तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी जाधव यांचा शनिवारी रात्री उशिरा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली रस्त्यावर त्यांनी प्रेमाची भाकरे या नावानं हॉटेल सुरू केलं होतं. हे हॉटेल रात्री बंद करून मोपेड वरून घरी जात असताना त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेमुळे कोल्हापूर परिसरात तसेच मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली. कल्याणीच्या अचानक झालेल्या निधनामुळे मालिकेत कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे.
मालिकेत वहिणी साहेबांची भूमिका साकारलेलली अभिनेत्री धनश्री यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता. मालिकेत दोघींचं कधी पटलं नाही. पण खरा आयुष्यात मात्र दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. कल्याणी सोबतचा एक फोटो शेअर करत धनश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्यात. ‘नाही असं जायला हवा होतास ग जिवा हुरहुर लावून गेल्यास बघ.’असं धनश्रीने म्हटलं आहे.

कल्याणी यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.