शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन नक्की मोघलांनीच जाळले होते का? की ते येसूबाईंनी सुरक्षित ठेवले?

मित्रांनो आपल्यापैकी खूप जणांना हेच माहीत असेल की, छ्त्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले ३२ मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन रायगडचा पाडाव झाल्यानंतर मोगलांनी वितळवून टाकले.आणि सर्व खजिना त्यांच्यासोबत घेऊन गेले.

नाही…!

सिंहासनाचा इतिहास जेव्हा राजमुद्रा चॅनलने जाणून घेतला तेव्हा आम्हाला लक्षात आले की, शिवसिंहासनाचा इतिहास आपण समजतो तसा नाहीये.स्वराज्यात सर्वात मौल्यवान असलेले हे सिंहासन मराठे इतके सहजपणे मोगलांच्या ताब्यात कसे देतील?

तर जाणून घेऊयात नेमके इतिहास याबद्दल काय सांगतो ते.
नोंद क्र. १– ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा या ३२ मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावर आपले राजे आरूढ झाले.

नोंद क्र.२– २५ मार्च १६८९ ते ३ नोव्हेंबर १६८९ रोजी झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडला वेढा दिला होता.

नोंद क्र.०३ ३ नोव्हेंबर १६८९ ते १७०७-०८ पर्यंत रायगडावर मोगलांचे राज्य होते.औरंगजेबाने रायगडचे नाव इस्लामगड ठेवले होते. आपण जो सिंहासन जाळून फोडले असे म्हणतो ते या कालावधीत घडले असेल असे मानुयात.


नोंद क्र.०४– १७०७ ते १७३३ पर्यंत रायगड जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात होता.

नोंद क्र.०५-१७३३ छ्त्रपती शाहूंनी रायगड जिंकून घेतला व तो स्वराज्यात आला.

नोंद क्र.०६ १७७३ ला रायगड पेशवेंच्या ताब्यात आला.आप्पाजी हरी यांच्या अधिपत्याखाली रायगड होता.इथे एक नोंद विचार करावयास लावते ती म्हणजे ‘ आप्पाजी हरिंनी सिंहासनास मुजरा केला व सिंहासनसमोर ०५ रुपये ठेवले.तसेच पेशवेंच्या कागदपत्रात देखील सिंहासनाच्या खर्चाचा उल्लेख वारंवार सापडतो.त्यांनी १७९७ पर्यंत सिंहासनासाठी लागणाऱ्या कापडाची नोंद केली आहे.

नोंद क्र.०७-१७९६-१७९७ मध्ये नाना फडणवीस प्रथम महाड येथे व नंतर रायगडावर आले.आणि त्यांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची व्यवस्था केली अशी नोंद मिळते.

नोंद क्र.८ सन १८१८ मध्ये रायगड इंग्रजांनीं जिंकला.

१६८९ रोजी महाराणी येसूबाई यांनी रायगड मोघलांच्या ताब्यात देण्यापूर्वी गडावरून दोन सश्रद्ध दैवते हलवली होती.प्रथम शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन व दुसरे जगदीश्वराचे शिवलिंग… जगदीश्वराच्या शिवलिंगास त्यांनी रायगडाच्या रहाळ्यात असलेल्या वारंगी गावात हलवले होते.असा उल्लेख आढळतो..सिंहासन नेमके कुठे ठेवले त्याची नोंद नाही.

वरील ७ नोंदीवरून हेच स्पष्ट होते की, ३२ मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन रायगडावर होते.मोगलांच्या ताब्यात गेले नव्हते.त्याबद्दल अजून एक पुरावा म्हणजे शिवकाळात आणि पेशवेकाळात गडाची व्यवस्था ही ‘ शेडगे ‘ कुटुंबाच्या ताब्यात होती.

त्यांच्या पिढीजात एक लोककथा पुढे येते ती म्हणजे, इसवी सन १८१८ ला रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर गडावरील सर्व कुटुंबांना गडाखाली पोहचवण्याची जबाबदारी दोन नेक सरदारांनी स्वीकारलेली होती.त्यांचे नावे खंडोजी आणि यशवंता असे होते.

या दोन सरदारांनी सर्वांना गडाखाली पोहच केल्यावर आपले राहिलेले महत्त्वाचे काम गुपचूपपणे सुरू केले. त्यांनी गडाचे सर्व दरवाजे आत मधून बंद करून घेतले.आपल्या सोबतीला अजून ७ जण घेतली व अशे एकूण ९ जण राजसभेत आले.

सर्वांनी प्रथम ३२ मण सुवर्ण सिंहासनास शेवटचा मुजरा केला. व सर्वांनी शिव सिंहासन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले. पुढे ४ जण व मागे ५ जण असे धरून मेणा दरवाजा पर्यंत आणले.आणि मजबूत दोरखंडाच्या साहाय्याने ९ पैकी ७ सरदार काळकाई खडग्यातील वाघ जबड्यात उतरले.

त्या सर्वांनी त्याला तिथेच पुरून टाकले.आणि त्यांनी काम फत्ते केले.

दोरखंडाच्या सहाय्याने ते जेव्हा वर येत होते तेव्हा वर असलेल्या यशवंत व खंडोजी या दोन सरदारांनी त्या सात सरदारांचे एका मागुन एक परतीचे दोरखंड कापून टाकले. कारण फंद फितुरी करण्याचा धोका होता.

उद्या कोणीही त्या सोन्याच्या लालसे पोटी त्या ३२ मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनाची जागा दाखवली असती व ते लुटले असते.

खंडोजी व यशवंता ने पण तिथेच आपला जीव दिला. त्या ९ सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन शेवटचे पाहिले.

वरील सर्व संदर्भ नोंदीवरून आपण असे निष्कर्ष काढू शकतो की, सिंहासन हे अजूनपन रायगडवर एखाद्या अज्ञात जागेत असेल.शोध घेतला गेला पाहिजे.इतिहासलाच माहिती खरे काय?

मित्रांनो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास कसा वाटला ते कंमेंट करून नक्की कळवा!

बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाची गाथा वाचा..येथे क्लिक करा.

4 thoughts on “शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन नक्की मोघलांनीच जाळले होते का? की ते येसूबाईंनी सुरक्षित ठेवले?”

  1. नवनाथ शांताराम साळवी

    ३२ मण सोन्याचे सिंहासन यासंदर्भात संदर्भ द्या.

  2. Sinvhasan sapadle tar te marathyanchya itihasatil sarvaat motha purava va shodh hoil. Mahiti dillyabaddal khup dhanyavvad. Chhan vatla aplya rajancha sinvhasan aplyakadech ahe.jalala nahi.

  3. विनायक

    आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिहांसनाचा शोध घेतला पाहिजे. ते आपले दैवत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!