gauri and jaydip dance | sukh mhanje nakki kay asta

jaydip and gauri from sukh mhanje nakki kay asta dance together for the new year celebration. watch below episode

सुख म्हणजे नक्की काय असता या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात माई दादासाहेबांना गौरीचे अंत्यविधी करू असे शालिनीच्या सांगण्यावरून बोलत असते. तेव्हा दादा नकार देत गौरबाईला काहीच झाले नाही. जयदीप राव नक्कीच त्यांना सुखरूप घरी घेऊन येतील असे बोलतात. त्यावर माई दादांना शालिनी व देवकी शोकसभेसाठी आडून बसल्यात मी काय करू, कुणाचे ऐकू असे बोलतात. तेव्हा शालिनी व देवकीला तुम्हाला जे वाटते ते करा असे दादा सांगतात.

त्यानंतर माई शालिनी व देवकीकडे जातात व दादा व मला गौरी जिवंतच आहे असे वाटते. तुम्हाला जे करायचे ते करा. मला यात ओढू नका असे शालिनीला वैतागून सांगतात व निघून जातात. त्यावर शालिनी, देवकी, शेखरची बायको खूप खुश होतात. व आपण शोकसभा लगेच करूयात असे सांगतात तेव्हा अम्मा त्यांना रडून बोलतात की, जिवंत पनी तुम्ही गौरीला सुख दिले नाही तर मेल्यावर तरी असे खेळ खेळू नका. तेव्हा शालिनी अम्मा वर भडकते. देवकी गौरी भूत बनून माझ्या छातीवर बसेल असे बोलून खूप घाबरते.

इकडे दारुड्या अनिल व रंगनाथ ला गौरीचे घर दाखवतो. घरी गौरी नसते तर बाबा असतात. अनिल बाबाना गौरी कुठे आहे असे विचारतो, तेव्हा गौरी इथे नाही असे बाबा सांगतात. तेव्हा अनिल बाबांना मारहाण करतो व आपल्या माणसांना घरात शोध घेण्यास सांगतो. तेव्हा घरामद्धे गौरीची बॅग व पैंजण सापडते. त्यावर अनिल बाबांना अजून मारू लागतो. हे सर्व गौरीची मैत्रीण पाहते व लगेच गौरीकडे जाऊन तुला शोधण्यासाठी माणसे आलेली आहेत. तू लगेच पळून जा असे सांगते. त्यावर गौरीला धक्का बसतो व ती बोलते की, बाबांच्या जीवाला धोका आहे. त्यांना या अवस्थेत सोडून मी जाऊ शकत नाही व ती बाबांकडे जाऊ लागते.

त्यानंतर देवकी फोनवर रडायचे नाटक करून नातेवाईकांना शोकसभेसाठी बोलावत असते. तेव्हढ्यात शालिनी तिथे येते व असे फोनवर रडून काय उपयोग नाही. मी तुला दाखवते की शोक कसा व्यक्त करायचा व ती लगेच फोन करून गौरी गेली शोक सभेला या असे दुसऱ्या नातेवाई कांना सांगते. तेव्हढ्यात उदय येतो. व अनिल ला अजून गौरी सापडली की नाही असे विचारतो. तेव्हढ्यात शालिनीचा फोन् वाचतो व अनिल गौरीचा ठावठिकाणा सापडला असे सांगतो. तेव्हा शालिनी अनिल ला गौरीचा खून कर असे सांगतात. त्यावर गौरीला संपवून टाकतो असे बोलतो. फोन ठेवतो.


त्यानंतर बाबा अनिल ला गौरीबद्दल सांगत नाही तेव्हा रंगनाथ चाकू घेतो व मी आता या म्हाताऱ्याकडून सर्व वदवून घेतो असे बोलून बाबांवर चाकूने वार करू लागतो तेव्हढ्यात गौरी तिथे येते व मोठ्याने ओरडून बाबांवर वार होऊ देत नाही. गौरीला पाहून अनिल व रंगनाथ ला खूप आनंद होतो. गौरी रंगनाथ वर भडकते व मी तुझे काय बिघडवले आहे. मी शांतपणे तुझे सहन करत आले त्यामुळे तू आतापर्यंत माझ्यावर अत्याचार करत गेला. यापुढे मी तुझा अपमान सहन करू शकत नाही. असे मोठ्याने ओरडून सांगते. गौरीचा तो रौद्र अवतार पाहून अनिल ला घाम येतो.

तो लगेच चाकू काढतो व गौरी वर हल्ला करण्यासाठी गौरीकडे धाव घेतो. गौरी काय घडते ते समजण्याच्या आत अनिल गौरीवर चाकूने हल्ला करतो. गौरी मोठ्याने ओरडते. सर्वांना वाटते गौरीच्या पोटात चाकू घुसला. पण अनिल चा हात जयदीप ने मधेच पकडलेला असतो. अनिल खूप घाबरतो. व जयदीप वर हल्ला करायला जातो. जयदीप अनिल ची खूप धुलाई करतो. रंगनाथ अनिलला वाचवायला जातो पण जयदीप रंगनाथ व त्यांच्या माणसांना जॅम चोप देतो. त्यावर अनिल व रंगनाथ पळून जातात. जयदीप गौरीकडे पाहतो व गौरी मान खाली घालते. पुढील भागातील व्हिडिओची लिंक पाहण्यासाठी description मधील लिंकवर जा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!