शिवाजी महाराज तलवार | shivaji maharaj story

shivaji maharaj story

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पुढे त्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.दक्षिणेतील तंजावर पासून उत्तरेकडील वायव्य सरहद्द प्रांतातील अटकेपार झेंडे फडकावून शौर्य लक्ष्मी ला आपल्या तलवारीने प्रसन्न केले.

तलवार गाजविली,समशेर गाजविली. त्या काळात म्हणी तलवारीवरून रूढ झाल्या.

समशेर बहादूर हा किताब सुद्धा तलवारी वरून निर्माण झाला. लढाईत विजय मिळवताना मराठयाच्या अंगी असलेली चपळता,काटकता,धाडसीपणा या गुणांचा विशेष फायदा तलवार फिरवताना लढाईत झाला. त्यांना मिळालेली तलवारिची साथ आणि मराठ्यांकडे असणाऱ्या तलवारी निर्माण करणारे कारागीर, या कारागिरांच्या तंत्राला तोड नाही.या तलवारींची गुणवत्ता अशी होती कि लढाईत या तलवारी शत्रूच्या तलवारींचे तुकडे पाडत तसेच शत्रूचे शिर धडा वेगळे करत असे.

नुकतेच मराठा तलवारीचे आधुनिक उपकरणाच्या मदतीने पृथक्करण करण्यात आले त्या वरून तिचे बनावटीचे रहस्य उलगडले.
पुढील बाबी वरून..
१] त्या तलवारी बनविणाऱ्यास तत्कालीन कारागिरांची पद्धत
२] तलवारी बनवताना वापरलेला कच्चा माल ( खनिज पदार्थ ) आणि त्यातील कार्बन चे प्रमाण .

हा कच्चा माल प्रामुख्याने कोल्हापुर,बेळगाव प्रांत,दक्षिण कर्नाटक,तामिळनाडू या प्रांतातून मिळत असे. या तलवारी (Wootz steel) पासून तयार करत असे (Wootz) या शब्दाची उत्पत्ती उक्कु या शब्द पासून झाली आहे. हा दाक्षिणात्य भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ वितळलेले पोलाद असा होतो. या तलवारी तयार करतात पोलादात कार्बनचे प्रमाण किती अचुक मापात असावे लागते याचे गुणोत्तर याची कारागिरांना पूर्ण माहित होते त्यामुळेच तलवारीची गुणवत्ता एकसारकी टिकून राहिली. पृथक्करण केलेल्या प्रत्येक तलवारीत कार्बन चे प्रमाण १.५ टक्के इतकेच सापडले तसेच बनावटीत वेगवेगळ्या प्रकारची (heat treatment) केलेली आढळुन आली.

मराठ्यांनी तयार केलेल्या तलवारीत त्यातील कार्बनच्या प्रमाणामुळे काळसर रंग दिसत असे. या काळसर रंगाच्या तलवारी सरकारी संग्रालय , खाजगी संग्राहक तसेच ऐतिहासिक घराणे यांच्या कडे आजही आहेत.

तलवारी म्हणजे शौर्याचे प्रतीक व शक्तीचे प्रतीक आहेत .तलवारी या स्वतंत्र रक्षक आहेत. पुराणकाळात दृष्टांचा नाश करण्या साठी देवी देवतांनी तलवारी धारण केल्या. प्राचीन देवी-देवतांचे मूर्तीत तलवार दिसून येते.( श्री खंडेराय व श्री भवानी देवीची तलवार ).

तलवारी क्षत्रियांची दैवत आहे म्हणून काही घराण्याच्या देव घरात तिची पूजा होते. काही मंदिरात देवा जवळ पूजा होते.

अश्विन शुद्ध नवमी हा नवरात्रीतील खंडेनवमी म्हणून शस्रप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शस्त्र पूजन करतात.

शिवप्रेमींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कंमेन्ट करून नक्की कळवा. shivaji maharaj story

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.