स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा करपावली (Karpawli) भाषा कशी काम कार्याची ते आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. हि किमया फक्त आणि फक्त छत्रपतींचे मावलेच करू शकतात.
करपावली (Karpawli)
करपावली वर्णाक्षर खुणा
प्राथमिक शाळेत गुरूजी मुलांना मुळाक्षरे शिकवितात. तेव्हा प्रत्येक अक्षराकरिता एखादी वस्तू दर्शविली जाते. उदा. आगगाडीचा आ, इडलिंबूचा इ. वगैरे… याच पध्दतीचा वापर करून दंडी कलावंतांची ही करपावली सिद्ध झालेली आहे. प्रत्येक अक्षराकरिता आकारावरून एक वस्तू किंवा कृती ठरवून तिचे वर्णन हाताच्या बोटांद्वारे केले जाते. करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी व अंगठा या पाच बोटांचा उपयोग करून प्रत्येक वस्तू किंवा कृती दर्शविली जाते. त्या कृतीचा किंवा वस्तूचा सहसंबध सवयीने सर्व सवंगड्यांना माहिती झालेला असतो. त्यामुळे आपल्या म्होरक्याने केलेल्या करपल्लवीवरून संबंधित दात्याचे नाव-गाव हे सवंगडी तेवढ्या अंतरावरूनही अचूकपणे ओळखून सांगू शकतात.

या पद्धतीत हे लोककलावंत व्यंजन आणि स्वरसंकेतांचा वापर करतात अंगठा वर केला असता ‘अ’ या स्वराचा बोध होत असतो. तर्जनीच्या साहाय्याने अन्य स्वरांचे संकेत दर्शविले जातात. तर्जनीने उभी रेषा केली की ‘आ’ या स्वराचा बोध होतो. त्याचप्रमाणे तर्जनीने ‘ई’ दर्शविली जाते.
तर्जनीने पीळ दाखविला की ‘ऊ’ या स्वराचा बोध होत असतो. तर तिरप्या रेषेने एकार सूचित होतो. उभ्या रेषेला वर तिरपी रेषा दाखवून ‘ओ’ या स्वराचा संकेत दर्शविला जातो. ‘ज’ या व्यंजनाकरिता जाणे आणि ‘य’ या व्यंजनाकरिता येणे या दोन क्रियांचा अपवाद सोडला तर अन्य व्यंजनांच्या बाबतीत वस्तूंचेच संकेत वापरल्याचे आढळून येते. बदक, ससा व हत्ती हे प्राणी संकेताकरिता वापरले असून खड्ग, घंटा, चमचा, चक्र, डमरू, दऊत, फणी, भाला, मणी, लसूण व वाटी या वस्तूंचा उपयोग संकेतांकरिता केलेला आहे. करंगळी, नख व मनगट हे अवयव वापरले आहेत.
शिवाय झापड, टोला, तहान, थापड, पसा व रक्त यांचादेखील संकेतांकरिता वापर केलेला आहे. ‘च’ या व्यंजनाकरिता एकाच हावभावाचा अर्थ चमचा किंवा चक्र असा दोन संकेतांनी घेतला आहे. तर ‘म’ या व्यंजनाच्या संदर्भात दोन वेगवेगळे हावभाव घेऊन मणी व मनगट हे भिन्न संकेत दर्शविले आहेत. एरव्ही आपण जसे वेगाने सरळ लिहीत असतो त्याचप्रमाणे दंडी कलावंत आपल्या दात्याचे नाव वेगाने हातवारे करून आपल्या सवंगड्यांना सूचवीत असतो. पाहणाऱ्याला तो एक नाचाचा प्रकार वाटावा असे त्याचे हस्तलाघव असते. किंबहुना अशा सफाईने नामनिर्देश करून सर्वांना आश्चर्यचकित करणे हाच त्या कुशल कलावंताचा या कृतीच्या मागचा उद्देश असतो. दंडी ही जातिवंत कलावंताची जमात आहे.
आपली कला आपल्या यजमानांना दाखवून तिच्या बदल्यात घवघवीत बक्षिसी लाभावी एवढीच माफक अपेक्षा या कलावंतांची असते. पुरातन काळात हे कलावंत लोक राजाचे उत्तम हेर म्हणून चांगली कामगिरी पार पाडत असावेत असे त्यांच्या ‘करपावली’ नामक या हस्तकौशल्याकडे पाहून वाटायला लागते. शत्रूच्या गोटातील गुप्त वार्ता प्रयत्नपूर्वक प्राप्त करून आपल्या दूरवर उभ्या असलेल्या साथीदाराला बिनबोभाट पोचविणे, तेही अगदी प्रत्यक्ष शत्रूसमक्षदेखील या कलावंतांना सहज शक्य होत असावे. म्हणजेच एका काळचे हे राजदरबारातील मान्यवर हेर असावेत.
Apratim mahiti dilit bhau aabhari aahe