शिवजयंतीच्या दोन तारखा का?

जय शिवराय मित्रांनो,

आपल्या देवाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दररोज जरी साजरी केली तरी हरकत नाही.असे शिवछत्रपतीचें थोर कार्य आहे.

यावर्षी १९ फेब्रुवारी ला शिवजयंती साजरी झाली आणि आता १२ मार्चला देखील शिवजयंती आहे.

आपल्यापैकी खूप जणांच्या मनात असा प्रश्न आला असेल की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी या सर्वांची तर् वर्षातून एकदाच जयंती असते.मग छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वर्षातून दोन वेळेस जयंती का येतात?

आपल्यापैकी खूप जणांना उत्तर असेल की एक असते तिथीनुसार अन दुसरी असते ती तारखेनुसार.परंतु मित्रांनो या उत्तराने मन समाधान होत नाही.आज आपण थोडक्यात पण मुद्देसूद यामागील कारण जाणून घेऊ.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वत्र ज्युलियन कालगणना वापरत असत.शिवाजी महाराजांच्या जन्माची नोंद समकालीन साधनांमध्ये जसे शिवभारत, राजस्थान मधील शिवाजी महाराजांच्या मिळालेल्या कुंडल्या यांच्यामध्ये ‘फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१’ अशी आढळते.

इंग्रजांनी इसवी सन १७५२ रोजी ज्युलियन कालगणना बंद करून ग्रेगेरीअन नावाची कालगणना सुरू केली.

आता त्यांनी कालगणना बद्दलण्यामागचे कारण म्हणजे, आपल्याला माहीत आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती पण फिरते.समजा आज २ वाजता सूर्य आपल्याला ज्या ठिकाणी दिसतो, त्याच ठिकाणी उद्या दोन वाजता येईल असे आपले मत असेल.

परंतु पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे तिची जागा किंचित मागे पुढे जाते.आणि हा फरक आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये भरून काढतो.कधी २८ तर कधी २९ दिवसांचा महिना करून आपण असे करतो.

हे सर्व बदल ग्रेगेरीअन कॅलेंडर मध्ये होते.त्याच्या आगोदरच्या कॅलेंडर पद्धती मध्ये नव्हते.त्यामुळे या दोन्ही कॅलेंडरच्या तारखामध्ये फरक आढळतो.यावर्षी तो फरक २२ दिवसांचा आहे.

ग्रेगेरीअन कलेंडरनुसार फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवसाला १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजन्माची तारीख येते.तर ज्युलिअन(तिथीनुसार) कॅलेंडर पद्धतीनुसार ही तारीख यावर्षी १२ मार्च आलेली आहे.त्यामुळे दोन शिवजयंती आपण साजरी करतो.

महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्यावेळेस ग्रेगेरीअन कॅलेंडर पद्धती होती त्यामुळे त्यांची जयंती एकाच तारखेला येते.


असो एक कुतुहुल म्हणून हा विचार मी मांडला आहे.तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!