मराठी कलाविश्वाला हादरा देणारी एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘Actress diad’ लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला या मालिका सह तिने अनेक नामवंत मालिकेमध्ये काम केलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हीच अपघाती मृत्यू झाला आहे. अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिने काही दिवसांपूर्वीच प्रेमाची भाकरी हे हॉटेल हालोंडी फाटा येथे सुरू केले होते. हॉटेल बंद करून बाहेर पडल्यानंतर एक भरधाव डंपरने कल्याणीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कल्याणी चा जागीच मृत्यू झाला.

तिने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘सुंदरी’ या गाजलेल्या मालिकेत तिने काम केले आहे. (kalyani jadhav). अनेक मालिकांत काम करणारी अभिनेत्री अचानक गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याणी कुरळे जाधव हिचे अपघाती निधन झाल्याने मराठी मनोरंजनसृष्टी शोककळा पसरली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकारांनी देखील कल्याणीचे मृत्यूनंतर दुःख व्यक्त केल.