जय शिवराय मित्रांनो, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आपल्या आयुष्यातील सर्वात आवडते योगपुरुष! आपले राजे! माझा राजा! आपला देव! अशा या आपल्या देवाचे शिवविचार आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मी तर स्वतः ला खूप भाग्यवान समजतो की, मी माझ्या देवाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर मांडतो. असो,आजचा आपला विषय नक्कीच तुम्हाला आवडेल.छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?
मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगभरात उपलब्ध असलेली दुर्मिळ चित्रे व त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत.
१.लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात खालील शिवाजी महाराजांचे चित्र आढळते. हे चित्र १६८३-८५ दरम्यान काढलेले असावे. (Ref Album no. 1974-6-17-011.)

२.पॅरिसमधील १६८०मध्ये काढलेले शिवाजी महाराज यांचे हे रेखाचित्र आहे.

३. १८७२ या वर्षी मधील रॉबर्ट आर्म यांच्या हिस्टोरीक फ्रागमेंट्स (Historical Fragments) या पुस्तकात हे चित्र छापलं आहे.

४.हे चित्र प्रसिद्ध चित्रशाळा किशनगड येथील सावंतसिगं महाराज यांचे चित्रकार निहाल चंद्र यांनी १७५० साली तयार केले होते. या चित्रात राजांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दानपट्टा दाखवण्यात आला आहे. हे चित्र लंडनमधील बॉनहॅम्सच्या संग्रहालयात उपलब्ध आहे.

५.फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात १८६५ साली गोवळकोंडा येथे काढलेले शिवरायांचे चित्र ठेवलेले आहे. ह्या चित्रामध्ये वृद्धापकाळाकडे झुकलेले शिवराय नजरेस पडतात.

६.शिवाजी महाराजांचे उभे असलेले हे चित्र आहे. ह्या चित्र मध्ये उजव्या हातात तलवार व डाव्या हातात पट्टा आहे. हे चित्र फ्रांसमधील राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवलेले असून हे १७ व्या शतकाच्या शेवटी काढलेले आहे.

७.छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले हे खालील चित्र आहे १७८५च्या युनिव्हर्स पिक्चर आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी या चित्रकाराने काढलेलेआहे.

८.१८व्या शतकातील राजपूत मुघल शैलीतील खालील चित्र आहे.हे चित्र राजस्थान मध्ये प्राप्त झाले आहे.


छत्रपती संभाजी महाराज हस्ताक्षर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हे अमूल्य चित्रांचा ठेवा अजावर जपुन ठेवाला आणि मझा राजांची प्रतिकृति हबेहुब चिताराली त्या कलाकरांचे कौतुक करायला शब्द नहित, पन येक खंत आहे आशा राजांचे मिउज़ियाम भरतात असवे सर्वना पहन्यास शक्य होइल। धन्यवाद,,,,
Thank You sir For Sharing Such Rare Photos Of Maharaj. Jay BHAVANI JAI shivaji.
Super mahaiti ahhe