स्वराज्यरक्षक संभाजी मालिका लवकर का संपवली? त्यामागील कारणे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा आत्ताच शेवटचा भाग झाला..अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहण्याची वेळ आली होती.

महाराणी येसूबाईंना त्या नवीन रुपात पाहून मन गहिवरून आले.किती हा त्याग! आबासाहेबांसाठी, स्वराज्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी…


आणि आपल्याला हा ज्वलनतेजस इतिहास आत्ता समजतो, किती दुर्दैव म्हणावे लागेल.


आगोदर छत्रपती संभाजी महाराज हे नाव तर् निघतच नव्हते, जरी निघाले तरी इतकेच माहीत होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा वायला गेलेला पुत्र!’


पण आज समजते त्यांच्या कार्याबद्दल, बलिदानाबद्दल आणि स्वराज्यरक्षनाबद्दल..
हे सर्व अमोल कोल्हे आणि त्यांच्या जगदंब क्रियशन व झी मराठी वाहिणीमुळे शक्य झाले. त्या सर्वांचे कोटी कोटी आभार..


पण शिवमित्रांनो, मागील काही महिन्यांपासून मालिका खूप वेगाने पुढे पळवली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम १६८१ ते १६८९ याच कालावधीत सर्व होता.अन तो फक्त ३ महिन्यामध्ये दाखवण्यात आला.बराच इतिहास दाखवला गेला नाही. अनाजी दत्तो व कटकारस्थाने सुरू होती तेव्हा मालिकेचा वेग खूप हळू होता.हत्तीच्या पायी देण्यासाठी ६ महिने खर्च झाले.


कोंडाजी बाबा फर्जंद यांचे योगदान जसे सविस्तरपणे दाखवले तसे आत्ता पण दाखवायला पाहिजे होते.


त्यामध्ये गोवा मोहीम, इंग्रजांबरोबर झालेला करार, पोर्तुगीज सोबत झालेल्या लढाया,
मुंबईचा पराक्रम, कल्याण-डोंबिवली लढाई अशा अनेक गोष्टी दाखवलेल्या नाही त्यामुळे थोडी खंत वाटते.

मालिकेचा वेग का वाढला त्याबद्ल दोन मुद्दे पुढे येतात.पहिला म्हणजे अमोल कोल्हे हे खासदार झाल्यामुळे कदाचित त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे असे झाले असेल.

दुसरे म्हणजे झी वाहिनीचा मालिका लवकरात लवकर संपवण्याचा दबाव असेल, वेळेअभावी काही तरी कारणे असतील.

तरर झी वाहिनीला मी सांगू इच्छितो झी वाहिनीवर अशा काही अर्थहीन मालिका आहेत.त्या खूप दिवसापासून बळच चालवलेल्या आहेत.उगाच काहीतरी वळण द्यायचे अन त्या सुरू ठेवायच्या. माझ्या नवऱ्याची बायको सिरीयल मध्ये तर् माझ्या बायकोचाच दुसरा नवरा झाला.

यांना या गोष्टी दाखवन्यासाठी वेळ आहे. आणि आम्हाला या पूर्वी माहीत नसलेल्या आमच्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा इतिहास सविस्तरपणे दाखवण्यासाठी वेळ नाही.

लाखोंच्या सेनेत संभाजी महाराजांना सोडवण्याचे धाडस करून प्राण देणारे रायप्पा महार, गोवा मोहिमेमध्ये प्राण देणारे कृष्णाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम, संताजी-धनाजी उदय,संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार केलेले गणपत महार हे दाखवायला पाहिजे होते.

हे खूप महत्त्वाचे होते. शंभूराजांनी १०७ अजय लढाया केल्या होत्या ते पण सविस्तरपणे दाखवायला हवे होते. रामशेजची ९ वर्ष चाललेली झुंज सविस्तरपणे दाखवायला हवी होती.


असो त्यांनी त्यांच्या परीने खूप दाखवण्याचा प्रयत्न केला.या मालिकेची इतकी सवय झाली आहे की, आता यापुढे खूप दिवस काहीतरी हरवल्यासारखे वाटेल.उद्याच्या भागात काय घडेल याची उत्सुकता आता असणार नाही.

30 thoughts on “स्वराज्यरक्षक संभाजी मालिका लवकर का संपवली? त्यामागील कारणे”

 1. संभाजी महाराज यांची समाधी व स्मारक आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती दाखविणे गरजेचे होते. संभाजी महाराज म्हणजे उभ्या जगाचे सळसळत्या रक्त सांडले स्वराज्यासाठी दुसरे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो.यापुढील काळात जी वाहिनी वर एकही आवडती मालिका नसल्यामुळे चुकल्या सारखं वाटत आहे.

 2. रुपेश पाटील

  राजमुद्रा, मी आपल्या लिखाणाशी पुर्ण सहमत आहे. ह्या अमराठी धनाढ्य लोकांपुढे (दूरचित्रवाणी चे मालक/ टिव्ही चॅनल) आपला हिरमोड होतो. आपल्याच कोणी तरी मराठ्याने एखादे चॅनल काढावे म्हणजे भारतीय गौरवशाली इतिहासाच्या सर्व घटना नीट दाखवता येतील. जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

 3. तसे ह्या सिरीयल मुळे महाराजांविषयी खूप समजले. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयची सर्वी व्युरचना संभाजी महाराजांनी केली. पण तुम्ही म्हणता महाराजांचे अंत्यसंस्कारचे प्रसंग जर दाखवला असता तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असता. आणि महाराजांना सोडवण्याच्या प्रयत्नाबद्दल म्हणाल तर ते त्यांनी दाखवायला पाहिजे होते.
  आता सोमवार पासून रात्री 9 वाजता काय पाहावे हा प्रश्नच आहे.

  1. यश चव्हाण

   सहमत….
   मालिका संपवण्यात नक्कीच घाई केली….
   काही महत्त्वाचे प्रसंग तर अक्षरशः फक्त बोलून दाखवले आहेत मालिकेत. जसकी फोंडा लढाइ, मुंबई विकत घेण्यासंबंद, कल्याण भिवंडी, गोवेकर पोर्तुगीजांवरचा हल्ला, पोरतुगिज चर्च चे फादरांचे करवतीने हात पाय कापायचा हुकुम…….अजून खूप काही

 4. Kishor Shende

  मालिका घाईने संपवली असे वाटत आहे कारण त्या आधीच्या फालतू मालिका विनाकारण लंबवल्या आहेत त्यातून काहीही समाज शिक्षण नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा सविस्तर इतिहास खूप चांगला दाखवला आहे श्री अमोल कोल्हे यांचे शतशः आभार. ज्या कोणाचा हिंदू धर्माभिमान जागा होणार नाही तो हिंदू नाही. संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये या साठी झोपेतून जागे व्हा.२०२० मध्ये आपण पाहत आहोत परिस्थिती गंभीर होत आहे.देव देश आणि धर्मासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांना विसरू नका, जय छत्रपती संभाजी महाराज- ह हर महादेव

  1. तेजस ज्ञानदेव मुळे

   आमोल कोल्हे याचे शतक आभार छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास आम्हाला दाखवला ते बघुन खरच आम्हाला आभिमान वाटतो आमच्या राज्याचा आम्हाला संभाजी महाराज दाखवुन दिले त्याचे खरे जगणे दाखविले ते बघुन खुप आभिमान वाटतो मराठा आसण्याचा पुन्हा एखदा आमोल कोल्हे याचे लाख लाख आभार 🙏🏼🙏🚩🚩🚩

 5. Swapnil desai

  खरच तुम्ही एका मराठी मावळ्यांच्या मनातील भावना बोलला।हे फक्त शिवरायांचा आणि शंभूराजेंचा मावळा बोलू शकतो।
  🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
  🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩

 6. I do feel that, political acumen and valour of Sambhaji should have been show at least.
  Efforts to release Sambhaji should have been shown.
  Conclusion should have glimse of post action how Martha’s rose like phoenix.

 7. Shripad Puntambekar

  त्यांनी ती मालिका इतकी चटचट अवरती का घेतली ह्याचे अनेक कारणे असू शकतात. पण अनाजी दत्तो च इतिहास मांडताना अतिरंजित पणा केला, तो तसा केला नसता तर इतर भाग सविस्तर दाखविता आले असते. त्या काळात जर पाहिले तर प्रत्येक दरबारी दोन गट होतेच. त्यामुळे अनजी दत्तो वर अनावश्यक भाग खर्ची पडले. तसेच इतिहास मांडताना भावूक बाजू जास्त प्रमाणात मांडली. त्यांचे पराक्रम मांडले नाही. अनेक वर्षांपूर्वी संजय खान ने ज्या ऐतिहासिक मालिका केल्या टिपू सुलतान , अकबर, ग्रेट मराठा यातील युद्ध प्रसंग अतिशय चपखल दाखवले तसे या मलिकेत सुध्धा अपेक्षित होते.
  तरीही कोल्हे नी त्यांचे काम केले. छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी इतिहासात जास्त शिकवले जात नाही. त्यामुळे बरीच लोकांना त्यांच्या बदल पूर्ण माहीत नसते. पण त्याच बरोबर आफळे बुवा सारखे कीर्तनकार त्यांच्या बद्दल अनेक वर्षांपासून कीर्तन करीत आहेत. लोकांना समजावत आहेत. छावा सारख्या उत्तम साहित्यातून राजांचे जीवन मांडले आहे.
  निनाद बेडेकर सारख्या अनेक इतिहास संशोधकांनी त्यांच्या जीवनातले प्रसंग अनेक व्याख्यानातून मांडले आहेत.
  तरीही या मालिकेने खरंच खूप छान इतिहास मांडला हे नमूद करायला हवेच.
  आता ९-९:३० टिव्ही वर पाहण्या सारखे काही नाही, पण इतिहास प्रेमींनी या पुढे वाचन करून छत्रपती राजे संभाजी बद्दल लिखाण करावे, लोकांना सांगावे पण त्यात कुठल्या जातीचा द्वेष पसरवू नये. त्या काळातील लोकांचे वागणे हे तुम्ही आजच्या लोकांना लावून बघू नका, मात्र जीवन जगताना हा इतिहास खूप कामात येतो हे लक्षात ठेवा.
  स्वर्गीय छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा.
  जगदंब.जगदंब जगदंब…….

 8. नरेश नारायण बावकर

  तुमच्या मताशी मी सहमत आहे . छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी बाजीराव पेशव्यांपर्यंत सर्व इतिहास दाखवावा .

 9. जय शिवराय ⛳
  हो बरोबर आहे आता तुमचं औरंगजेब आल्यानंतर ज्या 200 मोहिमा न हरता जिंकल्या होत्या त्यातील २० ते ३० दाखवले
  २०० मोहीमा हे गिनीज बुक मध्ये नोंद आहे

 10. ही मालिका म्हणजे निर्मात्यांनी आपल्या समाजावर एक प्रकारे उपकारच केले आहे, संभाजी महाराजांचा इतिहास दाखवून. परंतु ही मालिका बॉलिवूडचा सिनेमा नाही, मराठी माणसाची निर्मिती आहे त्यामुळे अपेक्षाही जास्त आहे. एक गोष्ट मनाला खटकली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यासाठी औरंगजेबाने जबरदस्ती केली आणि छळ केला आणि ठार मारले. ही गोष्टच दाखवली नाही. त्यांच्या बलिदानाला वेगळ्या पद्धतीने दाखविले. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. धर्मासाठी च्या त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान राखायला हवा होता

 11. झी मराठीने मालिका घाई घाईने संपली खरे कारण आहे तसेच डॉ अमोल कोल्हे साहेबांचे आभार मानले पाहिजे छत्रपती संभाजी महाराज मालिका दाखवली जनतेला

 12. Rumendra karambe

  I do not like the decision of winding up the swaraj rakshak sambhaji. And bringing the mazya …. Boyko by replacing it.

  1. नितिन तापकीर

   छञपती संभाजी महाराजाच्या मालिकेचा शेवट हा खरेच घाईने केला त्यांच्या सर्व लढाया सविस्तर पणे दाखवायला पाहिजे होत्या तसेच मालिकेचा ९ वाजताच चा भाग बघायचा राहीला परत तो फक्त राञी ११.३०आणि पहाटे ४.३० वाजता लागायचा पण इतर मालिकेचे भाग माञ सारखे असतात माञ या मालिकेचा एकही भाग दिवसभरात दाखविला नाही.परंतु डाॕ.अमोल कोल्हे साहेबामुळे छञपती संभाजी महाराजाचा इतिहास लोकांना पुढे आला तसेच इथुन पुढे महाराणी येसुबांइचा इतिहास यावा ही अपेक्षा.

 13. Priti bhamare

  जसा संभाजी महाराज यांच्या इतिहास आपल्याला स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत कळला तसा नंतरचा पण कळण्यासाठी मालिका काढावि हि अमोल कोल्हे ह्यांना नम्र विनंती

 14. माहित नसलेला इतिहास सांगण्यासाठी मालिका काढली.
  मालिकेचा सेट फक्त २००*१०० मीटर एवढा आहे. एवढीश्या जागेत लढाया दाखवता येत नाहीत.जास्त पैसे नव्हते.

 15. Nagesh Palkar

  मला हे सांगावेसे वाटते की सर्व मालिकांना दुसऱ्या दिवशी दिवसातून 10 वेळा तरी प्रक्षेपण केले जाते मग फक्त स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजाची मालिका फक्त त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता दाखवली जायची आणि आठवड्यातून एकदा तरी आठवड्याखेरी तरी ती दाखवणे गरजेची होती••••असे काय कारण होते,,,,,,कि जास्तीतजास्त लोकांपर्यंत हि मालिका पोचू नये असा काही लोकांची मनीषा होती की काय,,,,औरंगझेब एवढा हलकट माणूस त्याची वाट नंतर आपल्या मावल्याने कशी लावली हे सविस्तर दाखवले असते तर समाधान झाले असते,,,,,अजून एक गोस्ट कळत नाही की कुठला हि ऐतिहासिक चित्रपट जो शिवाजी महाराजांच्या संबंधीत आहे तो संपल्यावर लोक सांतपणे उठून निघून जातात,,,,शिवाजी महाराजांचा किंवा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र म्हटले पाहिजे आणि कमीत कमी एक घाणेरडी शिवी औरंगझेब ला घातली पाहिजे,,,,हिजडा होता तो ,,, एवढा वयस्क असून 32 वर्षांच्या आपल्या संभाजी महाराजांना फसवून पकडले ,,,,एक बापाचा असता तर असे केले नसते,,,,काय करणार,,,रक्ताचं घाणेरड होता,,,,त्याचा बाप कुठलासब्या चोट होता,,,,तो पुन हिजडाच ,,,,स्वतःच्या मुलींना ना सोडणारे लोक

 16. खरं तर एवढ्या कमी वेळेत छत्रपती शंभू राजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे खूप अवघड गोष्ट आहे आपण मालिकेतल्या उनिवा काढत बसू नये असे मला वाटते आणि टीव्ही सिरीयल मध्ये सगळ्या गोष्टी दाखवणं हे पण शक्य नाही त्यांनी छत्रपती संभाजी राजांबद्दल आपल्या मनात जी प्रेरणा निर्माण केली आणि आपण आज महाराजांविषयी बोलतोय आहे खरं तर हीच त्यांच्या यशाची पावती आहे आपण बुधभूषण ग्रंथाचे वाचन केले पाहिजे अमोल कोल्हे आता खासदार आहे प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला त्यांच्याकडून अपेक्षा आहे

 17. म मला वाटते ही मालिका पुन्हा चालू करून पुढचा इतिहास दाखवायला पाहिजे

 18. खरंच …एकाद्या मराठी माणसा ने चॅनल काडला पाहिजे म्हणजे कोणाचं दबाव असणार नाही आणि महाराष्ट्राचं इतिहास निर्भय पणे दाखवता येईल.
  🚩जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

 19. Anil Vinayak Devshatwar

  छत्रपति संभाजी महाराज समजण्याचे भाग्य लाभले‌ जंग काही म्हनो अंतःकरणातिल खरा या‌ भुतलावर‌ नं भुतो‌ नं भविष्यी‌ असा राज्या नाही सुर्य चंद्र असे पर्यत छावाचे उपकार फेडण्याची हिंदूनी प्रयत्न करत रहावे ,

 20. घोरपडे राजेंद्र बबनराव

  छत्रपति संभाजि मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे यांचे शतशहा आभार,व अभिनया बद्दल म्हणायचे तर संभाजि महाराजांच्या अभिनयाला तुम्हि जो न्याय दिला आहे तो या जगात कोणिहि देवु शकल नसतं अस मला वाटत परंतु मनात एक खंत प्रत्येक वेळेस राहिल कि आमच्या संभाजि राजांच्या शेवटच्या इतिहासाला तुम्हि न्याय देवु शकला नाहि,परंतुआम्हाला अजुनहि आपल्याकडुन अपेक्षा आहेत *जय जिजावु जय शिवराय जय संभाजि राजे*

 21. Akshay Sunil jadhav

  अगदी बरोबर स्वराज्य रक्षक मालिका संपल्यामुळे अस वाटतय कि सगळच संपलय आपल्या जवळचा आपल्या घरातील महत्वाची व्यक्ती आता आपल्या सोभत नाही अस वाटत आहे

 22. Tulsidas Valvi

  तुम्ही काहीही म्हणा! मी मात्र १६ व्या शतकात जाऊन अगदी डोळे भरून पाहिले त्या माझ्या जाणता राजाला आणि त्याच्या छाव्याला!

 23. शिवमित्रांनो… छत्रपती संभाजी महाराजांचा सर्व इतिहास दाखवला अमोल कोल्हे सर जगदंब क्रियशन व झी मराठी वाहिणीमुळे शक्य झाले.
  स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत कळला तसा नंतरचा पण कळण्यासाठी मालिका काढावि हि अमोल कोल्हे सर
  ह्यांना नम्र विनंती.
  🚩जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.