शिवप्रेमींनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले कि नकळत आपल्या अंगावर शहरे येतात. त्यांच्या पराक्रमाने आपली छाती गर्वाने फुलते. आणि यात भर पडते जेव्हा आपण शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकतो. आपल्या आनंदामध्ये खूप पटीने वाढ होते. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जगभरातून प्रत्येक जण हा त्यांचे पोवाडे सादर करण्यासाठी तयारी करत असतो. आणि याच मावळ्यांची थोडीशी मदत करण्यासाठी आज आपण छत्रपती शिवाजी महाराजनचे पोवाडे त्यांना उपलबध करून देणार आहोत.
Shiv lovers, Chhatrapati Shivaji Maharaj has unique power, by saying their name Our chest swells with pride at their prowess. And it adds to this when we hear Shivaji Maharaj’s powada. Your happiness increases manifold. Every year on the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj i.e. shivjayanti, everyone from all over the world prepares to present shivaji maharaj Powada. And today we are going to make Chhatrapati Shivaji Maharaj’s Powada lyrics available to them to help these Mawlas a little.
shivaji maharaj powada lyrics in marathi
महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती
महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम
याला कोण घालिल येसन, दरबारी पुसती बेगम
बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!
नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,
इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला
हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला
नाव त्याच अफजलखान …(X २)
जिता जागता जणू शैतान
खान बोलला छाती ठोकून,
शिवबाला टाकतो चिरडून
मरहबा, सुभानअल्लाह
कौतिक झाले दरबारात
खान निघाला मोठ्या गुरमित
त्याच घोडदल पायदळ
फौजा फाटा लई बक्कल
अंगी दहा हत्तीच बळ,
पाहणारा कापे चळचळ
वाटेत भेटेल त्याला चिरडीत,
ठेचीत खानाची सेना निघाली
गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली
आया बहिणींची आब्रू लुटली
कोण कोण रोखणार हे वादळ
आता शिवबाच काही खर नाही
इकडे निजाम, तिकडे मोगल
पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला
राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार
काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार
अश्या वाघिणीचा तो छावा…. (2)
गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा
भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,
प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान
हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …
दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(3)
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची…..( २)
अन त्यास नाही जाणीव शक्तिची……( २)
अन करील काय कल्पना युक्तिची
हा जी जी जी …(३)
खानाच्या भेटीसाठी …( २)
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला …( २)
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगती महाला
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ
खान हाक मारीतो हसरी …( २)
रोखून नजर गहिरी
जी र जी जी …
खानान राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला …(२)
कट्यारीचा वार त्यान केला …( २)
खर खर आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजानी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा
बाहिर आला जी र जी जी …(३)
We know this shivaji maharaj powada lyrics is helped you lot for the preparation. that is our main intention.
आम्हाला माहित आहे की या शिवाजी महाराज पोवाड्याचे बोल तुम्हाला तयारीसाठी खूप मदत करतात. हाच आमचा मुख्य हेतू आहे