रणधुरंदर संताजीबाबा घोरपडे यांचा खरा इतिहास आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.विविध ऐतिहासिक नोंदीवरून व पुस्तकांवरून हा इतिहास लिहला गेला आहे.प्रामुख्याने जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकातून हा लेख मांडलेला आहे.
१.संताजी घोरपडे जन्म
क्षात्रपरंपरा व क्षात्रतेज लाभलेल्या घोरपडे घराण्यात सेनापती संताजी घोरपडे याचा जन्म झाला होता. संताजीच्या जन्माचे साल इतिहासाला ज्ञात नाही; पण ते इ.स. १६४५ च्या सुमाराचे असावे, असा तर्क बांधावयास हरकत नाही.
हा काळ महाराष्ट्राच्या राजकीय वसांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण याच सुमारास शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची संस्थापना केली आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर दक्षिणेत एक नवे पर्व सुरू केले.
या महान कार्यात शिवाजी महाराजांबरोबर संताजीचे वडील म्हाळोजी घोरपडेही सहभागी होते. स्वाभाविकच स्वराज्यनिष्ठेचे व स्वातंत्र्यप्रेमाचे उदात्त संस्कार संताजीस बालपणीच मिळाले होते.
२.संताजी घोरपडेंच्या चरित्राचे दोन कालखंड

संताजी घोरपडेंच्या चरित्राचे प्रामुख्याने दोन कालखंड पडतात. पहिला कालखंड म्हणजे संताजीची शिवाजी महाराज वसंभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील कामगिरी व दुसरा कालखंड म्हणजे त्याची राजाराम
महाराजांच्या कालातील त्याच्या मृत्यूपर्यंतची (स. १६९७) कामगिरी.यादोन्ही कालखंडांपैकी पहिल्या कालखंडातील संताजीच्या कामगिरीचे उल्लेख फार कमी मिळतात. त्याचे पहिले मुख्य कारण असे की,शिवकालीन ऐतिहासिक साधनांची कमतरता आणि दुसरे कारण असे
की, हा कालखंड म्हणजे संताजीच्या उमेदवारीचा कालखंड होता.या पहिल्या कालखंडात संताजी हंबीरराव मोहितेसारख्या सेनानीच्या हाताखाली लष्करी मोहिमांत वावरताना दिसतात.
शिवकालात त्यांना एखादी मोहीम स्वतंत्रपणे दिलेली आढळत नाही; पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या कालखंडात मात्र तो अनेक मोहिमांत आचर्यचकित करणारे पराक्रम करणारा मराठयांचा सेनापती संताजी घोरपडे सर्वचार सेनानी ठरल्याचे दिसून येते.
या दुसऱ्या कालखंडातील, म्हणजे राजाराम महाराजांच्या
कारकिदीतील संताजीचे पराक्रम म्हणजेच संताजीचे चरित्र आहे. असे जरी असले, तरी संताजीच्या जीवनगाथेस पूर्णत्व येण्याच्या दृष्टीने त्यांची पूर्वकालातील कामगिरीही समोरमांडणे अगत्याचे आहे.
३.सेनापती हंबीररावाची शिफारस
लष्करी मोहिमेत असताना संताजीच्या लष्करी गुणांकडे
पहिल्यांदाला गेले ते शिवाजी महाराजांच्या हंबीरराव मोहिते या महान पराक्रमी सेनापतीचे. स. १६७४ साली प्रतापरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी महाराजांनी हंसाजी उर्फ हंबीरराव यास नेमले होते.या हंबीररावाच्या हाताखाली जे अनेक पराक्रमी लोक वाढले त्यात संताजी हा प्रमुख होता.
हंबीररावाने संताजीच्या ठिकाणी असलेले
लष्करी कर्तृत्व अचूकपणे हेरले होते. म्हणून अशा गुणी तरुणास महाराजांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी,अशी शिफारस हंबीररावाने केली होती. मल्हार रामराव चिटणीस म्हणतो, “अहमदाबाद प्रांतापर्यंत जाऊन मुलुक लटन शहरे मारीत खंडणी घेऊन (हंबीरराव) नर्मदातीराकडून बराणपुरीआले.खानदेशीची
खंडणी करून माहूर तालुकियात जाऊन तेथील खंडणी केली.जालनापूर, शिंदखेड येथील खंडणी घेऊन गंगातिरी देशी आले. तो दिलेरखान व आणखी उमराव चालून आले. त्यास दबाऊन यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले… महाराज बहुत संतोष झाले… संताजी घोरपडे यांणी काने बहूत केली. शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी
विनंती केलियावरून तैनातजाजतीकरूनजमलेदारी दिल्ही….”
४.संताजीने तलवार गाजवली
स. १६७४ साली शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील प्रवेश
जिंकण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कोपल प्रांत जिंकणे हीही एक योजना होती. कोपल प्रांतावर आदिलशाही सुभेदार हुसेनचान मियाणाब कासिमखान यापठाण बंधूची सत्ता होती. त्यांच्या विरुद्ध महाराजांनी हबीररावास ससैन्य रवाना केले. सरलष्कर हंबीरराव मोहिते यांनी हुसेनखानास पराभूत करून कैद केले आणि मोठा विजय प्राप्त केला.
या मोहिमेत हंबीररावाबरोबर संताजी असून, त्याने मोठी तलवार गाजविल्याचे इतिहास सांगतो. एक्याण्णव कलमी बखर म्हणते,
त्या उपर विज्यापूरच्या पातशाहाची फौजा हंबीरराक सेनापति याजवर
वाटेस आडवी (आली.) प्रथम हुसेनखान मायेणा दाहा हजार फौजेनिसी
युद्धास आला…युद्ध बहुत जाले. हुसेनखान भायेगा पाढाव केला. पौण
कुल बुडविली. त्याउपर तेच समई किले कोपलव बहादुरबिंडा किला
घेतला. हंबीरराऊत्यासमागमे संताजी घोरपडे व बहीरजी घोरपडे योगी
तलवार केली म्हणून नावाजले…
५.शिवाजी महाराजांची इतराजी
यानंतर संताजीच्या शिवकालातील कामगिरीचा उल्लेख येतो तो जालन्याच्या स्वारीच्या संदर्भात. जालन्याची स्वारी ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील शेवटची स्वारी. या स्वारीत जालना शहर चार दिवस मराठयांनी लुटले आणि प्रचंड संपत्ती पैदा केली; पण ही लूट घेऊन परतताना रणमस्तखान या मोगल सरदाराने मराठ्यांच्या
पिछाडीवर हल्ला चढविला. महाराजांच्या लष्करातील पराक्रमी सेनानी सिधोजी निबाळकर हा पिछाडी सांभाळत होता. त्याने आपल्या पाच हजार सैन्यानिशी खानाशी तीन दिवस लढाई दिली. तिच्यात तो रणांगणी ठार झाला.
दरम्यान केसरीसिंग व सरदारखान हे दोन मोगल
सरदार औरंगाबादेहून रणमस्तखानाच्या मदतीस धावून आले. तथापि मोगलांचे हे दुसरे सैन्य येण्यापूर्वीच महाराजांनी चपळाईने नाधार घेतली
वसतत तीन दिवस कूपकानपट्टा किल्ल्यावर सुखरूपपोहोचले.या धावपळीत बरीष लूट शत्रूच्या हाती पडली, चार हजार घोडेस्वार
धारातीर्थी पडले. बुर धीरराव सेनापतीही जखमी झाले. एकूण या मोहिमेत मराठयांचे जबर नुकसान झाले. या मोहिमेत संताजी मराठी लष्करात होता. विशेष म्हणजे याप्रसंगी त्याने जबाई करताना उतावळी
केलीभणून त्याजवरठपका आला.
बखरकार म्हणतो, “त्यातपर फौज कुल घेऊनकसवेजाल्हापूर (जालना) मारिले, फकीरास कस्टी केले. द्रव्य घेतले. ते सम्ई
रणमस्तखान यायोन आला. युद्ध जाले. सिदोजी निंबाळकर पंचहजारी त्यास गोला लामोन पडताच राजे रातोरात किले पटियास फौजेसह
वर्तमान आले. गडाये नाद विश्रामगड देविले. मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांजवर इतराज जाले. युद्धसमई उतावेली (केली) म्हणून
मरियास येऊ दियले नाही (नोव्हें. १६०९)
संताजीने युद्धसमयी कोणती उतावळी केली याचा तपशील
बखरकाराने काही दिलेला नाही. पण अशी उतावळी केल्यामुळे इतराजी होऊन त्यासयमानाजी मोरे यास मुजयासन येण्याची शिक्षा महाराजांनी फर्माविली, हे तो सांगतो. वास्तविक जालन्याची स्वारी ही महाराजांच्या
गनिमी काव्याच्या पद्धतीनेच केली गेली.अशा पद्धतीच्या लढाईत अचूक हालचाली, सुरक्षित व शिस्तबद्ध आधार या गोष्टींना महत्त्व असते.
अशा वेळी एखादी लहानशी चूकही सर्व लष्कराला भोगावी लागते. संताजीने शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढत असता, जसे पराक्रम केले. तशा
चूकाही केल्या असतील; पण अशा चुकांतुन संताजी युद्धनीतीचे,विशेषता गनिमी युद्धनीतीचे धडे शिकत गेले.
संताजी घोरपडे यांच्याबद्दलच्या इतिहासातील पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pingback: संभाजी महाराजासारखेच या हिंदुस्थानातील वीरांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले! —
Good