छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०१

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आपण कादंबरीमय इतिहास आणि ऐतिहासिक पुरावे संदर्भासहित आपण मांडणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ लेखाच्या खाली फोटोमध्ये दिलेले असतील. आपल्या धाकल्या धन्याचे चरित्र आपण छावा, संभाजी या कादंबरीतून मांडणार आहोत. तसेच ऐतिहासिक संदर्भ हे वा.सी. बेंद्रे, डॉ. सदाशिवराव शिवदे, डॉ. जयसिंगराव पवार या अमूल्य इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून मांडणार आहोत.

पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राउळातील दगडी ठाणवया, करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. राउळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला.

पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुणीमहालात मात्र रोजाना
चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता.दरुणीमहालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता.

त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेले स्री-बानदान खानदान अस्वस्थपणे, चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वत:च्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे, अशी कल्पना करून त्या स्त्री- खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही, अशा बेताने स्वतःशीच “आई जगदंबे, आई जगदंबे ‘ असे पुटपुटणे चालू ठेवले.

त्या होत्या जिजाऊसाहेब! शहाजीराजे भासले यांच्या राणीसरकार! श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री – आऊसाहेब! भोसले कुळीचा पवित्र-मंगल त्र-मंगल कुंकुमकरंड! जगदंबेला स्त्री-जातीच्या रूपात पडलेले सर्वांत गोमटे स्वप्न!

उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये-जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच दहा- बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता.

रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना
शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही! त्यांच्या डइईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या इुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती. मर्दांची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते!

दरुणीमहालावरचा रोषणनाईक आला. जिजाऊंना बघताच अदबमुजरा घालून कोताड्याकी चाक. निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्‍या कदमांनी निघून
.

दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला.

मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कढ आले होते. त्याहून अधिक काळजीचे कढ त्यांच्या उरात दाटले होते.

एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी-बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या ‘आऊपणानं ‘ त्यांच्या कानांत जमाव केला. अनेक सवाल डोळ्यांत खडे ठाकले.

Sambhaji maharaj history

दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके, राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुईण – गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून
तिने ते पाठीशी उफराटे फिरविले होते.

तापल्या दुधावर दाट साय जमून यावी, तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या

“झडू द्या तोपांची नवबत! बाळकिसन आलं… बाळकिसन!! बाळ-बाळतीण सम्दं सुकरूप….

“आ बाळराजं..” म्हणत नेताजीरावांनी जीरावांनी जोत्यावरून खाली चटकी छलांगच घेतली! त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, “बुरजाबुरजांवरच्या भांड्यांस्री बत्ती देतो, आऊसाब! धाकलं धनी
आलं! हू दे, जगदंबेचा उदो! ”

प्राजक्ताचे फुलभरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न-प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही, या बेताने मुजरा घालीत-घालीतच ते मागल्या पावली चार-पाच कदम मागे हटले.वळताना आपल्या भरदार मिश्यांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, “बाळराजं ! धाकलं धनी ब्येस… लई ब्येस!” आणि एरव्ही घोड्यावर मांडबुलंद बेठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बन्ञ्यासारखे सिधे पायीच धावले – तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी!

त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकुमपट्टा वर चढवीत स्वत:शीच हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला!

संभाजी महाराज जन्म पुरंदर
ऐतिहासिक पुरावे

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “छत्रपती संभाजी महाराज चरित्र भाग ०१”

  1. Pingback: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वच्या सर्व वीरांचे समाधीस्थळे नेमके ठिकाणे —

  2. पराग टिवलेकर

    पुराव्यान सकट इतिहास वाचन , म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान यांची सांगड होय. प्रयत्न छान आहे , शुभेच्छा …..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.