छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०७

पुतळाबाईनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. तीन वेळा
पाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या,

“गोपाळ घ्या, गोविंद घ्या! ”

पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून
त्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांना त्याचे नाव सांगितले

  • “शंभूजी!” आणि ही बदतमिजी केल्याबद्दल पाठीवर ठीवर पडलेले काशीबाई, गुणवंताबाईचे
    गोड धपाटे हसत-हसत सहन केले! शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या.
    अभिषेकपात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढं होत पाळण्याला पाठ लावून एकदा
    पाठझोका दिला!

आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या चारी बुरजांवरच्या तोफांच्या
भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्त आभाळाला खबर दिली – “राजश्रियाविराजित,
सकलगुणमंडित, भोसलेकुलावतंस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे
नामाभिधान जाहले! संभाजीराजे – शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले! ”

आणि त्या खबरीने गडावरच्या राउळातील सगळे देव सोयरातून सुटले!

खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिर्दीला सुखावून
जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला, एका सवत्या
बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेललेले होते. महालाच्या भिंतीकडा धरून
अंथरलेल्या बिछायतीवर माणकोजी, तान्हाजी, गोमाजीबाबा, जीबाबा, नेताजीराव,
बाळकृष्णपंत, प्रभाकरभट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती.

महालाच्या मध्यभागी, जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर
सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या
पंचांगावर त्यांची एकटक नजर खिळली होती.

कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या एक-दोनवर हरभटांनी उभ्या केल्या.
हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या
उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जाबता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया
उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले.
काजळीच्या बुधलीत ते बुडवून, कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या
बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला. ग्रहांनी आपापली घरे घेतली!

“बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा
होऊ दे.” जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली.

“जी! जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा.” हरभटांनी
कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले.

“बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र
जन्माला आला आहे! रुद्र हिमालयावर राहतो, तसाच उंच गडकोटांवर राहील. कुलाची
कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय-तांडव मांडेल! तसाच भोळाभाबडा, तापट आणि
सरळ स्वभाव असेल, रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही! आणि –

हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले.

“आणि काय? बोला शास्त्री.” जिजाबाईंना त्यांच्या ‘आणि ‘ मधला संकोच
जाणवला.

“क्षमा असावी – पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग
या कुंडलीत दिसतो!” हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले.

“अस्सं! ते काय आम्हीसुद्धा फसलोच की!” म्हणत हसून जिजाबाईंनी
मनावरचा ताण कमी केला

धिरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैलीबंद केली.
कुलदेवतेसमोर तेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकरभट
राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली
स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली.
राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली
सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे, सांजआरतीच्या देव-झांजांचे आणि
घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानांवर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तबकात
ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर
गेली. त्या रंगसतेज शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदलं
त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर
पवित्रशांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषीबुवांचे बोल धावणी घेत होते –
“पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तमणांकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो!”
एक क्षणभर राजांची तंद्री लागली. “रुद्राचे सारे गुण घेऊन आलात – तशीच कोणतंही
विष पचविण्याची ताकदही घेऊन आला असाल!! जगदंब, जगदंब!” असं पुटपुटत राजांनी
डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते!

बालेकिल्ल्याच्या चोवीस बुरुजांवर केलेल्या या दिवल्यांच्या रोषणाईने
आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होते!

पुतळाबाई ळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांची
शिणलेली णलेली नजर मधून-मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली
बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली लली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती
चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईना मानवलं नाही. मंचकावरून उठताना
डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यांत गोळे उठत होते
बारशाच्या 1] सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून निकराने सहन केले

कुणाशीतरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या. त्यांच्याबरोबर सखू,
राणू, अंबा ह्या सईबाईच्या एकमेकींच्या पाठीवरच्या तीन मुली होत्या. त्यांतील थोरल्या
सखूबाई समजूतदार होत्या.

“थोरल्याबाई, आता कसं आहे तब्येतीचं?” पुतळाबाईनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.