Sukh mhanje nakki kay asta 2 february Promo

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या ०२ फेब्रुवारीच्या भागातील प्रोमो तुम्ही खाली पाहू शकता.

माईंनी गौरीला दिला सुनेचा मान

View this post on Instagram

Shared post on

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत.दादा आणि माई देवीची प्रती स्थापना करण्याचा ठरवतात आणि त्यासाठी गुरुजींना बोलावतात.जयदिपच्या हाताने गौरीचा उपवास सुटतो.सर्वजण खुश असतात.

त्यानंतर गुरुजी घरी येतात सर्वजण देवीच्या पूजेसाठी तयार होऊन खाली येतात.तेव्हा दादा माई गौरी आणि जयदीप च्या हाताने आंबबईची पूजा करण्याचं ठरवतात.तेव्हा जयदीप गौरी मनोभावे देवीची पूजा करतात.तेव्हा माई गौरीला बोलतात अखेर तू शिर्के पाटील घराण्याची अंबाबाई परत आणलीस.तुझी श्रद्धा फळाला आली.त्याचमुळे आज मी अंबाबाई समोर तुला तुझे अधिकार परत देत आहे.तेव्हा शालीनीला मोठा धक्का बसतो.

तर माई गौरीला बोलतात जस रोज सकाळी आईच्या नात्याने तू माझ्यासाठी गजरा बनवून माझ्या केसांमध्ये लावायची.तसच आजपण घे तो गजरा आणि माळ माझ्या केसांमध्ये.

तेव्हा गौरीला खूप आनंद होतो ती लगेच गजरा घेऊन माईच्या केसांमध्ये लावते.तेव्हा दादा गौरी आणि माईंच खूप कौतुक करतात.तर माई गौरीला आनंदाने देवासमोर मिठी मारतात.अशा प्रकारे माई गौरीला मुलीचा अधिकार परत देतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!