-चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव ‘शिवाजी’ ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले.

वाड्याबाहेरे मेणा तयार होता. बाल शिवाजी देवीदर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासीपरिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती.

त्यांच्या पुढे मंगल वाद्ये वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड

करीत होते. त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला नकळत विश्वासरावांनी विचारले,

“काय हे?
जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या,

“आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला, तर त्यांनी देवीवरून शंभर मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला; नवस तेवढा मागं राहायला नको.’

जिजाबाईंनी पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला.

थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते.

बाल शिवाजीच्या उशापायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!