लोकप्रिय टीव्ही सिरीयल सुख म्हणजे नक्की काय असतं ही सीरियल आता अतिशय रोमांचक वळणावर पोहचली आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरी आणि जयदीप यांच्या प्रेम कथा आता सहा वर्षाची झेप घेतली आहे. जयदीप आणि गौरी यांची मुलगी लक्ष्मी मोठी झाली असून बालकलाकार साईशा साळवी तिची लक्ष्मी च्या भूमिकेत एन्ट्री करणार आहे.

जयदीप आणि गौरी ची मुलगी लक्ष्मीची भूमिका साईशा साळवी ऑन-स्क्रिन करणार आहे. साई साळवी ही मूळची पुण्याची राहणारी आहे. तिला अभिनयाची आवड आहे. साईशा साळवी ने यापूर्वी अनेक जाहिराती आणि लघुपट यामध्ये काम केले आहे. पिंकी चा विजय असो या सिरीयल मध्ये तिने तिची भूमिका साकारली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीयल मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारण्यासाठी सायशा आता खूप उत्सुक आहे. सिरीयल मधल्या कलाकारांसोबत देखील तिने चांगले नाते निर्माण केले आहे. साईशा साळवी म्हणजेच लक्ष्मी आता सेटर सर्वांची आवडती बनली आहे.
हे पण वाचा : संभाजी महाराजांचा खरा फोटो Sambhaji Maharaj Original Photo

साईशा साळवी ही चाइल्ड मॉडेल आहे तिचे सोशल मीडिया चे फोटो पाहून तुम्हाला कळेलच. साईशा साळवीच्या वडिलांचे नाव हेमंत साळवी आहे आणि आईचे नाव श्वेता साळवि आहे. साईशा चे वडील हेमंत साळवी हे हॉटेल व्यवसायिक आहेत. तसेच साईशाला आणखी एक बहीण आहे. साईशा ने आत्तापर्यंत लहान मुलांच्या कपड्याच्या विविध ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केले आहे. तसेच पी.एन.जी ज्वेलर्स, एन्को केअर यासारख्या विविध व्यवसायिक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.

साईशा चार वर्षाची आहे तरी पण एवढ्या कमी वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले आहे. टाइम्स फॅशन विक, बॉलिवूड फॅशन विक यासारख्या मोठ्या मंचावर साईशाने वॉक केला आहे.